ब....... बुद्धिबळाचा (भाग 8)

           

         भारतीय क्रीडाविश्व भारताचा बुद्धिबळ ऑलम्पियाडमधील पराभवामुळे काहीसे निराशजनक स्थितीत  भारताला सुखावणारी एक बातमी शनिवारी 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी येऊन धडकली ती सुद्धा बुद्धिबळ क्षेत्रातून . हैद्राबाद येथील रुथ्वीक राजा हा भारताचा 70  वा  ग्रँडमास्टर बनल्याची ती बातमी होती . गेल्याच महिन्यात भारताला 69 वा ग्रँडमास्टर मिळाला होता त्या नंतर महिन्याभराचा भारताला पुढचा ग्रँडमास्टर मिळाल्याने नव्या 21 व्या शतकात जगाचे नेर्तृत्व करण्यास भारत पूर्णतः सज्ज झाल्याचे दिसून येत आहे . हंगेरी या देशाची राजधानी असलेल्या बुडापेस्ट मध्ये सुरु असलेल्या वेझरकेप्झो ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत भारताला हा नवा हिरा गवसला आहे . सतरा वर्षीय रुथ्वीक राजा  यांनी या स्पर्धेत ग्रँडमास्टरसाठी   आवश्यक असणारा 2500  रेटिंगचा टप्पा ओलांडला आणि भारताला हा सुखद धक्का मिळाला .हैदराबादचे उपनगर असलेल्या सैनकपुरी येथील  श्री रामकृष्ण विद्यालय येथे 12 वीत शिकत असणाऱ्या रुथ्वीक रजा यांनी झरकेप्झो ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेच्या चवथ्या फेरीत या   यशाला गवसणी घातली ही स्पर्धा सुरु होण्या अगोदर त्यांचे इलो रेटिंग 2496 होते .या स्पर्धेच्या चवथ्या डावात त्यांनी पांढऱ्या मोहऱ्यांशी फिडे मास्टर 
inek Vaclav of Czechoslovakia यांच्याशी खेळताना   त्यांना  57 चालीत  नमवले आणि पाच इलो रेटिंग मिळवले परिणामी त्यांचे इलो रेटिंग 2501  झाले आणि त्यांनी भारताला 70 वा ग्रँडमास्टर मिळवून दिला . 
                         ग्रँडमास्टर हा बुद्धिबळाच्या आंतराष्ट्रीय संघटना फेडरेशन ऑफ दि इचेस जी फिडे या नावाने अधिक ओळखली जाते या संघटनेकडून बुद्धिबळपटूंना देण्यात येणारा 'किताब आहे हा एकप्रकारचा गौरवच असतो असे  वावगे ठरू नये .  ग्रँडमास्टर हा 'किताब मिळण्यासाठी तीन निकष  पूर्ण करावे लागतात., आणि खेळाडूचे इलो 2500 पेक्षा अधिक असावे लागते  रुथ्वीक राजा यांनी पहिला निकष यांनी सन 2019मध्ये पूर्ण केला त्यांना दुसरं निकष पूर्ण होण्यास्तही ऑगस्ट 2021 पर्यंत वाट बघावी लागली मात्र दुसरा निकष पूर्ण केल्यावर
तिसरा निकष त्यांनी अवघ्या वीस दिवसात पूर्ण करून भारताला हा सुखद धक्का दिला . 
रुथ्वीक राजा यांनी त्यांचा ग्रँडमास्टर होण्यासाठीचाशेवटचा  निकष या महिन्याचा सुरवातीला झालेल्या irst Saturday round-robin Grandmaster tournament मध्ये पूर्ण केला  त्या नंतर  भारताला 70  वा  ग्रँडमास्टर हि निव्वळ औपचारिकता होती जी शनिवारी 18 सप्टेंबर रोजी पूर्ण झाली . 
            सन 1988 साली भारताला विश्वनाथन आंनद यांच्या रूपाने पहिला ग्रँडमास्टर मिळाला त्या नंतर गेल्या 33 वर्षात भारताला विविध ग्रँडमास्टर मिळत गेले रुथ्वीक राजा यांच्या मुळे त्यांची संख्या 70 झाली आहे या  33 वर्षाचा आढावा घेतल्यास गेल्या दहा पंधरा वर्षात बुद्धिबळाविषयी अत्यंत सकारत्मक चित्र निर्माण होत आहे . ज्यामुळे या वर्षात +द्धिबळामधमध्ये भारतीय नवनवीन विक्रम स्थापन करत आहेत त्याचे विक्रम असेच वाढत भारतात ग्रँडमास्तरांचे शतक पूर्ण व्हावे हि गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करून सध्यापुरते थांबतो नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?