सावधान वणवा पसरतोय ....... !

           

   आपल्या भारतातील जवळपास सर्वच माध्यमे अफगाणिस्तान तालिबानविषयक बातम्या दाखवण्यात मग्न असताना हे संकट कमी वाटावे असे एक संकट पश्चिम युरोप आणि उत्तर आफ्रिका, आशिया खंडाचा अति ईशान्येकडील भाग  या भूभागात घोंगावत आहे . ते आहे प्रयत्नांची शर्थ करून देखील विझता न  विझणारी वणव्याची मालिका . मी आपणास तुर्की आणि ग्रीस मधील वणव्याविषयी पंधरा दिवसापूर्वी सांगितले होतेच.  ती आग अजूनही पूर्णतः नियंत्रणात आलेली नाही.  उलट भूमध्य समुद्रावरुन वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे ती अजून वेगाने पश्चिमेकडे पसरत आहे हा लेख लिहीत असताना ( 18 ऑगस्ट सायंकाळ ) ही  आग भूमध्य समुद्राला लागून असणाऱ्या अल्जेरिया (आफ्रिका खंडातील क्षेत्रफळाने पहिल्या क्रमांकावरचा देश ) मोरोक्को , या आफ्रिका खंडातील देशांबरोंबर युरोप खंडातील इटली , फ्रांस स्पेन पोर्तुगाल या देशात पसरलेली  आहे जर्मन सरकारची अधिकृत वृत्तवाहिनी असलेल्या DW या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार आतापर्यंत या वणव्याने सुमारे 4000 हेक्टर जमिनीवरील जंगले राखेच्या डोंगरात परिवर्तित केलेली आहे आणि ही  आग ताशी 4 किलोमीटर वेगाने पसरत आहे तर आशिया खंडाच्या अति ईशान्येकडील भाग  असलेल्या सैबेरिया भागातील वनव्याने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहे ग्रीस आणि तुर्की तसेच उत्तर अमेरिका खंडातील वणव्यांचा एकूण क्षेत्रापैकी जास्त क्षेत्रात हा वणवा पसरला आहे .पृथ्वीवर  ज्या ठिकाणी पूर्वापार मानवी वस्ती आहे अश्या ठिकाणांपैकी सर्वात जास्त
थंड हवामानाचा प्रदेश म्हणून सैबेरिया ओळखला जातो सैबेरिया पेक्षा थंड हवामान फक्त अंटार्टिका खंडात आढळते . मात्र त्या ठिकाणी मानवी वस्ती आता होत आहे पूर्वापार मानवी वस्ती होणारे ठिकाण म्हणून त्याची ओळख नाही . 11 ऑगस्ट रोजी इटलीतील सिसिली बेटावर युरोपातील आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे 48.6  अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे . 

   

 वणवा इतक्या मोठ्या प्रमाणावर लागण्यामागे मानवी कृती जवाबदार असल्याचे France 24 या फ्रांस सरकारची अधिकृत वृत्तवाहिनी असलेल्या वृत्तवाहिनीच्या बातमीत सांगितले आहे . मानवाने सुरवातीला निष्काळजीपणा दाखवल्यामुळे अनावधानाने लागलेल्या किंवा काही लोकांचे दुष्ट हेतू साध्य  करण्यासाठी  लावण्यात आलेल्या या वणव्याने  हवामानाच्या साह्याने इतके अक्राळविक्राळ स्वरूपधारण केले असल्याचे France 24 च्या बातमीत म्हंटले आहे.  या विषयी लिहण्यासाठी काही आंतरराष्टीय माध्यमांच्या  बातम्या बघितले असता हवामान बदलामुळे या प्रकारचा वणवा लागल्याचे तुरळक उलेख मला आढळले .मात्र कारण काही असले तरी या वणव्याचे जे व्हिडीओ टीव्हीवर आणि युट्युब चॅनेलवर दाखवण्यात येत आहे ते बघता हे संकट महा भयंकरच आहे . 

  हा लेख लिहण्यापर्यंत या वणव्यात 75 जणांचा मृत्यू झाला आहे .हजारो लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे .आर्थिक नुकसानीचा अधिकृत आकडा अजून समोर आलेला नाही , मात्र वणव्याची  तिव्रता बघता याचा आकडा खूपच मोठा असणार हे नक्की . यामुळे वातावरणात सोडल्या जाणाऱ्या ग्रीन हाऊस गॅसेसमुळे होणारे नुकसान फक्त भूमध्य सागराच्या सभोवतालच्या प्रदेशातच नव्हे तर जगात सर्वत्र सोसावे लागणार आहे ते देखील पुढील 

 कित्येक वर्षे म्हणजेच यामुळे  पर्यावरणीय नुकसानीचा विचार केला असता या धोक्याची तीव्रता लक्षात येते बरे या मध्ये जी झाडे नष्ट झाली आहे ती मोठमोठाली आहेत .वणव्याचे संकट कमी झाल्यावर त्या ठिकाणी झाडे लावली तरी ती आताच्या स्थितीत येण्यास काही वर्षाचा वेळ लागणार आहे तेव्हा ती कुठे आज इतका ऑक्सिजन हवेत सोडतील तो पर्यंत याचे दुष्परिणाम भोगणे मानवास क्रमप्राप्त आहे 

मानवाने आपण निसर्गावर कळत आणि नकळत किती अत्याचार करतो याचा विचार केलाच पाहिजे हेच या घडामोडींतून स्पष्ट होत आहे . आणि तो मानव करेलच अशी मनोमनी अशा व्यक्त करत सध्यापुरती आपली राजा घेतो नमस्कार . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?