बातमीतील पाकिस्तान (भाग12 )

         

    आपल्या महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी सत्ताधिकारी आणि विरोधी पक्षाकडून विविध दावे प्रतिदावे केले जात असतांना आपल्या भारताबरोबरच स्वातंत्र्य मिळालेल्या मात्र विकासाच्या बाबतीत आपल्यापेक्षा कैक वर्ष मागे असणाऱ्या आणि आपले शत्रू राष्ट्र असणाऱ्या  पाकिस्तानबाबत चार घडामोडी घडल्या . आपणास आपल्या शत्रूची पूर्ण माहिती असायलाच हवी असे आर्य चाणक्याचे वचन आहे याच वचनाला जागत या घडामोडींविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन या चार घडामोडींपैकी दोन घडामोडी प्रत्यक्ष आपल्याशी संबंधित आहे तर दोन घडामोडी चीन पाकिस्तान संबंधाविषयी आहे
        पहिल्यांदा चीन पाकिस्तनविषयक घडामोड बघूया या 2 घडामोडींपैकी एक चीनमार्फत पाकिस्तानमध्ये  उभारण्यात येणाऱ्या विकासप्रकल्पाविषयी आहे एक पाकिस्तानच्या लष्करी सामर्थ्याविषयी आहे  तर मित्रानो , चीनतर्फे पाकिस्तानात चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (जो सिपेक या नावाने प्रसिद्ध आहे . ) अंतर्गत विविध विकासकामे सुरु आहेत त्या अंतर्गत पाकिस्तानच्या खैबर ए पखतनूंवा ( आपल्याकडे वायव्य सरहद प्रांत नावाने प्रसिद्ध ) या प्रांतात एक धरण बांधण्याचे काम सुरु होते हे धरण दासू डॅम या नावाने प्रसिद्ध आहे . ते काम चीनच्या ज्या कंपनीकडे देण्यात आले होते त्या कंपनीने हे काम करण्यास पूर्णतः नकार दिला आहे .ज्यामुळे हा
प्रकल्प पूर्ण होणे जवळपास अशक्य आहे . या धरणाच्या उभारणीसाठी जे चिनी मनुष्यबळ या ठिकाणी कार्यरत आहे .त्याच्या जीवाला धोका असून या बाबत पाकिस्तनकडून पुरेशी सुरक्षा पुरवण्यात येत नाही असे कारण कंपनीकडून देण्यात येत आहे आणि कंपनीकडून हा नकार देण्यात आला आहे चीनचे पाकिस्तानमधीलमी राजदूत    चीनकडून उभारण्यात येणाऱ्या पाकिस्तानमधील विकास प्रकल्पाला पाकिस्तानी लष्कराकडून कश्या प्रकारे सरंक्षण देता येईल या बाबतपाकिस्तानी सरकारशी  चर्चा करत असताना हा मजकूर लिहीत असताना (14 ऑगस्ट रोजी )अद्याप यावर दोन्ही देशांकडून समाधानकारक तोडगा काढण्यात आलेला नाही 
              आता पाकिस्तानी लष्कराशी संबंधित घडामोड बघूया . तर चीन आणि पाकिस्तान यांची संयुक्त निर्मिती असलेली  जे एफ 17 ही विमाने पाकिस्तानी हवाई दलासाठी पंधरा हत्ती ठरत असल्याचे वृत्त डेली सन या वृत्तपत्राने दिले आहे भारताने निर्माण केलेल्या तेजसला प्रत्यतर म्हणून या विमानाकडे बघितले जात होते . या वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार जवळपास 50% जे एफ विमाने 17 पाकिस्तानी लष्कराने वापरणे बंद करून ती जमिनीवर उभी केले आहे . या इंजिनच्या निर्मितीतच असलेल्या दोषांमुळे पाकिस्तान भारताविरुद्ध ही विमाने वापरत नव्हताच ( या इंजिनातून मोठ्या प्रमाणात काळा धूर सोडला जातो ज्यामुळे ही विमाने सहज लक्षात येत असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे होते . डेली सन या वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार सध्या पाकिस्तनी हवाई दलाकडे असणाऱ्या  जे एफ 17 विमानापैकी बहुसंख्य विमानांना इंजिनासाठी हवा येण्याच्या ठिकाणी ,इंजिनातून धूर येण्याचा ठिकाणी तसेच विमानाचा हवेतील समतोल साधण्यात महत्वाची भूमिका बजवणाऱ्या शेवटच्या शेपटीच्या भागात तडे गेले आहे 
.             आता बघूया पाकिस्तान भारत या विषयीच्या घडामोडी 
             तर मित्रानो, 14 जुलै रोजी दासू डॅम ( वर उल्लेख आलाच आहे ) वर चिनी मनुष्यबळ घेऊन जाणाऱ्या बसवर बॉम्बहला झाला होता ज्यात 14 चिनी व्यक्ती मृत झाल्या होत्या . हा हल्ला भारतीय गुप्तचर संस्था (रॉ ) ने अफगाणिस्तान सरकारच्या मदतीने केल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे . ज्याला चिनी सरकारचे अधिकृत वृत्तपत्र असणाऱ्या ग्लोबल टाइम्स मधून संपादकीयाच्या माध्यमातून दुजोरा देण्यात आला आहे . भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर खराब करण्याचा हा डाव असल्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या जाणकारांचे मत आहे त्यांच्या मते भारत ज्या प्रमाणे पाकिस्तानमधील मानवी हक्क   उल्लंधनविषयी सातत्याने बोलतो त्याच प्रमाणे चिनी सरकारकडून होणाऱ्या  मानवी हक्क   उल्लंधनविषयी सातत्याने बोलणे सुरु करायला हवे . 
             आता बघूया पाकिस्तनविषयीची शेवटची घडामोड तर सध्या अफगाणिस्तानातील तालिबानच्या उदयाविषयी आणि अफगाणिस्तानात शांतता टिकवण्यासाठी समस्त जगात विविध प्रकारे चर्चा सुरु आहे . त्याच मालिकेत  संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते अफगाणिस्तानचे  संयुक्त राष्ट्रसंघातली प्रतिनिधींच्या विनंतीनंतर ही चर्चा आयोजित करण्यात येते सध्याच्या अफगाणिस्तानमधील लोकनियुक्त सरकारच्या मते अफगाणिस्तानमध्ये अशांतता पसरवण्यासाठी पाकिस्तान

जवाबदार आहे .तालिबानला विविध प्रकारे शस्त्रात्रे मदत तसेच वैद्यकीय साह्य देणे या सारखी कृत्ये पाकिस्तान करतो असा आरोप अफगाणिस्तानमधील लोकनियुक्त सरकारकडून करण्यात येत आहे . या आरोपांबाबत आणि अफगाणिस्तानमध्ये शांतता टिकवण्यासाठी काय करावे या बाबत चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . ज्यामध्ये भारताने पाकिस्तानला बोलावणे धाडले नाही . अफगाणिस्ताचा शेजारी आणि  अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी महतवाचा घटक असणाऱ्या पाकिस्तानला या बैठकीला ना बोलवता भारत नीच दर्जाचे राजकारण खेळत असल्याचा तसेच पाकिस्तानचा सहभागाशिवाय ही बैठक फलद्रुप होणार नाही असा  आरोप पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रसंघातली प्रतिनिधींने केला आहे 
 मित्रानो आपल्या शत्रूची पूर्ण माहिती असायलाच हवी असे आर्य चाणक्याचे वचन आहे या वचनानुसार मी आपणास दिलेली माहिती आपणास आवडली असेल असे मानून सध्यापुरते थांबतो , नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?