गुलाब चक्रीवादळाच्या निमित्याने ...... थोडेसे

         


   मित्रानो , हा लेख तुम्ही जेव्हा वाचत असाल तेव्हा गुलाब नावाचे चक्रीवादळ ओडिसा  राज्याचा दक्षिणेच्या आणि आंध्र प्रदेशाच्या सीमांध या भागातील उत्तरेच्या काही जिल्ह्यामध्ये जमिनीला येऊन धडकले असेल  विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची धुवाधार बंटिंग सुरु असेल . आणि टीव्हीवरील बातम्यांमध्ये तेथील विस्कळीत जनजीवन,  प्रशासनाचे लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे प्रयत्न या विषयीच्या बातम्या चालू असतील . गेल्या काही वर्षात मागच्या अनुभवांवरून शहाणे होत प्रशासनामार्फत अत्यंत उत्तम नियोजन केले जाते. त्या बद्दल प्रशासनाचे कौतुक करायलाच हवे . माझे आजचे लेखन मुळात चक्रीवादळे निर्माण कशी होतात ?  कुठे कुठे निर्माण होताता ? या घडामोडींची माहिती देण्यासाठी 

        तर मित्रानो आपण ज्यास चक्रीवादळे म्हणतो ती मुळात समशीतोष्ण कटिबंधातील वादळे आहेयास पृथीच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखक्ले जाते अमेरिकेच्या पूर्व भागात (अटलांटिक किनारा ) यास हरिकेन

तर अमेरिकेचा पश्चिम किनारा आणि जपान फिलिपाइन्स या भागात यास टायफून म्हणतात तर आपण त्यास चक्रीवादळे असे म्हणतो , किंवा नुसतेच वादळ म्हणतो . 

         पृथ्वीच्या विषुवृत्तापासून दोन्ही गोलार्धात साडेतेवीस अक्षवृतापर्यंतचा भाग समशीतोष्ण कटिबंध म्हणून ओळखला जातो . या भूभागात उन्हाळ्यात अशी वादळे निर्माण होतात . मार्च ते सप्टेंबर हा कालावधी उत्तर गोलार्धात उन्हाळा समजला जातो तर सप्टेंबर ते मार्च हा कालावधी दक्षिण गोलार्धात उन्हाळा समजला जातो आपण ऊत्तर गोलार्धात राहतो त्यामुळे मार्च ते सप्टेम्बर या काळात आपल्याकडे चक्रीवादळे निर्माण होतात . सूर्याभोवती पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते त्यामुळे कॉलोरोजी नावाचे बल तयार होते या बलस्वरूप हे चक्रीवादळाची  दिशा पश्चिमेकडे अगदी अचूकपणे सांगायचे झाल्यास  उत्तर गोलार्धात वायव्य दिशेकडे आणि दक्षिण गोलार्धात नैऋत्य दिशेकडे असते भारताच्या दोन्ही समुद्रकिनाऱ्यावर चक्रीवादळे निर्माण होतात.  मात्र बंगालचा उपसागरात निर्माण झालेली चक्रीवादळे समुद्राचा पश्चिमेकडील भागात अर्थात भारताच्या भूमीवर आढळतात . तर अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेली चक्रीवादळे इराण आणि आखाती देशात आदळतात . मात्र काही भौगोलिक कारणामुळे बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रापेक्षा जास्त  चक्रीवादळे येतात . मात्र जागतिक हवामानबदलामुळे हा फरक नाहीसा होत आहे 

     आता येऊया  मूळ मुद्याकडे ती निर्माण का होतात ?  त्यासाठी आपणास काही संज्ञा माहिती असणे अत्यावश्यक आहे जसे हवेचा दाब आणि तापमान आणि हवेचा दाब यांचा संबंध तर मित्रानो एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात सर्वसाधारण तापमानात  एखाद्या वेळी अस्तित्वात असणाऱ्या हवेचे वजन म्हणजे  हवेचा दाब . या हवेचा तापमानाचा तापमानाशी जवळचा संबंध असतो जितके तापमान जास्त तितका हवेचा दाब कमी आणि जितके तापमान कमी तितका हवेचा  दाब जास्त होय . तसेच हवेचा दाब कमी जास्त झाल्यास जास्त दाबाकडून हवा नेहमी कमी दाबाकडे वाहते . तसेच पृथ्वीचा सूयाभोवती फिरण्याचा  मार्ग साडे तेवीस  अंशांनी कललेला आहे परिणामी सूर्याच्या समोर नेहमी कोणता तरी एकाच गोलार्ध असतो आपण  पृथ्वीला गोलाकार समजतो मात्र ती पूर्णतः गोलाकार नाही पृथ्वी  विषुवृत्तापाशी काहीही भुजिर आणि ध्रुवापाशी काहीशी चापटी आहे अगदी अचूकपणे सांगायचे सांगायचे झाल्यास ध्रुवापेक्षा विषुवृत्तापाशी पृथ्वीचा व्यास 41 किमीने जास्त आहे . त्यामुळे जेव्हा उन्हाळ्यात पृथीचा एखादा गोलार्ध सूर्यानजीक असतो जेव्हा उन्हाळ्यात पृथ्वीसापेक्ष एखादा गोलार्ध सूर्यासमोर येतो तेव्हा सूर्याचा अधिक जवळ आल्याने हा भाग अधिक तापतो. परिणामी याचे तापमान वाढून येथील दाब कमी होतो आणि त्याची जागा

घेण्यासाठी सभोवतालची जास्त दाबाची हवा त्या ठिकाणी येते .आणि चक्रीवादळाची निर्मिती होते जर समुद्रात असे वादळ निर्माण झाल्यास समुद्रातही बाष्प देखील गर गर फिरायला लागते  समुद्राच्या पाण्यावरील हवेचे   तापमान आणि जमिनीवरील हवेचे तापमान वेगवेगळे असल्याने जर जमिनीलगतच्या समुद्रात असे वादळ झाल्यास ते वेगाने जमिनीकडे झेपावते यावेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो गुलाब चक्रीवादळाच्या वेळेस देखील हेच होत आहे 

      कोणत्याही नैसर्गिक संकटात मानवाचे नुकसान होते ते मानवाच्या चुकीच्या गोष्टीमुळे पावसाच्या पाण्याला वाट मोकळी करून न देणे पाण्याचा जमिनीत मुरल्याचा वाटा बंद करणे विविध कारणांनी नद्या ओहोळ यांची खोली कमी होणे यामुळे पावसाचे संकट कमी होते . त्याच प्रमाणे जागतिक हवामान बदलामुळे ढगफुटीसारख्या घटना घडणे यामुळे मणी बाली आणि आर्थिक नुकसान होते जे टाळता येणे सहज शक्य आहे सध्या प्रशासन नैसर्गिक संकटाचा अत्यतं नियोजन करून यशस्वी  सामना करत आहे मागील काही घटनांमधील बळींची या आधीच्या तुलनेत असणारिउ कमी संख्या याचेच द्योतक आहे याही संकटताच प्रशंसा यश्वी सामना करेल असे मानून सध्यापुरते थांबतो , नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?