जळता पाकिस्तान

       

 आखाती देशात सुरु  असणाऱ्या क्रिकेटच्या टी २० विश्व चषकात पाकिस्तान एकामागून एक सामने जिंकत असले तरी,  पाकिस्तानमधील अंतर्गत स्थिती अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचली आहे . पाकिस्तानी सरकारने बंदी घातलेल्या मात्र झालेल्या स्थानिक निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या "तैहरिके ए लब्बेक पाकिस्तान" या पक्षातर्फे पाकिस्तानच्या पंजाबची  राजधानी असलेल्या लाहोरपासून पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादपर्यंत  लॉन्ग मार्च काढण्यात येत आहे . हा मजकूर लिहीत असताना (३० ऑक्टोबर ) हे  आंदोलक वझीराबाद या शहरात आलेले आहेत . शुक्रवार २९ ऑक्टोबर रोजी हे  आंदोलक गुजरानवाला या शहरातून वझीराबाद या शहरात पोहोचले  यापुढील वाटचाल पक्षाच्या शीर्ष नेत्यांच्या सांगण्यावरून होईल , अशी आंदोलनकांची भूमिका आहे "
         तैहरिके ए लब्बेक पाकिस्तान" या संघटनेने केलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ते सौदी अरेबियाच्या दौऱयावरून परत येताच तातडीची पाकिस्तनच्या नॅशनल सिक्युरिटी कॉउंसिल ची बैठक बोलवली आहे  शहरातील इंटरनेटची सेवा बंद करण्यात आलेली असून पाकिस्तनच्या इलेट्रीक वृत्तवाहिन्यांवर या संबधीचे वृत्त प्रकाशित करण्यावर पाकिस्तानच्या इलेट्रीक वाहिन्यांच्या संघटनेमार्फत बंधने लादण्यात आलेली आहेत .तसेच ही  बंधने पाकिस्तानी इलेट्रीक माध्यम कायदा २०००२ च्या
अन्वये घालण्यात आली आहेत पाकिस्तानच्या अनेक शहरात मोठं मोठाले कंटनेर टाकून रस्ता  बंद केला आहे काही दिवसापूर्वी पाकिस्तानची राजधानी इस्लमबाद आणि रावळपिंडी या जुळ्या शहरांना जोडणारी BRT  सेवा बंद करण्यात आली होती जी नंतर सुरु केल्याचे आंतराष्ट्रीय माध्यमात या विषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातमीत म्हंटले आहे लाहोर ते रावळपिंडी ,क्येटा आदी दरम्यानच्या काही रेल्वे रद्द करण्यात आलेल्या आहेत "तैहरिके ए लब्बेकचे समर्थक पायी आणि विविध वाहनातून वेगाने इस्लामाबादकडे जात असल्याचे चित्र सध्या पाकिस्तानात दिसत आहे 
                  गेल्या पंधरा दिवसापासून सुरु असलेल्या या आंदोलकांपैकी सुमारे ३५० आंदोलकांना पाकिस्तानी सरकाकडून या आधीच सोडून देण्यात आले आहे . त्याच्यावर पाकिस्तानच्या विरोधी पक्षांकडून टीकेची झोड उठवण्यात येत आहे तर पाकिस्तानी सरकारच्या मते कोणत्याही सरकारचे काम देशातील वातवरण शांत ठेवणे नाराज गटांशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर करणे हे असते बळाचा वापर करत आंदोलन चिरडणे हे कोणत्याही सरकारचे काम असूच शकत नाही आणि त्यानुसारच आम्ही आंदोलनकाना सोडले आहे . 
पाकिस्तानी मुस्लिम लीग या पक्षाच्या मते लष्कराने त्यांचे सरकार कमकुवत होण्यासाठी या भस्मासुराची निर्मिती केली जो आता प्रचंड प्रमाणात विध्वंस करत आहे  तर पाकिस्तानी मुस्लिम लीगच्या विरोधकांनुसार पाकिस्तानी मुस्लिम लीगनेच आपल्या विरोधकांवर मत करण्यासाठी या भस्मासुराची निर्मिती केली 
            फ्रान्सच्या नागरिकाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करत इस्लाम धर्माचे संस्थापक मोहमदद पैगंबर यांचे चित्र प्रसिद्ध करून मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्यामुळे पाकिस्तानने फ्रान्सशी असणारे राजनैतिक संबंध तोडून टाकावे या मागणीसाठी या वर्षाच्या सुरवातीला आणि मागच्या वर्षाच्या शेवटी "तैहरिके ए लब्बेक या पक्षातर्फे पाकिस्तानात आंदोलन केले होते त्यावेळी पाकिस्तानच्या सरकारकडून  हे आश्वासन पूर्ण करण्यात
येईल असे वचन त्यांना देण्यात आले होते मात्र सरकारने हे वचन पाळले नाही तसेच "तैहरिके ए लब्बेक या पक्षाच्या संस्थापकांचा मुलगा आणि सध्याचे पक्ष प्रमुख साद रिझवी यांना अटक केली आहे सध्याचे आंदोलन सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करावे आणि साद रिझवी यांना सोडून द्यावे या मागणीसाठी होत आहे ज्याला अत्यंत हिंसक वळण लागलेले आहे या आदोलनात पोलीस प्रशासन आणि आंदोलक या दोन्हीकडील काही व्यक्तींच्या मृत्यू झाला आहे 
पाकिस्तान आपला शत्रू असण्याबरोबर पाकिस्तानमधील अनेक महत्त्वाची शहरे भारतीय सीमेपासून हाकेच्या अंतरावर आहेत त्यामुळे तेथील अशांतेचा आपल्यावर लगेचच परिणाम होतो त्यामुळे आपण त्याविषयी जागरूक राहिले पाहिजे माझे हे लेखन सुद्धा त्याच हेतूने होते जे आपणास आवडले असेल असे मानून सध्यापुरते थांबतो , नमस्कार जय हिंद 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?