जरी एसटी वाल्यांचा अश्रू पुसायास आले!

   

  हे लिहीत असताना आज (25आँगस्ट) महाराष्ट्रात राजकीय बातम्यांचा महापूर माध्यमातून वहात असताना महाराष्ट्रातील एक मोठा वर्ग उद्याची चूल कशी पेटवायची? या विवंचनेत आहे.आपल्या महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाचे कर्मचारी अधिकारी हाच तो वर्ग. आँगस्ट महिना संपायला आला आहे. मात्र तरीही त्यांचे जूलै महिन्यांचे पगार झालेले नाहीत.कारण आपल्या एसटीकडे पगार करायला पैसेच नाहीत, आणि ही पहिल्यांदाच येत आहे, असे नाही, आपल्या एसटीवर ही सातत्याने येत आहे. काही डेपोच्या सेवा डिझेल नसल्याने बंद कराव्या लागत आहे. म्हणून म्हणावेसे वाटते जरी एसटी कर्मचाऱ्यांचे अश्रू पुसायास आले, तरी जन्म काही कामास आला! 
    आपल्या एसटी महामंडळावर ईतकी विपन्नावस्था येण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक कारण जे मी सातत्याने मांडतोय ते म्हणजे इतर राज्यांच्या एसटी आपल्या महाराष्ट्रातील एसटीचे करत असलेले शोषण. पुर्वी अनेक गावातील भिंतीवर अमूक रोगाचा रुग्ण दाखवा हजार रुपये मिळवा अस्या जाहिराती असत त्याच प्रमाणे महाराष्टातील असा तालूका दाखवा जिथे इतर राज्यातील एसटी येत नाही, दहा हजार रुपये मिळवा असी योजना सुरु करण्याईतके हे आक्रमण आहे. मध्यप्रदेशची एसटी नागपूरहून इलाहाबाद या उत्तर प्रदेशातील शहरासाठी सेवा पुरवते. मध्यप्रदेशला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही दोन्ही राज्ये लागून आहेत म्हणून असी सेवा पुरवणे कितपत योग्य आहे?  मला माहिती आहे की , नंदूरबार, सिंधूदुर्ग , नांदेड,  अस्या जिल्ह्यात एका राज्याची एसटी
दुसऱ्या राज्याचा आधार घेत तिसऱ्या राज्यात जाते.मात्र मी  उल्लेख केलेल्या सर्व ठिकाणी तीन राज्ये एकत्र येतात, { नंदूरबार या जिल्ह्याचा सीमा मध्यप्रदेश आणि गुजरात राज्याला लागून आहेत, तसेच मध्यप्रदेश आणि गुजरात यांच्यात देखील काँमन बाँडर आहे. तोच प्रकार सिंधूदुर्ग जिल्ह्यात कर्नाटक आणि गोवा राज्यांसाठी तर  नांदेड येथे कर्नाटक आणि तेलंगणाबाबाबत घडतो त्यामुळे तो एकवेळ क्षम्य आहे } या इतर राज्यातील एसटी बस आपल्या बसस्टँडमध्ये आपल्या एसटी बसशेजारी त्यांची बस उभी करुन सेवा देत आहेत. एकवेळ खासगी बस चालकांना आपण एसटी स्टँडचा पासून दूर नेवू शकतो.मात्र या बसेसबाबत आपण ते धोरण अमंलात आणू शकत नाही. ज्याचा फटका आपणास आता बसत आहे. 
कोरोना काळात बससेवा बंद होती. जी आता पुर्वपदावर येत आहे. याचा फायदा घेत कर्नाटक, मध्यप्रदेश आणि गुजरात राज्याच्या बसेस आपल्या राज्यात येण्यास सुरवात झाली आहे.तर गोव्याचा एसटीन अर्थात कदंब ट्रान्सपोर्टने आपल्या महाराष्ट्रात येण्यासाठी 1सप्टेंबरचा मुहुर्त निश्चित केला आहे. तेलंगणाबाबात काय स्थिती आहे, याचा जाणकरांनी खुलासा करावा ही विनंती.
एका राज्यातील एसटीची सेवा दुसऱ्या राज्यात देयची असल्यास आँल स्टेट रोड ट्रान्सपोर्ट युनियन या दिल्लीत मुख्यालय असणाऱ्या संस्थेचे नियम आहेत. {हे  नियम आपण www.asrtu.org  या वेबसाईटवर बघू शकतात.} मला काही कारणाने दोन वर्षापूर्वी पुणे ते सोलापूर या दरम्यान तेलंगणाचा एसटीने आणि पुणे ते कोल्हापूर दरम्यान गोव्याचा एसटीने(कदंब ट्रान्सपोर्ट) प्रवास करावा लागला. या दोन्ही वेळेस मला सबंधित एसटी याचे नियमन करत नसल्याचे दिसून आले. सध्याची स्थिती माहिती नाही. 
मला सुमारे अडीच वर्षापूर्वी कोल्हापूर ते पुणे गुजरात एसटीने प्रवास करावा लागला त्यावेळेस त्या एसटीच्या कंडक्टरने ही गुजरातची एसटी आहे, महाराष्ट्राची नाही. महाराष्ट्र एसटी ज्येष्ठ नागरीकांना अर्ध्या दराची सवलत देत असेल आम्ही देत नाही. असे सांगितल्याचे मला आठवते.  सांगायचा मुद्दा असा की आपल्या एसटीकडून देण्यात येणाऱ्या सोयी सवलतींचा आढावा घेवून इतर राज्यांचा एसटी देत नसलेल्या सोयी सुविधा विनाविलंब तात्काळ बंद करण्याची गरज आहे. परोपकार असण्याबाबत वादच नाही.. मात्र परोपकार कधी करावा, याला देखील मर्यादा असावी ना? स्वतः.भुकेने मरणासंपन्न असताना केलेल्या अन्नदानाचे महत्व ते काय ? मी एकदा नाशिकहून धूळ्याला जात होतो. माझ्या शेजारी एक व्यक्ती बसली, जिने दिव्यांगचे प्रमाणपत्र दाखवत भाड्यात सुट घेतली. मला ती व्यक्ती कोणत्याही अंगाने दिव्यांग वाटली नाही. सबब ज्या सवलतीचा काहीसा गैरफायदा घेतला जातोय,  त्याबाबत विचार होणे आवश्यक आहे. कारण या सवलतींचे पैसे न मिळाल्याने एसटीची ही बिकट अवस्था आहे.  
              आपल्या महाराष्ट्राच्या एसटीला मोठी वैभवशाली परंपरा आहे. सन1962 साली चीनविरोधी युद्धात आणि 1965 साली पाकिस्तानविरोधी युद्धात आपल्या भारतीय लष्कराला गरज असताना आपल्या एसटीने तात्काळ विनाविलंब बसेस तयार करुन दिल्या होत्या.1983 साली दिल्लीत आशियाई खेळांचे आयोजन करण्यात आले असताना आपल्या एसटीने त्यासाठी आलेल्या खेळाडूंना आरामदायी सेवा पुरवली होती. एकेकाळी आपले केंद्र सरकार आपल्या एसटीच दाखला देत ईतर राज्यांचा एसटीला सुधारण्यास सांगत असे.त्या एसटीला पुन्हा गतवैभव मिळून देण्यासाठी ही बाब अत्यंत गरजेची आहे  एसटीचा तोटा होण्यासाठी अनेक कारणे आहेत त्यातील मला प्रमुख वाटणाऱ्या कारणांविषयी मी व्यक्त केलेले मत आपणास आवडले असेल असे मानून सध्यापुरते रजा घेतो, नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?