ड्रँगन जागा झाला आहे!

             

            स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या पहिल्या अमेरीकेच्या दौऱ्याचा वेळी अमेरीकत जाण्यासाठी, भारताहून आग्रेय आशिया, चीन, जपान हा मार्ग निवडला होता.त्यावेळी त्यांची बोट चीन आणि जपान येथे थांबली असता, चीनी आणि जपानी लोकांचे निरीक्षण केल्यावर त्यांनी या दोघांचे वर्णन निदीस्त ड्रँगन असे केले होते. जेव्हा हे ड्रँगन जागे होतील तेव्हा जगाची झोप उडवतील, असे भाकित त्यांनी केले होते.जे आता चीनबाबत  सत्यात येताना दिसत आहे.   . 
               गेल्याच आठवड्यात चीनने तैवानच्या हवाई हद्दीत केलेल्या घुसखोरीमुळे चीन पुन्हा एकदा आक्रमक राष्ट्रवादाचे धोरण अमलात आणत  असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे.  गेल्या आठवड्यात तैवान या देशाच्या हद्दीत  चीनच्या विविध चार प्रकारच्या एकूण ५६ लष्करी  विमानांनी घुसखोरी केली. चीनच्या मते तैवान हा चीनचाच फुटून निघाललेला भाग आहे.  सबब त्यांनी त्यांच्याच हद्दीत विमाने उडवली असल्याने तो आंतराष्ट्रीय संकेताचा भंग ठरत नाही . याबाबत तैवानच्या संरक्षण मंत्र्यांनी दिलेली प्रतिक्रिया तैवाननची  चीनविरुद्ध लढ्याची तयारी झाल्याचे
संकेत देणारी होती अत्यंत कडक शब्दात त्यांनी चीनच्या या  कृतीचा निषेध केला तर चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी या बाबत अत्यंत संयमित प्रतिक्रिया व्यक्त केली ,जपानच्या संरक्षण मंत्र्यांनी देखील चीनच्या या कृत्याची आम्ही गंभीर दाखल घेतल्याचे या निमित्याने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले 
            गेल्या काही दिवसापासून तैवानबाबत चीन आक्रमक झाला आहे टोकियो येथे झालेल्या ऑलम्पियाडमध्ये आपण त्याचा प्रत्यय देखील घेतला आहे तैवानच्या उल्लेख चायनीज तैपई  न  करता स्वतंत्रपणे उल्लेख करण्याचा निर्णय  घेतल्यामुळे  युरोप खंडातील लिथिनवेनिया या देशाच्या बरोबर असणारे व्यापारी संबंध चीनने गेल्या काही दिवसापूर्वीच पूर्णतः तोडून टाकले आहेत .
      चीनमध्ये काही दिवसापूर्वी त्यांचा समाजमाध्यमांमध्ये एक पोस्ट प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली होती ज्यामध्ये २०१५ चा लेखाचा संदर्भ देत,  तैवान आणि अरुणाचल प्रदेशाचा हवाला देत अनुक्रमे २०२५ आणि २०४० मध्ये हे प्रदेश चीनचे अविभाज्य प्रदेश असतील असे सांगण्यात येत होते .तैवानच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीला भारताचे दोन प्रतिनिधी ऑनलाइन पद्धतीने  उपस्थित राहिले होते .,प्रतिनिधी  भारताचा  स्वतंत्र तैवानला नेहमीच पाठिंबा आहे .  
             मुळात चीनमध्ये कम्युनिष्ट कमिटी होण्यापर्यंत दोन्ही भूभाग एकाच देशाचे भाग होते १९४९ रोजी चीनमधील कम्युनिष्ठ क्रांती नंतर तेथील मूळ लोकशाहीवादी सरकारने मूळ भूभागाच्या जवळील एक बेटाचा आश्रय घेतला . तेच आजचे तैवान आपण ज्याला तैवान म्हणतो त्याचे अधिकृत नाव रिपब्लिक ऑफ चायना
म्हणतात . चीन त्यास चायनीज तैपेई म्हणतो ज्याला आपण चीन म्हणतो त्याचे अधिकृत नाव पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना म्हणतात .   ऐशीच्या दशकांपर्यंत संयुक्त राष्ट्रसंघात आणि जगात सर्वत्र तैवानलाच अधिकृत चीन समजले जात असे आपण ज्याला चीन म्हणतो त्यास जगातील स्तरावर अधिकृत मान्यता नव्हतीच अमेरिकेच्या मुख्यतः सध्याचा चीनला जागतिक स्तरावर मुख्य प्रवाहात घेण्यास  विरोध होता .आजमितीस पीपल्स रिपब्लिकन ऑफ चायना अर्थात आपण ज्यास चीन म्हणतो तो देश मुळातील चीनचे स्वतंत्र अस्तिव मान्य करत नाहीये जगाने  आम्हालाच  एकमेव चीन म्हणून मान्यता द्यावी यासाठी ते जगावर दबाव आणत आहेत जग मात्र त्यांचा दबाव झुगारून तैवानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देत आहे 
जपान साऊथ कोरिया फिलिपाइन्स या आशियाई देशांबरोबर  युरोप खंडातील लिथिनवेनिया या देशांनी त्याची सुरवात केली आहे . ज्यामुळे या ड्रॅगनला वेसण घालण्यास सुरवात झाली आहे हेच  यातून दिसत आहे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?