कोरोनामुळे शेतीचे झालेले नुकसान


सध्या आजमितीस सर्वच जग कोरोनामुळे धास्तावले आहे, हे सर्वश्रूत आहे. जगाचे व्यवहार प्रचंड प्रमाणात मंदावले आहेत. कोणीच यातून सुटलेला नाही.  जगाचा पोशिंदा, अन्नदाता म्हणून ओळख असलेला शेतकरी वर्ग देखील यातून सुटलेला नाही. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान यामुळे झालेले आहे. आपल्या भारताचा विचार करता कृषी क्षेत्राचा जिडीपी अन्य क्षेत्राचा विचार करता काहीस्या सकारात्मक असला तरी या कोरोनाच्या विळख्यातून कृषी क्षेत्र देखील सुटलेले नाही  .
कोरोनामुळे लादण्यात आलेल्या लाँकडाऊनच्या काळात शहरी नागरीकांना घराजवळ भाजीपाल्याची सोय केलेली असली तरी , शेतकऱ्यांना  मोठ्या प्रमाणात फायदा देणाऱ्या पिकांची निर्यात बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना विविध नामांकित हाँटेलला  विविध रंगातील सिमला मिरच्यांचा विक्रीतून मोठ्या प्रमाणात नफा होत असतो. लाँकडाउनच्या काळात हाँटेल व्यवसाय पुर्णतः बंद असल्याने  शेतकऱ्यांना याचा फारच मोठा फटका बसला आहे.
   शेतकरी जो नफा मिळवतो, त्यामध्ये हाँटेलला माल पुरवणे आणि आंतरराष्ट्रीय निर्यातीचा वाटा मोठ्या प्रमाणात असतो. द्राक्षे, आंबे, विविध मसाले, फळे  यांची निर्यात आपल्या भारतातून होते. देशांतर्गत बाजारपेठेतून त्यास अत्यल्प नफा होत असतो. लाँकडाउनच्या काळात निर्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात रोडावली होती, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 कोरोना लाँकडाउनच्या काळात काम करण्यास पुरेसे मनुष्यबळ नसल्याने,  आहे त्या मनुष्यबळाचा वापर करण्यासाठी त्या मनुष्यबळाने सांगितलेल्या रक्कमेमध्ये शेतकऱ्यांना त्यांचाकडून कामे करायला लागली.
लाँकडाउन  मार्चचा अखेरीस सुरू झाले. शेतकऱ्यांचा दृष्टीने हा कालावधी मान्सुमपुर्व कामाचा असतो. ज्या साठी काही प्रमाणात मनुष्यबळ लागते, जरी लाँकडाउनच्या अखेरच्या टप्यात शेतीविषयक संसाधनाची दुकाने उघडली असली तरी अन्य सर्व व्यवहार ,दळणवळण बंद असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड देत आपली शेतीविषयक कामे करावी लागली , ज्यामध्ये सर्वसाधरणपणे शेतकऱ्यांना खर्च करावा लागणाऱ्या रक्कमेपेक्षा अधिक रक्कम खर्च करायला लागली.  परीणामी उत्पादन खर्चात वाढ झाली मात्र जास्त रक्कम खर्च करायला लागूनही उत्पादन सर्वसाधरण स्थितीपेक्षा  कमी भावात विकावे लागले .त्यामुळे उत्पानात घट मात्र खर्चात वाढ अस्या संकटात शेतकरी अडकला.  
 भारतातील  सर्वसामन्य शेतकरी  आपले उत्पादन बहुदा जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विकतो,त्याठिकाणी शेतकऱ्यांस अनेक खर्च करावे लागतात, कोरोना संसर्गाचा काळात संचारावर अनेक बंधने असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांचा खर्चातही वाढ झाली. मात्र दळणवळणाच्या सोयी पुरेस्या प्रमाणात नसल्याने व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून पुर्वीच्या प्रमाणात खरेदी केली नाही. परीणामी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले..कृषी उत्पादने नाशवंत असल्याने आणि शेतकऱ्यांजवळ भाजीपाला साठवण्यासाठी पुरेसी यंत्रणा नसल्याने मिळेल त्या भावात त्यास ती व्यापाऱ्यांना विकावी लागली.  त्यामुळे शेतकऱ्यांना इच्छित उत्पादन मिळू शकले नाही. त्यामुळे त्याचा इच्छा आकांक्षावर काही प्रमाणात पाणी फिरले. 
कोरोना लाँकडाउनच्या काळात शेतकऱ्यांनी शहरी जनतेला घराजवळ भाजीपाला विकला असला तरी तो विकायला वेळेचे बंधन असल्याने, शेतकऱ्यांस अपेक्षीत फायदा झालाच नाही.
कोरोना लाँकडाउन उठल्यावर व्यवहार पुर्वपदावर येत असताना लोकांचा मनात धास्ती बसल्याने शेतकऱ्यांचे जोडधंदे म्हणून ओळखले जाणाऱ्या कुकुटपालन, शेळीपालन आदींकडे लोकांनी पाठ फिरवली त्यामुळे एकीकडे भाजीपाल्यास पुरेसी किंमत मिळत नाही. दुसरीकडे मटण चिकनाविषयीचा अफवांमुळे त्याला जवळपास शुन्य उठाव यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला  दोन्ही बाजुंनी त्याचे उत्पनाचे स्त्रोत बंद झाले. परीणामी शेतकऱ्यांचे उत्पन लक्षणीय प्रमाणात घटले.
   त्रआता जनजीवन पुर्वपदावर येत असताना  भारतीय उत्पादनाची बाजारपेठ असणाऱ्या युरोपीय देशात,अमेरीकेतील जनजीवन अजून पुर्वपदावर येत नसल्याने  त्यास अजुन पुरेसी मागणी नाही. मागणी कधी वाढेल ?याची काहीही निश्चिती नाही. शेतीचे आंतीम उत्पादन, आणि पेरणी यामध्ये काही दिवसांचा अवधी लागतो, त्याचा आढावा घेवून तेव्हढा आधी पेरणी करणे शेतकऱ्यांना अशक्य आहे. परीणामी भविष्यात मागणी वाढल्याने भाव वाढले तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना घेता येणे निव्वळ अशक्यच .
 या सर्व अडचणी शेतकऱ्यांचा आयुष्यात निर्माण झाल्या त्या कोरोनामुळे . कोरोना येत्या काही दिवसात पुर्णतः जाइलही ..मात्र शेतकऱ्यांचा आयुष्यावर उठलेले वण्र इतक्यात जाणे निव्वळ अशक्यच

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?