50 वर्षाचा सुवर्णकाळ

   

1972 आँक्टोबर 2 ही फक्त एक तारीख नाहीये. महाराष्ट्राचा एका नव्या युगात प्रवेश झाल्याची ती तारीख आहे. याच दिवशी मुंबईत दूरदर्शन केंद्राचा जन्म झाला.आज 2021 साली या घटनेला 49 वर्ष पुर्ण होवून 50वे वर्ष सुरु होईल. थोडक्यात मुंबईच्या वरळी या उपनगरात असणारे दुरदर्शन केद्र सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करेल. त्यानिमित्ताने सर्व दुरदर्शन प्रेमींना मनःपूर्वक शुभेच्छा.
      या 50 वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहुन गेले आहे. समाज प्रबोधनाबरोबर मनोरंजनासाठी एक  प्रयोग म्हणून सुरू करण्यात आलेल्या या वाहिनीने पुढे अनेक वर्ष टिव्हीवर मराठी भाषेतील एकमेव वाहिनी म्हणून अधिराज्य गाजवले.1994साली या केंद्राने सह्याद्री हे नाव धारण केले. त्यानंतर ही वाहिनी सह्याद्री या नावाने ओळखायला
लागली.आजमितीस मराठीत अनेक 24 तास चालणाऱ्या वाहिन्या आहेत. मात्र त्या कोणाचीही सर दुरदर्शन सह्याद्रीस येणार नाही. आता आतापर्यत अनेकांच्या दिवसाची अखेर सातच्या बातम्यांनी होत असे ( माझी अजून देखील होते)  बातमी कितीही महत्तवाची असली, इतर वाहिन्यांपेक्षा आधी दाखवत असलो तरी काहीही आवेश न दाखवता शांतपणे बातमी दर्शकापर्यत पोहचवयाची ती दुरदर्शन सह्याद्रीनेच.अन्य ठिकाणपेक्षा शुद्ध आणि स्पष्ट शद्बोच्चार ऐकावे ते दुरदर्शन सह्याद्रीवरच। सध्याचा कौटुंबिक मालिकांच्या नावाखाली मानसिक अत्याचार करणाऱ्या उथळ कथानकांच्या मालिकांपेक्षा अत्यंत आशयघन काहीच भागांच्या दुरदर्शन सह्याद्री च्या मालिकांनी या आधीच्या पिढीचे सकसरीत्या मनोरंजन केले.चालता बोलता या ज्ञानवर्धक कार्यक्रमाची सर आताच्या कोणत्याही कार्यक्रमाला येणे अशक्यच. तसेच आमची माती आमची माणसं सारखा शेतीविषयक कार्यक्रम माझ्या माहितीत अन्य दुसरा कोणीही नाही. सध्या विविध वाहिन्यांवर जे गाण्याचे कार्यक्रम होतात, त्याचे मुळ देखील मला दुरदर्शन सह्याद्रीच्या "ताक धिना धिन धा " या कार्यक्रमात सापडते. विनोदी कार्यक्रमाचे जनकत्व सुद्धा दुरदर्शन सह्याद्रीकडेच जाते, त्यांचा पाच मिनिटाचा टिवल्या बावल्या हा विनोदी कार्यक्रम अफलातूनच .प्रेक्षकांना विजेता करणारा पहिला कार्यक्रम आज आता ताबडतोब सुद्धा दुरदर्शन सह्याद्रीचीच निर्मिती.आताच्या आँनलाईन शिक्षणाचे सोडून द्या. मात्र शिक्षणाचा वापर दुरदर्शन सह्याद्रीमध्ये खुप आधीपासूनच होत आहे. "बालचित्रवाणी"हे त्याचे स्वरुप . एक सलग कथेच्या ऐवजी दर भागात एका छोट्या मात्र आशयघन कथा सांगण्याची पद्धत सुद्धा दुरदर्शन सह्याद्रीची .चित्रहार हा दुरदर्शन सह्याद्रीचा एक उत्तम कार्यक्रम .गाण्याविषयक विविध अँप, वेबसाईट नसताना गाण्याची आवड चित्रहारच्या माध्यमातून जोपासत अनेक पिढ्या लहानाच्या मोठ्या   
झाल्यात.आजमितीस 24 तास गाण्याला समर्पित वाहिन्या मराठीत आहेत.मात्र त्यांना चित्रहारची सर कधीच येणार नाही.
   दुरदर्शन सह्याद्री विषयक अनेकांच्या अनेक सुखद आठवणी आहेत. आताच्या विविध वाहिन्यांबाबत असे म्हणता येणे अवघड आहे. आता या वाहिन्यांमुळे दुरदर्शन सह्याद्रीचा प्रेक्षक कमी झाला आहे. मात्र ज्यास खरा मनमुराद आनंद हवा आहे,असा प्रेक्षक अजूनही दुरदर्शन सह्याद्री आवर्जून बघतो.  
नव्या काळाची पाउले उचलत दुरदर्शन सह्याद्री आता युट्युब चँनेल फेसबुक पेज अश्या आधुनिक स्वरुपात सुद्धा दिसते. दुरदर्शन सह्याद्रीने आगामी वर्षात देखील असीच वाटचाल करावी, अस्या सदिच्छांसह पुन्हा एकदा दुरदर्शन सह्याद्री च्या सुवर्ण महोत्सवाच्या शुभेच्छा देत आपली रजा घेतो, नमस्कार.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?