या आत्महत्यांकडे बघणार कोण ?

         

   मी आपल्या महाराष्ट्राच्या एसटी मध्ये कार्यरत नसलो,  तरी एसटीचा चाहता आहे एसटीच्या विविध योजनांचा फायदा घेत मी महाराष्ट्र पालथा घातला आहे . माझ्या या छंदामुळे मी आपल्या महाराष्ट्राच्या एसटी प्रेमींच्या समाज माध्यमांवरील विविध गृपचा सदस्य आहे गेल्या काही दिवसांच्या या गृपवरील पोस्ट बघितल्या तर आपणास एक गोष्ट सहजतेने लक्षात येते ती म्हणजे या गृपवर  दोन ते तीन दिवसाच्या अंतरावर किमान एका एसटीच्या कर्मचाऱ्याने आत्महत्या करून जीवन संपवले असल्याची पोस्ट येत असते .
          आतापर्यंत सुमारे दहा ते पंधरा एसटी कर्मचाऱ्यांनी मृत्यूस कवटाळले आहे . ज्यांनी जीवन संपवले त्या पैकी बहुसंख्य हे एसटीचा कणा  म्हणता येतील अश्या वाहक आणि चालक या क्षेणीतील कर्मचारी होते .उच्चपदस्थ अथवा एसटीच्या अन्य विभागातील कर्मचाऱ्यांनी फारच तुरळक प्रमाणात आत्महत्या केल्या आहेत  या सर्व कर्मचाऱ्यांनी अपुऱ्या आणिउशिराने मिळणाऱ्या पगारामुळे आत्महत्या केली आहे . या आत्महत्या झाल्यावर संबंधित आगारातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यास त्या पुरती ती बातमी होते मात्र त्यानंतर सर्वकाही पूर्ववत होते जणूकाही काही घडलेच नाही अश्या पद्धतीने आयुष्याचे राह्तागाने सुरु होते . मात्र ज्या कुटूंबातील सदस्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असते ते कुटूंब मात्र अत्यंत दुःखात असते घरातील कर्ता आधार गेलेला शासकीय मदत
मिळवण्यासाठी पदरचे घालून खर्च करावे लागतील का ? अशी स्थिती असते शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे आपण ज्या संवेदनशीलतेने पाहतो त्याच संवेदशीलतेने आपण या एसटी कर्मचाऱ्यांचा आत्महत्येकडे बघायला हवे . 
               आपल्या महाराष्ट्राच्या एसटी कर्मचाऱ्यांना अत्यंत तुरळक पगार मिळतो गुजरात राज्याच्या एसटीच्या वाहक आणि चालक यांच्या नोकरीची सुरवातच १८ ते २३ हजार रुपयांनी होते (हे आकडे मला गुजरात एसटीच्या वाहक आणि चालकांनी सांगितले आहेत ) त्याचा विचार करता आपल्या एसटीतील चालक वाहकांच्या निवृत्तीच्या वेळी त्यांना मिळणाऱ्या वेतनाच्या समकक्ष हे वेतन आहे .हे दिसून येते 
             डिझेलचा रोज वाढणारा दर लक्षात घेऊन  सुद्धा शासनाचा दर वाढवण्यास असणारा अनाकलनीय विरोध कोरोना संसर्गाचा धोक्यामुळे लोकांनी फिरण्याचे थांबवल्याने घटलेले प्रवाशी भारमानं या कारणामुळे उत्पन्न कमी झाल्याचा परिणाम एसटीचा तोटा वाढण्यावर होतो स्वतःच्या आर्थिक तंगीचे कारण  देत विविध सोयीसवलतीचे देय  असणारी रक्कम सुद्धा राज्य सरकारकडून देण्यात येत नसल्याने यात भरच पडते . याचा परिपाक म्हणजे एसटीतील कर्मचाऱ्यांची पगारासाठी होणारी परवड होय . ज्याचे फलस्वरूप म्हणजे मी लेखाच्या सुरवातीला सांगितलेली परिस्थिती . एका कर्मचाऱ्यांची आत्महत्या म्हणजे त्यावर अवलुबुन असणाऱ्या सर्व कुटूंबियांची हेळसांड
एका कुटूंबियात सुमारे चार जण असतात त्या सर्वांची होरपळ वेळेत पगार न झाल्याने होते कोणीही व्यक्ती सहजासहजी मृत्यूसतयार होत नाही प्रत्येकास आपला जीव प्रिय असतो असे असून देखील तो मृत्यूस कवटाळतो याचा शासनाने सहृदयतेने विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे तर आणि तरच ग्रामीण जीवनाचा कणा असणारी आपली एसटी टिकेल अन्यथा नाही .एसटी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवते खाजगी वाहतूकदार तसे कदापि शक्य नाही त्यामुळे ग्रामीण गोरगरीब जनतेचा विचार केला असता एसटी टिकणे अत्यावश्यक आहे  
     


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?