पाउस बदलला आहे का ?

     

     
  पाउस बदलला आहे का ? असा प्रश्न सध्या  महाराष्ट्रात तिशीच्या आतबाहेर असणाऱ्या सर्वांकडून विचारला जात आहे. आमच्या लहानपणी इतका मुसळधार पाउस पडत नव्हता, असेच वाक्य जो तो बोलत आहे आधी कोकणात धुमाकूळ घातल्यावर आता मराठवाड्यात आणि विदर्भात पावसाने नाकात दम आणला आहे . पूर्वी साधारतः उत्तर भारतात आणि ईशान्य भारतात दिसणारे पुराचे चित्र आज महाराष्ट्रात दिसत आहे . त्यामुळे या  विचारल्या जाणाऱ्या प्रश्नात खरोखरीच अर्थ आहे हे स्पष्ट होत आहे 
          पाऊस बदलला आहे का ? या प्रश्नाचे ऊत्तर एका वाक्यात देयचे झाल्यास,  पूर्णतः नाही मात्र काही प्रमाणात पाऊस  बदलला आहे असे म्हणावे लागेल . आपल्याकडे जून ते सप्टेंबर या चार  महिन्यात जर सरासरीचा  विचार करता क्ष मिलिलिटर पाऊस पडत असेल तर आज 2021 मध्ये सुद्धा क्ष मिलीमीटर पाऊसच पडतोय तो कमी किंवा जास्त झालेला नाहीये . बदलली आहे ती त्याची कोसळल्याची पद्धत . पूर्वी हा क्ष मिलीमीटर पाऊस जर चार टप्यात विभागून पडत असेल,  तर सध्या मात्र या चार टप्याऐवजी दोन ते तीन टप्यातच सगळा पाऊस पडत आहे . पावसाचे प्रमाण तितकेच राहून त्याचे पडण्याचे टप्पे कमी झाल्याने आज ही स्थिती निर्माण झाली आहे .त्यातच आपली असंख्य धरणे गाळाने भरली आहेत परिणामी त्यांची साठवण क्षमता कमी झाली आहे . तसेच शहरात प्रचंड
प्रमाणात  क्राँकटीकरण झाल्याने शहरात पडणारे पाणी जमिनीत न मुरता सरळ उताराने वाहत जावून शहरातील नदीला जावून मिळते.परीणामी नदीला अनावश्यक पाणी पुरवठा होतो..या वर्षी नाशिकला आलेला पहिला पूर हा याच पाण्याचा होता आज आपल्या महाराष्ट्रातील शहरातील नदीपात्रे देखील प्रचंड उथळ झालेली आहेत ज्यामुळे पाणी थोडेसे देखील वाढले की पाणी नदी पात्राबाहेर येते आणि हाहाकार उडवण्यास सुरवात करते . नदी पात्रात होणारे अतिक्रमण हा घटक देखील यासाठी जवाबदार आहे . 
       जागतिक  हवामान बदलामुळे सध्या  जगात सर्वत्र चक्रीवादळांची संख्या आणि तीव्रता वाढलेली आहे त्यामुळे आपणाकडेही ती वाढलेली आहे .  तसेच बंगालच्या उपसागरापेक्षा अरबी समुद्रात तुलनेने कमी चक्रीवादळ येत असतात  हा फरक कमी होत असल्याचे पुण्यातील पाषाण या उपनगरातील  डाँ होमी भाभा रोडवरील IITM( Indian Institute for   Tropical Metrology )या संस्थेमार्फत केलेल्या अभ्यासात स्पष्ट झालेच आहे जागतिक हवामानबदल ही कोणत्या एका व्यक्तीच्या किंवा व्यक्तिसमूहाच्या हातातील गोष्ट  नाहीये त्यामुळे त्यास शरण जाणे क्रमप्राप्त आहे . आपण
या बदलला सामोरे जाण्यासाठी आपल्या धरणातील गाळ काढणे , नदीपात्राची खोली आणि रुंदी वाढवणे हे उपाय  योजता येऊ शकतात. तसेच जास्त पाण्यात सुद्धा तग धरू शकतील अशी पीकपद्धत विकसित करणे आदी उपाय योजावे लागतील जर हे उपाय योजले तर आणि तरच आपण या संकटातून यशस्वीरीत्या बाहेर पडू हे नक्की!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?