रेन रेन गो अवे !

 


          इंग्रजीत एक बालगीत आहे "रेन रेन गो अवे , लिटिल मीना वाँटस् टु प्ले"  या बालगीतातील बालिका तीला खेळायला मिळावे,  म्हणून पावसला जाण्यास सांगते अशी कवी कल्पना आहे . मात्र खेळण्यासाठी नव्हे तर  रोजच्या जीवनाची रहाटगाडी चालण्यासाठी  रेन रेन गो  अवे ! म्हणण्याची  केरळच्या जनतेवर आली आहे . केरळमध्ये पावसाने  उच्छाद मांडला  असून  मजकूर लिहण्यापर्यंत पावसाने ३१ जणांना पावसामुळे प्राणास मुकावे लागले आहे . केरळच्या बहुतांश भागात पावसाचा अति धोकादायक समजला जाणारा रेड  अलर्ट जाहीर करण्यात आला असून अन्य भागात तुलनेने काहीशा सौम्य असणारा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे . पंतप्रधान नरेंद्र  यांनी देखील ट्विटरवर  केरळच्या नैसर्गिक संकटाबाबत संवेदना स्पष्ट केली आहे . नॅशनल डिझास्टर रिलीफ फोर्स (NDRF ) आणि लष्कराच्या तुकड्यांमार्फत केरळमध्ये बचावाचे कार्य जोरात सुरु आहे .मान्सुमच्या
पावसाच्या अखेरच्या टप्यातील पावसाने केरळची ही दैनावस्था केली आहे . (नेहमीच्या वेळापत्रकानुसार 1सप्टेंबररोजी मान्सुम पंजाबमधून परतण्यास सुरवात करतो..आँक्टोबरचा 5ते15 तारखेपर्यत मान्सुम महाराष्ट्रातून माघार घेतो तर 31 आँक्टोबर रोजी केरळमधून मान्सुम पुर्णतः परततो. सबब अजूनही मान्सुम केरळमध्ये आहेच.) या पावसाळा बंगालच्या उपसागरतील हवेच्या बदलामुळे अतिरिक्त प्रमाणात बास्पा चा पुरवठा झाल्याने केरळमध्ये पूर्वी या दिवसात कधीही नव्हती अशी स्थिती निर्माण झाली आहे 

गेल्या वर्ष दीड वर्षाचा जगभरातील हवामानाचा अनुभव लक्षात घेता पावसाने ऑस्ट्रोलीय , चीन कोकण, युरोप उत्तर आणि ईशान्य भारत आदी जगाच्या विविध भागात पावसाने  रौद्ररूप दाखवल्यानंतर  केरळमध्ये आपले रौद्रस्वरुप दाखवत आहे ज्यामुळे ३१ जणांना प्राणास मुकावे लागले आहे केरळच्या पावसामुळे मानवाने धर्म वंश भाषा जाती अश्या कोणत्याही कृत्रिम भेदापेक्षा आपण हवामन बदल या संकटाला सामोरे जाण्यासाठी एकत्र आले पाहिजे हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात जगभरातील देश कॉन्फरन्स  ऑफ पार्टीझ या परिषदेसाठी  ( कॉन्फरन्स  ऑफ पार्टीझ  ही COP नावाने अधिक प्रसिद्ध आहे ) एकत्र येतात ज्यामध्ये वामानबदलासाठी  कृती आरखडा असावा यावर फक्त विचारमंथन  करतात प्रत्यक्षात यावर काहीही कृती करत नाहीत गेल्या वर्ष डिड वर्षातील लहरी हवामन बघता यावर्षी  स्काटलंड मधील ग्लासको येथे ३१ ऑक्टोबर ते  12 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या या परिषदेत यामध्ये बदल होईल अशी आशा आहे मागच्या 2020 वर्षी ही परिषद कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन झाली नव्हती दरवर्षी डिसेंबर महिन्यात होणारी हि परिषद यावर्षी एक महिना अगोदर होत आहे यामध्ये सकारत्मक बदल व्हावे अशी अशा युकेच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे गेल्या  2 वर्षात जर्मनी आणि अमेरिकेत सत्तांतर होऊन पर्यावरणाविषयी आस्था असणारे सत्तेत आले हायेत त्यामुळे यावेल्स युकेच्या पंतप्रधानाची अशा पूर्ण होऊ शकते हातात ती खरोखरीच पूर्ण का हे येणारा काळच ठरवेल 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?