केल्याने दुर्गपर्यटन

      निसर्गाच्या सानिध्यात राहलो तर आपण अधिक काळ जिवंत राहू शकतो, असे वैद्यकशास्त्रातील मान्यवरांचे म्हणणे असते.यामुळे रोजच्या धक्काधकीचा जीवनातून वेळात वेळ काढून लोक निसर्गाचा सानिध्यात जाण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते विविध किल्यांवर थंड हवेच्या ठिकाणी,वनांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात.सिमेंटच्या जंगलातून बाहेर पडत खऱ्या विविध वनस्पतीच्या जंगलात जातात. मी सुद्धा त्यास अपवाद नाही. आणि त्यासाठीच मी विविध समाजोपयोगी कामे करणाऱ्या गरुडझेपच्या दुर्गवीरांच्या साथीने  5सप्टेंबर रोजी नाशिकपासून जवळच असणाऱ्या कावनाई या किल्ल्याला भेट दिली.
    कावनाई हा किल्ला नाशिकपासून हाकेच्या म्हणजेच सुमारे 55 किमी आहे. नाशिकहून इगतपूरी कडे जाताना घोटीच्या आधी उजव्या हाताला एक फाटा फुटतो, त्या फाट्यातून सुमारे सात आठ किमी प्रवास केला की आपण किल्ल्याचा पायथ्यासी पोहोचतो. किल्ला हा टेहळणीसाठी वापरण्यात येत होता.किल्ल्याची चढाई सोपी या प्रकारातील आहे. सुमारे अर्धा ते पाउण तासात आपण सहजतेने किल्ला चढू शकतो.या किल्ल्याचा फारसा इतिहास उपलब्ध नाही गडावर एक देवी मंदिर , एक उघड्यावर असणारी शिव पिंड आणि एक तळे आहे.. तळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि आकाराने सुद्धा मोठे असणारे मासे आढळून येतात.किल्ल्याचे बाकी अवशेष कालोघातात पडलेले आहे..किल्ल्याचा पायऱ्या ब्रिटीश राजवटीत तोडण्यात आलेल्या असल्याने आता या ठिकाणी लोखंडी पायऱ्या बसवलेल्या आहेत .त्यामुळे किल्याची चढण सोपी होते
     किल्याचा पायथ्यासी कावनाई हे तिर्थक्षेत्र आहे सिहस्थ कुंभमेळ्याचे प्राचीन स्थान म्हणून हे स्थान प्रसिद्ध आहे. याचा जिर्णोधार पेशव्यांकडून करण्यात आला. या तिर्थक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, मात्र तिर्थक्षेत्राचा तूलनेत या किल्ल्यावर खुपच कमी दुर्गप्रेमी भेट देतात..किल्ला चढाइला सोपा असल्याने नवशिक्के दुर्गप्रेमीसुद्धा देखील या किल्ल्यावर येवू शकतात त्यामुळे या किल्ल्याला भेट देयलाच हवी
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांचे विभाजन करणाऱ्या सह्राद्री पर्वतरांगेचे इगतपुरी तालूक्यात दोन शाखेत विभाजन होते. पुर्वेकडे जाणारी रांग आणि पश्चिमेकडे जाणारी रांग हे ते विभाजन.पुर्वेकडची रांग कळसुबाईची रांग म्हणून ओळखली जाते. या रांगेत अलंग मलंग कळसुबाई ही शिखरे आणि किल्ले येतात तर पश्चिमेकडच्या रांगेत त्रिंगलवाडी,अंजनेरी ब्रम्हगिरी आणि हा कावनाईचा किल्ला येतो.
नाशिकपासून हाकेच्या अंतरावर असलेला हा किल्ला एका दिवसात सहज बघता येवू शकतो.चढई सोपी असल्याने फारशी दमछाक देखील होत नाही .मग बघणार हा किल्ला !.
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?