अवकाशीय सहली! एक सत्यातील घटना!

 

  विज्ञान कथांमध्ये सांगितलेल्या अनेक गोष्टी भविष्यात वास्तव्यात उतरलेल्या आपण अनेकदा बघतो. आजची भविष्यकाळातील विज्ञानाची संकल्पना उद्याचे प्रत्यक्षातले विज्ञान असते. याच विज्ञानाच्या मालिकेत एक गोष्ट नुकतीच अंतर्भूत झाली आहे, ती म्हणजे अवकाशीय पर्यटन.  विसाव्या शतकाच्या सत्तरचा ऐशींचा दशकात अनेक विज्ञान कथांमध्ये सांगण्यात आलेली ही संकल्पना आज 2021रोजी प्रत्यक्षात उतरत आहे. नुकतेच 11 जुलै रोजी  रिचर्ड  ब्रानसन यांनी अवकाश पर्यटन करुन त्याचा श्रीगणेशा केला आहे. तसे बघता ही संकल्पना या आधीच प्रत्यक्षात आणली गेली आहे.28 एप्रील  2001 साली डेनिस टिटो यांनी पहिल्यांदा मनोरंजनाकरीता अवकाशात पाउल ठेवून याची सुरवात केली आहे. मात्र पैसा मिळवण्यासाठी या संकल्पनेचा वापर करण्यासाठी उपयोग करण्याचे  श्रेय मात्र निर्विवाद यांच्याकडेच  जाते. ज्यांचाकडे प्रचंड पैसा आहे. ज्यांनी जग पालथे घातले आहे. अश्या  लोकांसाठी फिरण्याचे नवे डेस्टीनेशन म्हणून अवकाश मोहिमेला  यांनी सुरवात केली.रिचर्ड  ब्रानसन यांच्या नंतर 9 दिवसांनी  अब्जाधीश उद्योजक जेफ बेझोस यांनी 20 जुलै रोजी अवकाशात पर्यटनाचा हेतूने उड्डाण केले .
रिचर्ड ब्रॅन्सनयांनी वापरलेले  व्हर्जिन गॅलॅक्टिकः स्पेसशिप टू हे पुन्हा वापरण्यायोग्य अंतरिक्ष विमान आहे जे उपनगरीय विमानांप्रमाणे  अवकाशात उड्डाण करू शकते. उड्डाणाच्या वेळी दोन सहाय्यक विमानाच्या माध्यमातून अवकाशात 50,किमी उंचावर नेण्यात आले त्यानंतर सहाय्यक विमान वेगळे झाले आणि रिचर्ड  ब्रानसन बसलेले विमान पृथ्वीच्या भूभागापासून 88 किमी अंतरावर गेले . तर जेफ बेझोस यांनी न्यू शेफर्ड कंपनीच्या रॉकेट मध्ये बसून आकाशात उड्डाण केले . रॉकेट तळावरून उभे गेले आणि पृथ्वी आणि अंतराळ यांच्या सीमेनजीक रॉकेट आणि जेफ बेझोस बसलेली कॅप्सूल  वेगळे झाले . रॉकेट लॉन्च पॅडवर परत आले तर कॅप्सूल टेक्सस च्या वाळवंटात पॅरॅशूटच्या मदतीने परत आले 
    सन1961 मध्ये  त्यावेळच्या युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाचा  ह्या  वोस्तोक या यानातून  युरी गागरीन यांनी अवकाशात यशस्वी पाउल ठेवल्यावरच या युगाची मुहुर्तमेढ रोवली गेली असे म्हटल्यास वावगे म्हणू नये.मानवाला फार प्राचीन काळापासून अवकाश खुणावत होतेच.त्यात कसे जाता येईल?याबाबत सतराव्या शतकातील 
विज्ञानकथा लेखक  बर्नार्ड ले बोव्हियर डी फोन्टेनेल यांनी चंद्रावर जाण्याचा निमित्ताने रचलेल्या विज्ञानकथेमध्ये सुद्धा आपणास ही बिजे दिसतात.सुरवातीला प्रयोग करुन अंतराळात मानवास कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते. अंतराळातील कमी गुरुत्वाकर्षणाचा आपल्यावर काय परीणाम होतो.?याबाबत पुरेसी शास्त्रीय माहिती मिळाल्यावर पुन्हा या कल्पनेने उचल खाल्ली, ज्याचे प्रत्यंतर आपणास या मोहिमेत दिसते.याद्वारे श्रीमंत लोकांकडून पैसा उभारुन भविष्यात अधिकाधीक पैसा संशोधनासाठी मिळवण्याचा मार्ग म्हणूनही याकडे बघता येवू शकते.संशोधनासाठी लागणाऱ्या पैसासाठी सरकारी बेभरवस्याचा पैस्यावर अवलूंबन राहण्याऐवजी स्वतःच पैसा उभारण्यासाठी याचा वापर अवकाश संशोधन संस्थांनी केल्यास आश्चर्य वाटायला नको. अवकाश ही कोण्या एकाची मक्तेदारी नसून अवकाश हे सर्व मानवजातीसाठी खुले आहे, याची जाण ठेवत खासगी अवकाश पर्यटन कंपन्या देखील उदयास येत आहे. आजमितीस अस्या कंपन्यांची संख्या 3 असली तरी भविष्यात ही संख्या वाढणार हे निश्चित.
