रम्य ही स्वर्गाहुन लंका ?

   

 आपल्या मराठीत एक अत्यंत मस्त गाणे आहे." रम्य ही स्वर्गाहुन लंका, " 1960 साली आलेल्या 'स्वयंवर झाले सितेचे' या मराठी चित्रपटातील पंडीत भीमसेन जोशी यांनी गायलेले आणि गदिमांनी रचलेले हे गाणे. लंकेची रावणाचे राज्य असताना असलेली  श्रीमंती सांगणारे हे गाणे.  आपल्या मराठीत सुद्धा सोन्याचा वीटांसाठी लंकेचीच निवड केली आहे. एकंदरीत लंका ही समृद्ध देशांमध्ये मोडणारी असावी असे यावरुन  समजते.
   आजमितीस मात्र ही लंका सध्या नरकाहुन वाईट अस्या स्थितीत आली आहे. तेथील जनता शद्बशः लंकेची पार्वती सारखे झाली आहे. मी हा मजकुर लिहीत असताना ( गुरुवार 2 सप्टेंबर रोजी)20 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात परकीय चलन फक्त 28 कोटी अमेरिकी डाँलर इतकेच शिल्लक आहे. ज्यातील 15 कोटी अमेरीकी डाँलर त्यांना 2021 च्या अखेरीपर्यंत चूकवायचा कर्जासाठी खर्च करणे अत्यावश्यक आहे. म्हणजेच उरलेल्या 13 कोटी अमेरिकी डाँलरमधूनच त्यांना आपल्या जनतेची पोट भरावयाचे आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था मुख्यतः पर्यटनावर अवलूंबून आहे. सध्याचा कोरोना साथीमुळे पर्यटन बंद आहे. परीणामी अर्थाजनाचा मुख्य स्त्रोत बंद आहे. श्रीलंकेमध्ये भाजीपाल्यापासून अनेक गोष्टींची आयात होते. मात्र अपुऱ्या परकीय चलन साठ्यामुळे फारशी आयात करता येत नाहीये. परीणामी तिथे अन्नधान्याचे पेट्रोलचे रेशनिंग करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी लष्कराची मदत घेतली जात आहे. श्रीलंकेत अन्नधान्याचा दुकानासमोर मोठ मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. तिथे आर्थिक आणिबाणी जाहिर करण्यात आली आहे.आपल्या भारतावर 1991साली आर्थिक अरीष्ट आले होते, मात्र आपल्याकडे आर्थिक आणिबाणी जाहिर करण्यासारखी वेळ आली नव्हती. जी आता श्रीलंकेवर आली आहे. यावरून श्रीलंकेतील आर्थिक अरीष्टतेची कल्पना यावी.
    यातून बाहेर पडण्यासाठी कर्ज घ्यावे तर मुडी सारख्या वित्तीय संस्थांनी काहीसा नकारात्मक अहवाल दिल्याने वल्ड बँक, आशियाई डेव्हलपमेंट बँक, इंटरनँशनल माँनिटरी फंड सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्ज पुरवठ्या करणाऱ्या संस्थांकडून कर्ज घेण्यावर मर्यादा आहेत..परीणामी चीन सारख्या सावकारी करणाऱ्या देशांकडून त्यांचा अटी मान्य करत कर्ज घेणे क्रमप्राप्त आहे. एखाद्या माणसाचे आधीचे कर्ज थकल्याने बँकांनी त्यास दारात उभे न करणे आणि त्यामुळे त्यांनी अवास्तव व्याज घेणाऱ्या खासगी सावकाराकडांकडून कर्ज घ्यावी असी स्थिती श्रीलंकेची आहे. भारत लंकेला यथाशक्ती मदत करत आहे. मात्र त्यास मर्यादा आहेत, चीन एव्हढी मदत आपण  लंकेला करु शकत नाही. ज्याप्रमाणे खाजगी सावकर व्यक्तीचे कर्ज थकल्यावर सबंधित व्यक्तीची मालमत्ता स्वतःकडे घेतो,
त्याप्रमाणे चीन आपण दिलेले कर्ज थकल्यावर त्या देशातील काही बंदरावर आणि इतर.मालमत्तेवर आपला दावा सांगतो. श्रीलंकेचे हब्बनपोर्टा हे बंदर अस्याच कारणांमुळे चीनकडे 99वर्षासाठी गेले आहे. जर श्रीलंकेचा अधिक भुभाग चीनकडे गेल्यास भारताला ते परवडणारे नाही. त्यामुळे उत्तरेबरोबर दक्षीण बाजूला देखील चीन येईल त्यामुळे श्रीलंकेतील आर्थिक अरिष्ठ भारतासाठी देखील डोकेदुखी ठरत आहे. 
    श्रीलंकेने त्यांचा एकुण कर्जापैकी 2%कर्ज भारताकडून तर 10% चीनकडून घेतल्याचे सांगण्यात येत आहे मात्र काही तज्ज्ञांचा मते हा चीनकडून श्रीलंकेने घेतलेल्या कर्जाबाबत त्याचा व्याजदराबाबत श्रीलंका कधीही खरे आकडे स्वतःच्या जनतेसमोर आणि जगासमोर आणत नाही. सबब या आकड्याबाबत साशंकता आहे.
आपल्यानंतर एका वर्षाने ब्रिटीशांपासून स्वतंत्र्य झालेल्या आणि इंडो युरोपियन भाषाकुळातील एक भाषा असणाऱ्या  सिंहली ही प्रमुख भाषा असणाऱ्या या देशासी आपले पुर्वापार घनिष्ठ सबंध आहेत. रामायणाचा संदर्भसोडून त्यांचा रेडीओ आपल्याकडे एक मनोरंजनाचा उत्तम पर्याय होता. त्यांचा अंतर्गत यादवीमुळे आपण आपला एक पंतप्रधान गमवला. अनेक भारतीय वंशाचे लोक तिथे राहतात.ब्रिटीश राजवटीत आपल्या येथून अनेक लोक तिथे गेले. भारताबरोबर श्रीलंका बिमस्टेक सार्क आदी अनेक संघटनांचा सदस्य आहे. त्यामुळे तेथील अरिष्टेचा आपल्यावर.देखील परीणाम होणारच, हे सुर्यप्रकाश्याईतके सत्य आहे. गरज आहे तो कमी कसा होईल,हे बघण्याची. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?