जखमेवर मीठ !

         


      १ नोव्हेंबर २०२० रोजी कर्नाटक राज्याच्या ६५वा स्थापना दिवस झाला . त्यानिमित्याने कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना बेळगाव निपाणी भालकी या शहरातील आणि आसपासच्या प्रदेशात राहणाऱ्या मराठी भाषिक जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आपल्या संबोधनात त्यांनी महाराष्ट्र सीमाप्रश्न संपल्याचे आणि बॉम्बे कर्नाटक या प्रादेशिक भागाचे कित्तूर कर्नाटक असे नामकरण करत असल्याचे जाहीर केले . एकाचवेळी राज्याच्या संस्थापक दिनाला कोरोना संसर्गाची भीती न बाळगळता कार्यक्रम केले . मात्र मराठी भाषिकांना महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात यावे या साठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बेळगावच्या कार्यक्रमला परवांनगी नाकारली . कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांवर अत्यंत अत्याचार करण्यात येतात . त्यांना त्यांच्या इच्छेविरुध्द्व सक्तीने कन्नड भाषेत व्यवहार करण्यास भाग पाडले जाते . त्यामुळे तेथील जनता महाराष्ट्रात येण्यास आसुसलेली आहे .  भागाचे नाव बदलून या भागाशी असणारी महाराष्ट्राची नाळ पूर्णपणे तोडण्याची पूर्ण तयारी केल्याचे दिसून येत आहे . अनेकजण कुठे पाकिस्तानात रहातात का ? भारताच्याच दुसऱ्या राज्यात तर राहतात मग नेहमी तुमच्या विरोध का ? असा सूर लावतात. त्यांना माझे सांगणे आहे की कर्नाटक आणि महाराष्ट्र जरी भारताचे भाग असले तरी कर्नाटक सरकारची मराठी भाषिकांस असणारी वागणूक पाकिस्तानची  भारतीय नागरिकांशी जशी वागणूक असेल तशीच असते त्यामुळे या मुद्याला काहीच अर्थ नाही 

        मी कोल्हापूर शहराला चार ते पाच वेळा भेट दिली आहे कोल्हापूर शहरापासून २५ किमीवर कर्नाटक राज्य सुरु होते मात्र कोल्हापूर शहरात कन्नडचा क औषधाला देखीलसुद्धा ऐकू येत नाही नाशिककला अत्यल्प स्वरूपात का होईना गुजराती भाषेतील वर्तमानपत्र आणि पाट्या दिसतात .तितक्याही पाट्या कोल्हापूरमध्ये दिसत नाही कोल्हापूर


बेळगाव  या जिल्ह्यांच्या सीमेवरील काही गावात अत्यंल्प स्वरूपात कानडी ऐकू येते . मी भूगोलाच्या लोकसंख्या भूगोल या उपशाखेचा पदव्युत्तर शिक्षणात अभ्यास केला आहे त्यांचा ज्ञानावर सांगतोय आपण बटन दाबले की लाईट लागतो पुन्हा बटन दाबले की लाईट  होतो त्याप्रमाणे एखादा विभाग संपलाआणि दुसरा विभाग सुरु झाल्यावर  की पहिल्या भागातील  बहुसंख्य असणारे लोकांची संख्या शून्य होऊन दुसऱ्या भागातील लोकसंख्या संख्या १०० % होत नसते लोकसंख्येतील बदल हळूहळू होत जातो सीमारेषेपासून पन्नास किमीनंतर हा बदल  स्पष्टपणे जाणवतो कोल्हापूरला कन्नडचा क देखील जाणवत नसल्याने मी  बेळगावला कधीही गेलेलो नसतो तरी या अभ्यासानुसार  सांगतो बेळगावला मराठी भाषिकांची संख्या प्रचंड स्वरूपात आहे आता कन्नड भाषिक भाषिकांची संख्या जाणीवपूर्वक वाढवून  तेथील लोकसंख्येचा कल काहीश्या विस्कळीत करण्यातआलेला असला तरी हा भाग कर्नाटकचा नाही तर महाराष्ट्राचाच  शोभतो  तो महाराष्ट्रात येयलाच हवा . तर आणि तरच मराठी भाषिकांचे राज्य म्हणून महाराष्ट्र पूर्ण राज्य म्हणून आकारास येईल 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?