    .आजमितीस हे क्षेत्र बाल्यावस्थेत असल्याने पृथ्वीभोवती  विविध कक्षेत फिरवले जाते. मात्र भविष्यात चंद्रांसारख्या ठिकाणापर्यत या मोहिमांचा विस्तार होणार हे सुर्यप्रकाश्याइतके स्वच्छ आहे.ज्याची छोटीसी  झलक आपणास सध्या या  अवकाश पर्यटन मोहिमांमधून दिसत आहे कोरोना पूर्व काळात ज्या प्रमाणे बँकॉक पटया  मलेशिया सह सिंगापूर किंवा पंधरा दिवास्यात युरोप सहलीच्या जश्या जाहिराती दिसत त्याच प्रमाणे पृथीवरील वातावरणाला कंटाळलात चला फिरून या अतंराळत अश्या जाहिराती दिसल्या तर नवल वाटायला नको. आजमितीस एक तासाच्या या पर्यटनासाठी अडीच कोटी रुपये लागतात. भविष्यात काही तंत्रज्ञान वापरुन हा खर्च 30ते 35लाखापर्यत कमी होवू शकतो, असा अंदाज आहे. या एक तासाच्या पर्यटनामध्ये वास्तविक पर्यटन हे पंधरा मिनीटे आणि शुन्य गुरुत्वाकर्षणाचा अनुभव तीन ते चार मिनीटांचे आहे
    सध्या यास प्रचंड खर्च येत असला तरी यामुळे अवकाश संशोधनाला चालना मिळत  याचा खर्च कमी होऊ शकतो अवकाश प्रक्षेपण यान किंवा उपग्रह प्रक्षेपणयानांवर सातत्याने होणार खर्च लक्षात घेऊन ज्या प्रमाणे एकापेक्षा जास्त वेळा वापरता येऊ शकणाऱ्या स्पेस शटलची निर्मिती करण्यात आली त्याच प्रकारची उपाययोजना या बाबत होऊ शकते सध्या ज्या प्रमाणे   उच्च मध्यवर्ग आणि श्रीमंत वर्ग आपल्या सुट्ट्या ज्या प्रमाणे घालवतात त्याच प्रकारे हा वर्ग अंतराळ पर्यटन करायला लागेल शून्य गुरुत्वाकर्षणाची अनुभूती घेत लोक सेल्फी घेवू लागतील.
या पर्यटनामध्ये भारताची इस्रो मात्र या स्पर्धेपासून कोसौ मैल दुर आहे. यासाठी गुरुत्वाकर्षण विरीहीत स्थितीला जूळवून घेण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते. भारतात कुठेच या प्रशिक्षणाची सोय नाहीये. हे उभारण्यासाठी प्रचंड खर्च येतो. त्यामुळे भारत या स्पर्धेपासून दुर आहे. आजमितीस ही स्पर्धा अमेरीका आणि पश्चिम युरोपीय देश यांच्यातच केंद्रीत आहे. आतापर्यंत या दूरप्रकारच्या मोहिमांसाठी देशाच्या अंतराळ संशोधन संस्थांचीच मदत  घेण्यात येत असे आता मात्र यासाठी अनेक अंतराळ पर्यटनाची निर्मिती करण्यात येत आहे
           यामुळे पर्यावरणास मोठा धोका उत्पन होण्याची शक्यता आताच काही पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करत आहे. यामुळे पृथ्वी लगत ओझोनचा थर वाढणे आणि पृथ्वी पासून दूरवर ओझोनचा थर पातळ.होणे ही मानवास अपायकारक गोष्ट घडण्याची शक्यता निर्माण होण्याची भीती पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करत आहे. पर्यावरणरक्षकांच्या मते लहानश्या वर्गाची मज्जा आणि मोठ्या वर्गास शिक्षा असे याचे स्वरुप असेल. एका अंदाजानुसार सर्वसामन्य उड्डाणाचा वेळी निर्माण होणाऱ्या कार्बन डाय आँक्साइडचा60 पट आणि नायट्रोजन आँक्साइडचा260पट गँसेस या उड्डाणामुळे निर्माण होवू शकतात. मानवी शरीर पृथ्वीवर राहण्यासाठी बनवले आहे. त्याचावर सातत्याने अवकाशात गेल्यावर काय परीणाम होतो याबाबत अजूनही पुरेसी माहिती नाही. तसेच या मध्ये जीवाचा धोका आहेच. मात्र तरीसुद्धा सुमारे  600लोकांनी याचा अनुभव घेण्यासाठी अर्ज केला आहे. या पर्यटनात तीन ते चार मिनीटे शुन्य गुरुत्वाकर्षणाचा अनुभव घेता येतो. तसेच पृथ्वीची वक्रता देखील दिसते. 
             नव्या युगाची झलक यातून दिसते असे म्हटल्यास वावगे ठरू नये 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?