एसटीचे खरे शत्रू !

 

      आपल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी या साठी एसटीने  आपल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना   अनुक्रमे  जेमतेम अडीच आणि पाच हजाराचा बोनस दिला.  मी जेमतेम हा शब्द वापरतोय कारण पुरेसे करसंकलन न झाल्याने  आर्थिक स्थिती दोलायमान असणाऱ्या नाशिक महानगरपालिकेने आपल्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना तब्बल १५ हजार बोनस दिला आहे . एसटीच्या सध्याच्या या आर्थिक स्थितीला अनेक घटक कारणीभूत आहेत ज्यामध्ये राज्य सरकारकडून विविध सवलतींचे अनुदान वेळेत न मिळण्याबरोबरच आपल्या महाराष्ट्राच्या एसटीला इतर राज्यातील एसटीकडून देण्यात येणारे आव्हान हे प्रमुख धोके आहेत 
           आपल्या महाराष्ट्रातील जवळपास सर्वच तालुक्यात इतर राज्याचा एसटी आपली सेवा देतात . त्यासाठी ते आपल्या एसटीच्या जागांचा वापर करतात आपण एकवेळ खासगी बसवाहतूकदारांना बसस्थानकापासून काही अंतरावरच व्यवसाय करावा असे बंधन घालू शकतो. मात्र या इतर राज्यातील परीवहन सेवांना असे बंधन घालणे निव्वळ अशक्य आहे नाशिकहून वायव्य कर्नाटक राज्य परिवहनाच्या ३ बसेस बेळगावला जातात .मात्र महाराष्ट्राची एकही बस
नाशिकहून बेळगावला जात नाही नाशिक ते बेळगाव हे अंतर ६०० किमी आहे .ज्यातील ४७५ किमी अंतर  महाराष्ट्रात तर कर्नाटकमध्ये फक्त १२५ किमी आहे  म्हणजेच शेवटचे १२५ किमी अंतर वगळता कुठेही आपण चालक आणि वाचकांची दुसरी फळी घेऊ शकतो मात्र असे असून देखील आपली एकही बस नाशिकहून बेळगावला जात नाही तीच गत गुजरात राज्य परिवहन महामंडळाची कोल्हापूरहून कागलच्या दिशेने २५ किमी अंतर गेले कि आपण कर्नाटक सुरु होते अश्या कोल्हापूरहुन अहमदबाद साठी गुजरात राज्य परिवहन महामंडळ व्होलो सेवा पुरवते . मुंबई दिल्ली राष्ट्रीय महामार्गाने ठाणे आणि नंतर मुंबई बंगलोर राष्टीय महामार्गाने कोल्हापूर अशी सेवा ते पुरवते आपल्या महाराष्ट्रातील नागपूरहून उत्तर प्रदेशातील वाराणशीसाठी मध्यप्रदेश राज्य परिवहन महामंडळ सेवा पुरवते . पुण्याहून महाराष्ट्र कर्नाटक सीमा कोलापूरचा विचार करता  सुमारे २५० किमी दूर आहे असे असून देखील पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात रात्री पुण्याहून कोल्हापूरला जाण्यासाठी महाराष्ट्रापेक्षा  कर्नाटकच्या बसेस अधिक संख्येने आढळतात .वायव्य  कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची निपाणी ते औरंगाबाद अशी बससेवा आहे आपल्या एकूण ५०० किमीच्या प्रवाश्यात हि बस कर्नाटकमध्ये फक्त १५ किमी अंतर पार करते कोल्हापूरला आल्यावर महाराष्ट्राच्या बसेस जो मार्ग वापरतात तो नेहमीच्या सातारा पुणे शिरून रांजणगाव हा मार्ग न वापरता कराड नंतर फलटण नीरा दौड अहमहनगर अशा मार्ग
निवडते .आपली एकही बस या मार्गाने कोल्हापूरहून औरंगाबादला जात आंही आपल्या महाराष्ट्राच्या मार्गाचा त्यांचा अभ्यास 
 किती   दांडगा आहे याचे हे ऊत्तम उदाहरण आहे मी सांगितलेली उदाहरणे प्रातिनिधिक आहेत 
      इतर राज्ये आपल्या महाराष्ट्राला त्यांच्या राज्यात फारसे आत येऊ देत नाहीत आपल्या बसेस प्रामुख्याने  सीमावर्ती भागातच सेवा देतात . त्यामुळे इतर राज्यांना आपण किती आतमध्ये येऊ देयचे याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आपल्या महाराष्ट्राच्या एसटीच्या आर्थिक स्थितीकडे बघून करायला हवा तर आणि तरच एकेकाळी देशाला नवी दिशा देणारे आपले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ टिकेल ही कटू असली तरी काळ्या दगडावरील रेघ आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?