लाल चिखल !

 

   मला शाळेत असताना मराठी या विषयामध्ये एक धडा होता, "लाल चिखल!"  या धड्यातील नायकाच्या वडीलांनी बाजारात विकण्यासाठी टँमोटो आणले असतात. त्यावेळी बाजारात अनेकांनी टामँटो आणलेले असल्याने टामँटोचे भाव पडतात. पडलेल्या भावामध्ये टामँटो विकण्यासाठी नायकाचे वडील तयार नसल्याने बाजार संपण्याची वेळ येते तरी त्यांचे काहीच टामँटो विकले जात नाही. परीणामी अत्यंत निराश होवून नायकांचे वडील ते पायदळी तूडवतात. त्याचा अक्षरशः चिखल करतात. टामँटोचा रंगामुळे त्याचा रंग असतो, अक्षरशः रक्ताचे पाणी करुन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे यथोचित मुल्य न मिळाल्यामुळे होणारी मनोवस्था यात मांडण्यात आली होती. शाळेतील या धड्याचा उल्लेख करण्याचे कारण गेल्या आठवड्याभरात नाशिक जिल्हयातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टामँटो या पिकाला मिळालेला अत्यल्प भाव .
        गेल्या आठवड्यापासून नाशिक जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन बाजार समितीत शेतकऱ्यांना टामँटो पिकासाठी  किलोला 2 ते 3 रूपये भाव  मिळाला आहे. नाशिकच्या टामँटोसाठी हक्काची बाजारपेठ असणाऱ्या पाकिस्तानशी व्यापार बंद असणे, देशांतर्गत फारशी मागणी नसणेआणि  झालेले विक्रमी उत्पादन ही या मागची कारणे सांगितली आहेत. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या खर्चा उत्पादन खर्च सोडूनच द्या , दळणवळण खर्च देखील सोडून
द्या, टामँटोची वाहतूक ज्या क्रेटरद्वारे होते, ते क्रेटर टँक्टरमधून उतरवून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नेण्यासाठी होणारा मजूरांवरील खर्च देखील सुटत नसल्याचे यावाषयीच्या काही बातम्यांमध्ये म्हटले आहे.
      कधी नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडून पिक मातीमोल होते, तर कधी अस्या मानवनिर्मित संकटामुळे शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ येते. गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. हवामानशास्त्र तज्ज्ञांनुसार हवामान यापुढे अधिकाधीक लहरी बनणार आहे मात्र यावर काही ठोस करण्याऐवजी आपण अन्यच गोष्टींमध्ये गुंतून राहतोय. जगाचा पोसिंदा म्हणून गौरव करायचा किंवा मराठीतील ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांची "सांगा माझ्या बापाने नाही केला तर तूम्ही काय खाल धतूरा" आदी कविता मोठमोठ्याने गायचा मात्र हे सर्व ज्यासाठी चालले आहे त्या शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडायचे हेच पुर्वापार चालू आहे
    .मुळात गरज आहे, शेतमालावर प्रक्रिया करुन ठेवणाऱ्या उद्योगांची उभारणी करण्याची .शेतमाल नाशवंत असतो त्यामुळे मागणी कमी असताना या उद्योगाची मदत होवू शकते. आपल्याकडे जूलै महिन्यात आणि आँक्टोबर महिन्यात गाव निहाय तलाठ्यांचा सर्व्हे असतो, ज्यामध्ये गहु , तांदूळ ज्वारी बाजरी यांचाखाली किती क्षेत्र आहे, याचा आढावा घेण्यात येतो, या सर्व्हेक्षणाचा फायदा सरकारला पुढील नियोजन करण्यात होतो, कांदा, टामँटो आणि भाज्या यांची वर्गवारी एकत्रच फळ पिक म्हणून होते.  या सर्व्हेक्षणात बदल करत प्रत्येक पिकाचे स्वतंत्र सर्व्हेक्षण होण्याची नितांत आवश्यकता आहे. जर असे सर्व्हेक्षण झाले तर या चित्रात खुपच सकारात्मक बदल होवू शकतो. शेतकऱ्यांना देश विदेशात आपले उत्पादन विकण्याची परवानगी देवून शेतीचे प्रश्न सुटणार नाही. तर शेतकऱ्यांना कोणते पिक कधी बाजारात आणायचे ? याबाबत मार्गदर्शन करायची गरज आहे, असे मला वाटते. शेती हा विषय समवर्ती सुचितील विषय आहे. त्यामुळे राज्य सरकारे आणि केद्र सरकारे दोन्ही त्याविषयी कायदे करतात. जर यामध्ये विसंगती झाल्यास केंद्र सरकारचा कायदा प्रभावी ठरतो.  केंद्र सरकारकडून एखाद्या राज्यातील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्याला पुरक असे अध्यादेश काढले जाते, यात भरडला जातो ते विशिष्ट राज्य सोडून
अन्य राज्यातील शेतकरी. यासाठी मला वाटते हे टाळण्यासाठी शेती हा विषय समवर्ती सुचीतून काढून टाकून राज्यसुची किंवा केंद्रसुचीत टाकावा, ज्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती सुधारु शकते असे मला वाटते
   भारत आजदेखील कृषिप्रधान देश आहे. देशाच्या जिडिपिमध्ये शेतीचा वाटा अत्यल्प असला तरी (कोरोना कालावधी सोडून देवूया ) खुप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या शेतीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या शेतीवर अवलूंबून आहे. त्यामुळे शेतीसी सबंधित छोट्यासा गोष्टीचा देखील मोठ्या प्रमाणावर परीणाम होतो. आज नाशिक जिल्ह्यातील टामँटो उत्पादक ज्या स्थितीत आहे, त्या स्थितीत शेतकरी आल्यावर तात्पुरती उपाययोजना होते. मात्र दिर्घकालीन काहीही होत नाही. मात्र गरज आहे दिर्घकालीन उपाययोजनांची तर.आणि तरच जगाचा पोसिंदा जगू शकतो! 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?