अस्वस्थ शेजार !

   


    आपल्या भारतात आगामी काळात होणाऱ्या विविध राज्यातील आणि महाराष्ट्रातील विविध स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकांवरून राजकारण रंगत असताना भारताच्या पश्चिमेकडच्या शेजाऱ्याकडून चिंतेत वाढ करणाऱ्या दोन बातम्यांनी भारताच्या भविष्यात प्रचंड अडचणी वाढून ठेवल्याचे दिसून आले आहे . या दोन्ही बातम्या पाकिस्तानविषयी आहे . त्यातील एक गोष्ट पाकिस्तानच्या राजकीय स्थैर्याशी  निगडित आहे तर दुसरी पाकिस्तानच्या आर्थिक घडामोडीशी निगडित आहे पाकिस्तान आपला शत्रू आहे म्हणूनच नव्हे  तर पाकिस्तानमधील छोट्यात छोट्या घडामोडींच्या आपल्यावर परिणाम होत असल्याने त्या आपणाला माहिती असणे आवश्यक आहे . माझे आजचे लेखन त्याविषयी . 

       तर मित्रानो पाकिस्तानची गुप्तचर संघटना आय एस आय च्या !!प्रमुख पदांवर कोणाची नियुक्ती करायची यावरून पाकिस्तानचे लोकनियुक्त इम्रान खान यांचे सरकार आणि लष्कर यांच्यात वाद निर्माण झाला आहे . ज्यामध्ये लोकनियुक्त सरकारने माघार घेतली असून लष्कराचा अधिकृत घोषणा नसली तरी विजय झाला आहे .ही घडामोड सुरु झाली ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात अर्थात १० ऑक्टोबर रोजी, इम्रान खान यांच्या सरकारने  आय एस आय च्या प्रमुख पदांवर कोणाची नियुक्ती करायची? याबबाबत सरकार मुलाखत घेणार असल्याचे जाहीर केले.  त्याला लष्कराने विरोध करत सरकारने देशाच्या सरंक्षणात महत्ताची भूमिका असणाऱ्या या बाबत सर्व बाबी लष्कराकडे सोपवून यातून अंग काढून घ्यावे अशी भूमिका जाहीर केली त्यांनी सरकारला अंधारात ठेवत आपला उमेदवार देखील जाहीर केला . जो लेफ्टनन जनरल अंजुमन  हा आहे . पाकिस्तानच्या सध्या कार्यरत असणाऱ्या संविधानानुसार (पाकिस्तानचे पहिले संविधान १९५६ साली तयार झाले जे १९६२ साली पूर्णतः रद्द करून   नव्याने संविधान तयार करण्यात आले १९६२ तयार करण्यात आलेले संविधान  १९७१ मध्ये रद्द करून पुन्हा  पूर्णतः नवीन संविधान तयार करण्यात आले . ज्यामध्ये १९९८ साली नवे संविधान वाटावे  बदल करण्यात आले जे सध्या 

डावीकडील नवीन प्रमुख तर उजवीकडे
आता माजी झालेले प्रमुख 
सुरु आहे) आय  एस आय प्रमुखांची नेमणूक पंतप्रधान लष्करप्रमुखांच्या सल्याने करतील . त्यानुसार इम्रान खान आय एस आय चा प्रमुख ठरवत असताना लष्कराने त्यास विरोध केला आहे . जे भारतासाठी धोक्याचे आहे कारण  लोकनियुक्त सरकारपेक्षा लष्कर प्रबळ ठरत असल्याचे ते निदर्शक आहे पाकिस्तान आणि भारताच्या वाटचालीचा आढावा घेतल्यास जेव्हा पाकिस्तानात लष्कर अधिक प्रबळ असते तेव्हा भारतात दहशतवादी कारवाया वाढतातत  जे सध्या घडत आहे 

एकीकडे पाकिस्तानात राजकीय घडामोड घडत असताना आर्थिक स्थितीवर देखील अपयशी ठरत आहे सलग चौथ्या वर्षी पाकिस्तान फायनशील एक्शन टास्क फोर्स अर्थात एफ ए टी ए च्या ग्रे लिस्ट मध्ये आला आहे . जो किमान एप्रिल २०२२ पर्यंत तिथे राहू शकतो ज्यामुळे जागतिक बँक,  आंतरराष्ट्रीय नाणेनिधी  आशियाई डेव्हलमेंट बँक संख्या वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यात पाकिस्तानला अडचणी येणार आहेत  अर्थात चीन पाकिस्तानला कर्ज पुरवठा करत असल्याने पाकिस्तानला याचा थोडा कमी फटका बसेल . मागच्या वर्षी सांगितलेल्या ३० पैकी २४ निकर्ष पूर्ण करून सुद्धा महत्वाचा दहशतवाद्यांना मदत करण्याचा मुद्यावर अपेक्षित प्रगती न केल्याने पाकिस्तान ग्रे लिस्ट मध्येच आहे मात्र इतर मुद्यावर चांगली प्रगती केल्याने तो ब्लॅक लिस्ट मध्ये नाही . पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी भारतामुळे पाकिस्तान अजून ग्रे लिस्टमध्ये असणल्याची गरळ ओकली

 आहे ज्यासाठी त्यांनी भारताचे  परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या विधानाचा संदर्भ दिला आहे मात्र एफ ए टी एफ ने हा सामूहिक निर्णय असून यात एका देश कोणतंही प्रभाव टाकू शकत नाही  स्पष्टीकरण दिले आहे नुकत्याच जाहीर झालेल्या या यादीत तुर्कस्तान (ज्याला तुर्की देखील म्हणतात )या पाकिस्तानच्या मित्राचा देखील सहभाग करण्यात आला आहे {तुर्कस्तान या देशाच्या उच्चाराशी साधर्म्य दाखवणारे अजून दोन देश आहेत }. पाकिस्तान आर्थिक आणि राजकीय अडचणीत मदत म्हणून तुर्कस्तान बघत होता तो देश देखील अडचणीत आला आहे  त्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे 

पाकिस्तान आपले शत्रू राष्ट्र असून त्याची आपणाबरोबर सीमा देखील आहेत तेथील सियालकोट लाहोर सारखी अनेक शहरे भारत पाकिस्तान सीमेपासून पन्नास किमीच्या आत आहेत त्यामुळे तेथील प्रत्येक घडामोडीचा आपल्यावर परिणाम होतो . त्यामुळे आपणास तेथील घडामोड माहिती असणे आवश्यक आहे माझे आजचे लेखन त्याबाबत माहिती देण्यासाठीच होते जे तुम्हला आवडले असेल असे मानून सध्यापुरती आपली रजा घेता ,जय हिंद 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?