ब....... बुद्धिबळाचा (भाग 4)

       


  भारताची बुद्धिबळ ऑलम्पियाडमधील  यशस्वी घोडदौड सुरूच आहे . ऑलम्पियाडमधील  रॉबिन राउंड (  जिंकला अथवा हरला तरी ठरलेले सामने खेळायला मिळणे ) पध्द्तीच्या अखेरच्या दिवशी भारताने  स्लोव्हानिया या देशाबरोबर तीन तीन अशी बरोबरी तर हंगेरी या पूलमधील बलाढ्य संघाला 4 विरुद्ध 2तर   मोल्डवोवा विरुद्ध 5  विरुद्ध 1  असा  सफाईदार विजय मिळवत आपल्या पूलमध्ये पहिले स्थान मिळवले , आणि मोठ्या दिमाखदारपणे नॉक आउट ( हरलं की बाहेर ) या फेरीत प्रवेश केला . या यशामुळे आपल्या डिव्हिजनमध्ये  पहिल्या सोळापैकी दहाव्या क्रमांकापर्यंत धडक मारली . भारत असलेल्या पुलमधून भारतासह हंगेरी ( क्रमांक 15)  या देशाने प्रवेश केला आहे .यापुढे  13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या युक्रेन आणि जर्मनी या देशातील विजेत्याबरोबर भारताची गाठ पडेल 

         भारताच्या शुक्रवारच्या डावाची सुरवात हंगेरी या देशाबरोबर झालेल्या डावाने झाली यामध्ये भारताने 4 विरुद्ध 2असे यश मिळवले भारताचे कप्तान विश्वनाथन आंनद यांनी Viktor Erdos यांच्या विरुद्ध  तर कोनेरू हंपी यांनीHoang Tranh Trang यांच्या विरुद्ध  विजय मिळवला . निहाल सरीन यांनी Marcell Borthy; याच्या विरुद्ध विजयी सलामी दिली . पी हरिकृष्ण याना मात्र पराभव  बघावा लागला त्यांना  Imre Balogयांनी पराभूत केले आर वैशाली आणि हरिका द्रोणवली यांनी अनुक्रमे Kata Karacsonyi) आणि Bianka Havanecz  यांच्या विरोधातील डावामध्ये बरोबरी साधली भारताची दुसरी लढत मोल्दोवा या देशाबरोबर झाली ज्यात भारताने  मोल्दोवा या देशावर  5  विरुद्ध 1  अशी मात केली . तानिया सचदेव आणि मराठमोळ्या भक्ती कुलकर्णी यांनी आपापले डाव  जिंकले त्यांनी अनुक्रमे Paula-

Alexandra Gitu  आणि Ana Petricenco यांना पराभूत केले . नाशिकचे आयकॉन ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांनी Victor Bologan याना पराभूत केले आर प्रज्ञानंद यांनी Jegor Lashkin याना हरवले तर बी  अधिबन आणि बी सविता श्री यांना  अनुक्रमे  Ivan Schitco आणि  Alina Mihailova यांच्याविरुद्ध बरोबरी मेनी करावी लागली भारताच्या पुलमधील अखेरचा सामना  स्लोव्हानिया या देशाबरोबर झाला ज्यामध्ये भारताने तीन तीन अशी बरोबरी साधली . ज्यामध्ये नाशिकचे आयकॉन  ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांनी uka Lenic विरुद्धचा सामना खिशात घातला पी हरिकृष्ण  तसेच  तानिया सचदेव यांना आपल्या प्रतिस्पर्धीविरुद्ध बरोबरी मेनी करावी लागली त्यांना अनुक्रमे Jure Skoberne आणि  Lara Janzelj  यांनी बरोबरीत रोखले आर प्रज्ञानंद यांनी  Jan Subelj या हरवले . मराठमोळ्या भक्ती कुलकर्णी आणि बी सविता यांना मात्र पराभव बघावा लागला त्यांना अनुक्रमे Teja Vidic आणि Zala Urh यांनी  हरवले

             बुद्धिबळ हा खेळ पूर्णतः भारतीय . याचे शोधकर्ते भारतीय आणि आणि हा खेळ सुद्धा भारतातच शोधला गेला बँडमिंटन सारखा ब्रिटिशांनी पुण्यात शोधलेला हा खेळ नाही मात्र तरी देखील हारशियाचा राष्ट्रीय खेळ आहे आपला नाही याचे आंतराष्ट्रीय पातळीवर नियमन करणारी संस्था ही  फ्रान्समध्ये जन्माला आली जी "फेडरेशन  इंटरनॅशनल दिचेस"  हे तिचे नाव.  जी "फिडे" या नावाने ओळखली जाते काही काळापर्यंत हा खेळ भारतात काहीसा दृलक्षिला गेला आता मात्र या चित्रात सकारात्मक बदल होत आहे ज्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये भारताचे बुद्धिबळपटू आंतराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवत आहे  सुपरपॉवर बनायला निघालेल्या भारताचे बुद्धिबळपटू असेच यश मिळवत राहो ही या गणपती उत्सवात गारणाऱ्याचा चरणी प्रथम करून सध्यापुरतो थांबतो , नमस्कार . 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?