अमेरिकेत वादळाचा प्रकोप !

     

              एकदा संकटे येण्यास सुरवात झाली की , एकामागून एक येतच राहतात त्यांची एकप्रकारची मालिकाच तयार होते  आपल्याकडे म्हणतात . याचाच अनुभव सध्या अमेरिकन घेत आहेत . आधी अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रचंड असे  तापमान आणि वणवे  लागल्यावर आता अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर निसर्ग त्याचा रुद्रावतार दाखवत आहे . हा मजकूर लिहीत असताना ( 23 ऑगस्ट सायंकाळ ) रोजी हेन्री या हरिकेने अमेरिकेच्या मुख्य भूमीवरील ईशान्य दिशेच्या सात राज्यातील प्रशासनाची झोप उडवली आहे एबीसी या ऑस्ट्रोलिअन सरकारच्या मालकीच्या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार या हरिकेनमुळे तब्बल एक लाख लोक विद्युत पुरवठ्यापासून दूर आहेत हरिकेन जमिनीवर आदळायच्या आधीच तासात 5 सेमी इतका प्रचंड प्रमाणात पाऊस पडत आहे . तर ताशी  60 मैल वेगाने वारे वाहत आहे , बऱ्याच ठिकाणी झाडे  उन्मळून पडली आहेत अनेक लोकांना सुरक्षितस्थळी हलवावे लागत आहे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे त्यामुळे अनेक
कार रस्त्यातच बंद पडत आहे. काही राज्यात राज्यस्तरीय आणीबाणी जाहीर करण्यापर्यंत वेळ तेथील प्रशासनावर आली आहेतेथील प्रशासन लोकांना घरातच थांबण्यास सांगत आहे . एन बी सी या अमेरिकेतील प्रमुख वृत्तवाहिनी असलेल्या वृत्तवाहिनीच्या युट्युब चॅनेलवर दिलेल्या बातमीनुसार या भागात मागचे हरिकेन सन 1991 रोजी आले होते. आपण 23 ऑगस्ट रोजी रात्री झोपून 24 ऑगस्ट ला झोपेतून उठू  वेळात  वादळ अमेरिकेच्या किनाऱ्यावर आदळले असेल . अमेरिकेच्या  किनाऱ्यावर दरवर्षी उन्हाळ्यात समशीतोष्ण कटिबंधात वादळे येतात . त्याच प्रमाणे हे वादळ आले  आहे मात्र दरवर्षीच्या तुलनेत सध्याचे वादळ खूप मोठे आहे .. आपल्याकडेही याच कारणास्तव मे महिन्यात वादळे येतात .जागतिक हवामानबदलामुळे अमेरिकेत  स्थिती निर्माण झाल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमाचा बातमीत म्हंटले आहे 
        जागतिक हवामान बदलाचा विचार करता अमेरिकी नागरिकांचे ग्रीन हाऊस गॅसचे वातावरणातील प्रमाण वाढवण्यात मोठे योगदान असले .तेथील अनेक सरकारची हवामान बदलाविषयी देश म्हणून करावयाच्या कृतीबाबत अनास्था असली तरी अमेरिकेतील संकट दुर्लक्ष करण्यासारखे नाही . अमेरिकन नागरिकांना त्याच्या 
कृतीची शिक्षा त्यांना मिळावी  बाबत म्हणता येऊ शकत नाही कोणाच्याही चुकीमुळे हे संकट उदभवले असले तरी यामध्ये सर्व  जातीचीच परीक्षा होणार आहे आता त्यांची परीक्षा होत असल्याने ते आता जात्यात असले तरी आपण सुपात आहोत आणि आपण सुद्धा काही वेळाने जात्यात जाणार आहोत हे नक्की . त्या दृष्टीने या प्रमाणात संकट  आपल्यावर आले तर आपली तयारी किती प्रमाणत आहे याचा अभ्यास  करायचा दृष्टीने आपण या घडामोडींकडे बघायला हवे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?