सोने विचाराचे ...

   


      विजयादशमी अर्थात दसरा भारतीय पंरंपरेतील शुभ मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त . या दिवशी एकमेकांना आपट्याची पाने सोनेरूपी देऊन एकमेकांचे सुयश चिंतण्याची प्रथा आहे उत्तर भारतात  निमित्याने गेली ९ दिवस सुरु असणाऱ्या रामकथेचा शेवट रावणदहनाने करण्याची परंपरा आहे आपल्या महाराष्ट्राचा विचार करता या दिवशी होणाऱ्या दोन विशेष कार्यक्रमाला अनन्य साधारण महत्व आहे . एक म्हणजे मुंबईतील दादर भागातील शिवाजी पार्कच्या मैदानावर होणारे हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जनतेला असणारे संबोधन आणि दुसरे म्हणजे नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालकांचे संघाच्या स्वयंसेवकाला संबोधित करून होणारे  होणारे संबोधन . बाळासाहेब ठाकरे यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांचे पुत्र आणि विद्यमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हहे त्यांच्या वतीने जनतेला संबोधित करतात . या दोन्ही भाषणांना आपल्या महाराष्ट्रात विचारांचे सोने म्हणण्याची परंपरा आहे . स्वयंसेवकांना उद्देशून असणारे संबोधन हे सकाळी असते तर शिवसेना प्रमुखांचे संबोधन सायंकाळी असते दोन्ही संघटनांची भावी रणनीती या भाषणांतून स्पष्ट होत असते दोन्ही संघटनाचा  प्रभाव महाराष्ट्रावर  मोठ्या प्रमाणात असल्याने महाराष्ट्रात या दोन्ही भाषणाची  मोठी  चर्चा या निमित्याने होत असते 

            सन २०२१ च्या संबोधनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय समाजात बंधुत्व वाढण्याची गरज बोलून दाखवली  समाजात बंधुत्व नसल्याने समाज विस्कळीत होतो ज्याची किंमत आपण फारच मोठ्या प्रमाणवर चुकवली आहे .सध्या ज्या प्रमाणात  प्रादेशिक अस्मिता वाढत आहे ते धोक्याचे आहे  समाजात सर्व धर्म पंथाचा समावेश होतो सध्या ज्या व्यक्ती हिंदू नाहीत त्यांचे मूळ हे हिंदू धर्मातच सापडते त्यामुळे त्यांचा द्वेष करू नये . सध्या आपण  आपल्या संस्कृतीतील स्व हरववले आहे आपण हे शोधून त्याचे जतन करायला हवे  पारतंत्र्याचवेळी आपल्या समाजात स्व ची जाणीव मोठया प्रमाणात होती मात्र कालांतराने ही  हरवली असे त्यांनी यावेळी सांगितले या संबोधतानांत त्यांनी पाकिस्तानचा उघड उघड उल्लेख केला मात्र चिंच उघड उघड उल्लेख त्यांना सुमारे सव्वा तासाचा संबोधांत मला आढळला नाही  पाकिस्तानमधून विविध कारणांनी विस्थापित होऊन भारतात आक्षयास आलेल्या मात्र भारताचे नागरिकत्व न मिळालेल्या लोकांविषयी त्यांनी संवेदना व्यक्त केली आतापर्यंत जम्मू काश्मीरच्या सरकारने विकासाला खीळ बसेल असाच कारभार ठेवला आता तेथील जनता विकासची फळे चाखत आहे त्यामुळे त्यांच्यात आपलेपणची भावना कशी निर्माण होईल ? याकडे लक्ष देण्याचे  आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले 

तर शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या संबोधनात पहिल्या शब्दापासून त्यांनी भाजपावर शरसंधान साधण्यास सुरवात केली . नेहमी दादर येथील शिवाजी पार्क येथे होणारा  दसरा मेळावा षण्दानामुख सभागृहात झाला . सध्याचा करोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन सभागृहाच्या एकूण आसन क्षमतेच्या ५० % .जगावर हे संबोधन सुरु झाले . काही लोकांकडून होणारी  महाराष्ट्राची  बदनामी लक्षात घेऊन त्यावर त्यांनी शिरसंधान साधले भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांनी मुख्यामंत्रीपदाबाबत एक विधान केले होते , त्याचा खरपूस समाचार त्यांनी आपल्या संबोधनातून घेतला भाजपात आलेल्या काही लोकांवॉर देखील त्यांनी टीकेची झोड ओढली आर एस एस च्या भाषणाच्या संदर्भ घेत त्यांनी सध्या देशभरात सुरु असणाऱ्या कृषी आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली सदर आंदोलक परग्रहावरून तर आली नाहीत ना  ? असा   खोचक प्रश्न त्यांनी

विरोधकांना विचारला सध्या केंद्राची  राज्य सरकारच्या कारभारातील लुडबुड वाढल्याचे आणि त्यावर विचार मंथन  आवश्यक  त्यांनी यावेळी मांडले सध्या देशाच्या स्वातंत्र्यच्या अमृत महोत्वव सुरु आहे तो साजरा करताना काही मुद्यावर अमृत मंथन  आवश्यक आहे ज्यामध्ये महिला सुरक्षेबरोबर हा मुद्दा देखील समाविष्ट होऊ शकतो असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले काही दिवसापूर्वी महिला सुरक्षा मुद्यावर राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये काही मुद्यावर मतभेत झाले होते त्याच्या देखील उल्लखे त्यांनी आपल्या संबोधनात केला आपले जवान कोणत्या स्थितीत  रक्षण करतात याची जाणीव सर्वसामान्याना असावी यासाठी एक केंद्र उभारण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली शिवसेनेकडून करण्यात आलेल्या कामाची चित्रफीत संबोधनाच्या आधी दाखवण्यात आली 

माझंही वैयक्तिक मत विचारत घ्यायचे असल्यास राष्ट्रीय स्वयंसेवकांना संबोधित करताना चीन चा विषय संबोधनात येणे एकवेळ समजू शकतो मात्रसुमारे वर्षभरापासून सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या विषयी , बंगालमधील हिंसाचाराविषयी सध्या विविध ठिकाणी येणाऱ्या नैसर्गिक संकटाविषयी काहीतरी उल्लेख अपेक्षित होता . सायंकाळचा संबोधांविषयी बोलायचे झाल्यास मला अपेक्षित असणारया सर्व मुद्यांचा यात समावेश होता मागील काही भाषणात ज्या प्रकारच्या भाषणाचा समावेश होता ,त्याचा लवलेश देखील या भाषणात नव्हता माझ्यामते हि खूपच अभिनंदनास्पद गोष्ट आहे या दोन्ही संबधोनावरचे कवित्व पुढील काही काळ सुरूच राहील या भाषणात ज्यांवर टिका झाली आहे ते त्यावर बोलणारच असो आजपुरते इतकेच 

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?