भयानक वास्तवाकडे वाटचाल (भाग 10)

         

     एखाद्याची अपयशाची मालिका झाली की ,  त्याच्या कडून स्वतःच्या अपयशाला साह्य होईल अश्या कृती नकळतपणे घडतात आणि त्याची अपयशाची मालिका अधिक वेगाने घडायला लागतात असे आपल्याकडे म्हणतात सध्या अमेरिकी प्रशासन याच अनुभवातून जात आहे . अमेरिका अफगाणिस्तानमधून पूर्णतः जाण्याचा दिवस जसजसा जवळ येत आहे त्या प्रमाणात अमेरिकेचे हे अपयश अजूनच ठळक होत चालले आहे . ज्याची अप्रत्यक्ष कबुली अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर इस्लमिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया या दहशतवादी संघटनेचा  आंतराष्ट्रीय विभाग म्हणून ओळखला जाऊ शकेल अशा गट म्हणजेच  खुरासन प्रॉव्हिन्स या गटाने  हल्ला केल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत केली . या पत्रकार परिषदेत त्यांची देहबोली हि पराभूत मानसिकता दाखवणारी होती .काबुल आतंरराष्ट्रीय विमानतळ ज्याला तालिबानच्या पहिल्या पाडावानंतर अफगाणिस्तानचे पहिले लोकनियुक्त राष्ट्रपती हमीद करझाई यांचे नाव देण्यात आले आहे .
त्या विमानतळाच्या दरवाजवळ  आणि विमानतळाच्या जवळच असणाऱ्या हॊटेलच्या दरवाजवळ असे दोन बॉम्बस्फोट 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी झाले ज्यामध्ये अमेरिकी लष्कराचे 11 जवान आणि  अमेरिकी  हवाई दलाचा एक जवान तर अन्य एक अमेरिकी नागरिक असे एकूण व्यक्ती मृत्युमुखी पडल्या यामध्ये अनेक अमेरिकी  जखमी झाल्या आहेत या बॉम्ब हल्यात या अमेरिकी नागरिकांसह 28  तालिबानी मरण पावले तर एकूण बळींची संख्या हा लेख लिहीत असताना 90 आहे .याविषयीची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली 
           तालिबानी लोकांनी काबुल जिंकल्यावरची विदारक भयानक हे शब्दही अपुरे पडावेत अशी झाल्याचे आपण या आधी टीव्हीवर बघितले असेलच अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या नेतृत्वात लढणाऱ्या फ्रांस जर्मनी आदी देशांनी लष्कर अफगाणिस्तानमधून  पूर्ण बाहेर नेल्याचे जाहीर केले आहे.  तर युनाटेड किंग्डम या देशाने त्यांचे जवळपास सर्व लष्कर बाहेर आल्याचे जाहीर केले आहे .अमेरिकेने लशंकर बाहेर गेल्यावरही बचाव कार्य सुरूच राहणार असल्याचे जाहीर केले आहे बॉम्ब हल्ल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भावनाविवश झाल्याचे दिसून आले यामध्ये त्यांनी अमेरिकी नागरिकांचे बलिदान आम्ही विसरणार नाही दोषींना शासन करूच असे सांगितले आहे 
   आपण आखाती देशांच्या इतिहासात थोडेसे मागे गेल्यावर इस्लमिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया सुद्धा अमेरिकेच्या काही कारण नसताना उकरून आलेल्या मात्र या[ अपयशी  युद्धाचाच परिपाक आहे हे दिसून येते इराकच्या हुकूमशहा सद्दाम हुसेन यांच्याकडे जगाच्या नॅश करू शकतील अशी संहारक  शस्त्रें  आहेत अशी
बतावणी करत अमेरिकेने इराकवर जग कल्याणाचा आव आणत आक्रमण केले सुदाम हुसेनचा खात्मा झाल्यावर इराककडे अशी कोणतीही शस्त्रे असल्याचे आढळून आले नाही मात्र इराक आणि सभोवतीलाच प्रदेश प्रचंड अश्या राजकीय संकटात सापडला ज्यामुळे इस्लमिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया सारख्या दहशतवादी संघटनेच्या उदयास अनुकूल स्थिती निर्माण झाली ज्याची शिक्षा आता अमेरिका भोगत आहे . अमेरिकेमुळेच तालिबानची निर्मिती झाल्याचे आपणास आठवत असेलच असो अमेरिकेला शिक्षा होताना काही दोष नसणारे निपराध सुद्धा होरपळले जातात हे मात्र दुःखकारक आहे भविष्यात त्यांना कमीतकमी त्रास होऊन अमेरिकेला त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळो अशी मनोकामना करून सध्यापुरते थांबतो , नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?