ब....... बुद्धिबळाचा (भाग 7)

           

      भारताचा बुद्धिबळ ऑलम्पियाडच्या  उपांत्य फ़ेरीत पराभव अमेरिकेकडून पराभव झाल्यावर आता त्या मागच्या कारणांचा शोध घेण्यास सुरवात झाली आहे . महाराष्ट्रातील पहिले ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांच्या मते दोन कारणामुळे भारतीय बुद्धिबळ संघास बुद्धिबळ ऑल्मियाडमध्ये पराभवास सामोरे जावे लागले एक म्हणजे अमेरिकेविरुद्धचा पहिल्या डावातील विजयानंतर भारतीय बुद्धिबळपटू गाफील राहिले त्यांनी दुसऱ्या डावात आवश्यक  तेव्हढी सावधगिरी  दाखवली नाही  आपण खेळात सातत्याने सावध असायलाच हवे नाहीतर होत्याचे नव्हते होण्यास वेळ लागत नाही याची झलक भारतीय बुद्धिबळपटूंनी उपउपांत्य फेरीत युक्रेनविरुद्धचा दुसऱ्या डावात अनुभवली होती.  मात्र यातून योग्य तो धडा घेत आपल्या कार्यप्रणालीत योग्य ते बदल करण्यास भारतीय बुद्धिबळपटू कमी पडले ज्याची किंमत त्यांना अमेरिकेकडून पराभूत होऊन चुकवावी लागली . खेळाडूंसाठी मनाची एकाग्रता समतोल किती आवश्यक आहे याविषयी मीमाजी पोलीस अधिकरी क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम सरांचे एक व्याख्यान ऐकले होते . त्याची पुन्हा एकदा आठवण मला  ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांचे हे मत ऐकून झाली  ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांच्या मते भारतीय   बुद्धिबळपटूच्या पराभव होण्यामागे दुसरे कारण म्हणजे अमेरिकेबरोबर झालेल्या डावाची वेळ . भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री   9  वाजता   या डावाला सुरवात झाली तर ब्लीट्स या प्रकारात खेळ रात्री 11  वाजता झाले अमेरिकेच्या विचार करता हि वेळ ब्रेकफास्टची असते .
या आधी  भारताचे झालेले सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी झाले होते भारतीय खेळाड या बदलला आत्मसात करू शकले नाहीत रात्री झोपण्याचा वेळेस झालेल्या या सामन्यात सवय नसल्याने  भारतीयांची विजयाची संधी हुकली    
             भारतीय बुद्धिबळ संघाचे उपकप्तान मराठमोळे ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांनी पहिल्या डावात भारताचे कप्तान विश्वनाथ आनंद आणि नाशिकचे आयकॉन ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांच्या धक्कादायक पराभव झाल्याने त्याचा इतर खेळाडूंवर नकारत्मक परिणाम झाल्यामुळे  . भारतीय खेळाडूंचा पराभव झाल्याचे मत व्यक्त केले आहे या ठिकणी मला ए, त्याचा या प्रसंगात दाखवले आहे कि ,  मेरी कॉम यांच्या मुलावर एक ,मोठे ऑपरेशन आणि त्यांची महत्तवाची मॅच एकाच वेळी असते  नेरी कॉम यांच्यावर मुलाच्या ऑपरेशनचा मोठा दबाव असतो तो कमी करावा आम्ही सगळे बघून घेतो असे तिला घरचे वारंवार सांगत असतात .या तणावामुळे त्या जवळपास हरण्याचा स्थितीत येतात त्याचवेळी त्यांना आपण आपल्या घरच्यांसाठी जिंकले पाहिजे अशी उर्मती जागृत होते आणि त्या विजय खेंचूनं आणतात त्यांचा मुलाचे ऑपरेशन देखील अवघड स्थितीत यशस्वी होते . या ठिकाणी मी माझा आयुष्यातील एक प्रसंग सांगतो मी यूपीएससी ची नागरी सेवेचे दोन प्रयत्न केले आहेत       
त्याच्यासाठी तयारी करताना आंम्हाला नेहमी सांगितले जायचे पहिला पेपर झाल्यावर दुसऱ्या पेपरच्या आधी आधीच्या पेपरविषयी एक  अवाक्षर काढायचे नाही . कारण आधीच्या पेपरमध्ये  एखादे सोपे उत्तर चुकल्यास त्याची रुखरुख लागून त्याचा परिणामस्वरूप आपले दुसऱ्या पेपरमधील मधील सुद्धा एखादे दुसरे उत्तर चुकू शकते . सो जे गेले त्याविषयी शोक करणार व्यर्थ आहे याची जाण ठेवणे आवश्यक आहे . 
अर्थात पुढील वर्षी या चुकांमधून बोध घेत भारतीय बुद्धिबळपटू नक्कीच पुन्हा यशाला गवसणी घालतील यात शंका नाही त्यानं यासाठी सुयश चिंतून मी सध्यापुरती आपली रजा घेतॊ , नमस्कार . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?