पर्यावरणप्रेमींचा हाती जर्मनीचे सुकाणू

         

   गेल्या रविवारी 26 सप्टेंबर रोजी जर्मनीच्या केंद्रीय विधीमंडळाच्या (सोप्या भाषेत लोकसभेच्या) निवडणूका झाला. त्या निवडणूकीमध्ये सत्तारुढ खिश्चन डेमोक्रेटिक युनियन (  CDU), आणि खिश्चन सोशालिस्ट युनियन ( CSU ) या पक्षांचा युतीचा  पराभव झाला. मागील 2017 साली झालेल्या निवडणूकीत मिळालेल्या मतांपेक्षा  त्यांना यावेळी 8.7टक्के मते कमी मिळाली. ते 24.1टक्के मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहेत.. पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या सोशल डेमोक्रेटीक युनियन (SDP) या पक्षाला 25.6 टक्के मते मिळाली आहेत.   तर पर्यावरण रक्षणाचा मुद्दा घेवून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या ग्रीन पार्टीस आतापर्यतचे सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे. त्यांना 14.8टक्के मते मिळाली आहे. सत्तारुढ  पक्षांनी आपली हार स्विकारली आहे. तेथील कोणत्याच पक्षाला पुरेसे मत्ताधिक्य नसल्याने, सोशल डेमोक्रेटीक पक्षाच्या नेर्तृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन करण्यात येत आहे.ज्यामध्ये ग्रीन पार्टी मोठी भुमिका बजावणार असल्याचे डि डब्ल्यु , या जर्मन सरकारच्या मालकीच्या वृत्तवाहिनीसह फ्रांस सरकारची मालकी असणाऱ्या फ्रांस 24आणि ब्रिटिश सरकारची मालकी असणाऱ्या बीबीसी  या वृत्तवाहिन्यांनी  दिलेल्या बातमीत सांगण्यात येत आहे . 
        ग्रीन पार्टीच्या सहभागामुळे   सध्या समस्त मानवजातीपुढील अक्राळविक्राळ संकट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हवामान बदलाविषयी सकारत्मक घडामोडी घडतील यासाठी करावयाच्या तरतुदीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे  गेल्या दीड वर्षाचा विचार करता जर्मनीला फार मोठ्या प्रमाणात पुराचा सामना करावा लागला होता त्याचा आठवनिवु अजूनही ताज्या आहेत . त्यामुळे ग्रीन पार्टी या बाबत लगतच्या भविष्यकाळातच या साठी  आवश्यक ती पाऊले उचलणार हे नक्की ग्रीन पार्टीच्या निवडणुकीच्या
जाहीरनाम्यात पर्यावरण रक्षणाबाबत   अनेक दावे करण्यात आले होते ज्यामध्ये पर्यावरण बदलाविषयी अधिकचे संशोधन  करून आवश्यक त्या उपायजोजना करणे  अनेक देशांना या बाबत पाऊले उचलण्यास भाग पडणे कार्बन उत्सर्जन पातळी न्यूनतम आणणे . ही त्यातील काही आश्वासने . आणि ती जर्मनीच्या राजकीय पक्षांनी दिलेली आहेत ती बहुतांश वेळा पाळलीच जातात .      जर्मनी हा देश युरोपातीलच नव्हे तर जगतातील एक प्रमुख देश आहे जगातील बलाढ्य अश्या सात अर्थव्यवस्थांमध्ये जर्मनीचा समावेश होतो . युरोपीय युनियनचे इंजिन म्हणून जर्मनीचा समावेश होतोयुरोपीय युनियनच्या संसदेतील अनेक प्रस्ताव हे जर्मनीच्या प्रतिनिधींकडून मांडण्यात आले आहे . त्यामुळे जर्मनीच्या या सत्तांतराकडे बघावे लागेल . जागतिक हवामान बदलाचा जगात सर्वाधिक फटका भारताला बसलेला आहे  मात्र भारतात अजूनही पर्यावरण बदल हा मुद्दा राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर आलेला नाही त्या पाश्वभूमीवर हा बदल आपण बघायला हवा,  जर्मन जितके जागरूक आहेत तितके आपण होवो अशी मनोकामना करून सध्यापुरते थांबतो , नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?