ब....... बुद्धिबळाचा (भाग 3)

     

   सध्या गणेशोत्सवामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना दुधात साखर पडावी , अशी घोडदौड बुद्धिबळ ऑलम्पियामध्ये  भारताचा संघ करत  आहे.   8 सप्टेंबररोजी दोन संघाना पराभवाचे पाणी पाजून आणि एका संघाबरोबर बरोबरी करत स्वतःच्या पूलमध्ये दुसरे स्थान मिळवलेल्या भारताच्या संघाने 9 सप्टेंबर रोजी त्याहून उत्तम कामगिरी करत स्वतःचा पूलमध्ये प्रथम स्थान मिळवले .भारतीय बुद्धिबळ संघाने  9 सप्टेंबर रोजी झालेल्या मॅचेसमध्ये तिन्ही संघांविरुद्ध विजयश्री मिळवत हंगेरीला मागे टाकत पूलमध्ये प्रथमस्थानावर  होण्याचा विराजमान होण्याचा मान मिळवला  
 .या स्पर्धेत चीनने दोन संघ उतरवले आहेत एक संघ चीन या नावाने खेळात आहे तर दुसरा संघ सेंझान चीन या नावाने खेळत आहेत त्यातील सेझान चीन या संघाविरुद्ध पाच विरुद्ध एक अशा सरळ विजय मिळवत भारताने या यशाला गवसणी घातली आहे .या सेझान चीन खेरीज अझरबैजान या देशाविरुद्ध चारदेशाविरुद्ध   विरुद्ध दोन आणि बेलारूस या देशाविरुद्ध साडेतीन विरुद्ध अडीच अशी कामगिरी करत भारतीय बुध्दिबळसंघाने ही  कामगिरी केली आहे . 
          चीनविरुद्धच्या लढतीत आर वैशाली यांनी ली ज्यूंचा तर पेटला हरिकृष्ण यांनी जेंग चोंगशेंगचा पराभव केला अधिबन याने यु रुईयूआन याच्यावर मत केली . मराठमोळ्या भक्ती कुलकर्णी यांनी जु टोंगो यांना पराभवाचा रस्त्या दाखवला . कोनेरू हंपी यान मात्र झाओ जु कडून पराभव स्वीकारावा लागला . भारताने सेंझीन चीनविरोधात   लढताना 5 डाव जिंकले तर एक डाव गमावला .निहाल सारीं यांनी हॉवेन यांना पराभूत केले .  9 सप्टेंबर रोजी दुसरा संघ म्हणून भारताला अझरबैजानबॊर्बर खेळावे लागले अझरबैजानबरोबर खेळताना भारतचा कप्तान विश्वनाथन आंनद यांनी राद्जोधव तीमुरविरुद्ध डाव बरोबरीत सोडवला.चीनविरोधात पराभवाचा धक्का बसलेल्या कोनूरी हंम्पी मात्र जोरदार पुनरागमन करत मम्मजदा गुनायूचा पराभव केला. निहाल सरीन यांनी हासडली वूगारे  यांना पराभवाची धूळ चारली . नाशिकचे आयकॉन ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांनी ममेदिरोव शखारियारी यांच्यातील डॉ बरोबरीत सुटला हारिक द्रोणवली आणि मम्मडोवा गुलनारी यांच्यातील डाव तसेच आर वैशाली आणि बालाजया खमिम यांच्यातील डाव बरोबरीत सुटला .भारताने  अझरबैझानविरुद्धच्या 6 डावामध्ये 4डाव बरोबरीत तर 2डावात विजयश्री खेचून आणला आणि 4 विरुद्ध 2 असे यश संपादित केले.बेल्जीयमविरुद्धचा डावात भारताला कष्टसाध्य विजय मिळवला. भारताचा कप्तान विश्वनाथ आनंद यांनी अलेवजेद्रोव अलेक्सेजो यांचा
पराभव करत अत्यंत विश्वासदायी सुरवात केली मात्र तानिया सचदेव आणि तारस्नेक अलीकसह यांच्यातील तसेच नाशिकचे आयकॉन विदित गुजराथी आणि फेडेरोव  अलेक्सिविरद्धचा डाव बरोबरीत सुटला, अनेक बुद्धिबळपटुना नाशिकचे आयकाँन विदीत गुजराथी प्रतिस्पर्ध्यावर सहजतेने मात करतील असी आशा होती. मात्य मात्र 
 प्रग्नानंद यांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना लाजाविक डोनोसेकडून पराभव स्विकारावा लागला. आर वैशाली यांचा जोलीअन्तसेवा केन्सिया यांच्यातील लढत बरोबरीत सुटली.  मात्र फेडेरोव  अलेक्सिव यांनी आपल्या कौशल्याने डाव बरोबरीत सोडण्यास भाग पाडले. मराठमोठ्या भक्ती कुलकर्णी यांनी प्रतिस्पर्ध्यावर विजय नोंदवत बेल्जीयमविरुद्धचा लढतीचा शेवट गोड केला.त्यांनी नार्मन केविसाया यांना हत्ती आणि वजीराच्या उत्कृष्ट चाली रचत प्रतिस्पर्ध्याला हरवले..
     आता 10सप्टेंबर रोजी पुलमधील अखेरच्या तीन लढती जिंकल्यावर भारत बाद फेरीत प्रवेश करेल. आतापर्यत बुद्धीबळ संघाचा अश्व जसा मोठ्या दौलाने पुढे जात आहे तसाच तो मार्गाक्रमन करत जावा, असी गणरायाचा चरणी प्रार्थना करुन सध्यापुरते थांबतो, नमस्कार.       

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?