जिएसटी संकलन किती खरे किती खोटे !

     


    केंद्र सरकारकडून 2 नोव्हेंबर रोजी जीएसटी संकलन सुरु झाल्यापासूनच दुसऱ्या क्रमांकाचे जीएसटी संकलन ऑक्टोबर महिन्यात झाल्याचे जाहीर करण्यात आले . ज्यामुळे कोरोना संसर्गाच्या काळातील अर्थव्यवस्था मूळ पदावर येऊन वेगाने विकासाच्या मार्गावर धावत असल्याचे सांगण्यात येत आहे . जे अर्धसत्य आहे . जीएसटी संकलन वाढले आहे,  हे मान्य केले तरी यातील वाढ वस्तूच्या मागणीत वाढ झाल्याने अधिक वस्तू विकल्या गेल्याने नाही तर  वस्तूच्या मूळ किमतीत  वाढ झाल्यानेआणि जीएसटी विक्री किमतीवर आकारला जात असल्याने आहे .  हे आपण सिलेंडरच्या किमतीद्वारे सहजतेने समजून घेऊ शकतो 

 एलपीजी सिलिंडरची ऑक्टोबर २०२० ची जिएसटी सोडूनची किंमत ५६५ रुपये ७१ पैसे तर ऑक्टोबर २०२१ ची किंमत ८४१ रुपये ९० पैसे

५६५.७१ रुपयांचा ५ टक्के जीएसटी २८.२८ रुपये.
८४१.९० रुपयांचा ५ टक्के जीएसटी ४२.०९ रुपये.
किमतीत वाढ २९० आणि जीएसटीची वाढ १३.८१ रुपये.
सिलिंडरच्या खपात कुठलीही वाढ न होता किंमती वाढल्याने जीएसटीच संकलन वाढलेले आपणस दिसत आहे काही अर्थतज्ञांच्या मते जुलै २०१७ च्या तुलनेत काही उत्पादनाच्या किमती वाढण्याचा वेग ३५ ते ४० टक्के आहे तर जीएसटी संकलन फक्त ३० %ने वाढलंय म्हणजेच महागाईपेक्षा जीएसटी संकलन कमी दराने वाढलंय . थोडं वेगळ्या भाषेत सांगायचं झाल्यास ही जीएसटी संकलनातील वाढ नाहीये तर सूज आहे . मानवी आयुष्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीला वाढ फलदायी असते तर सूज ही विघातक असते त्यामुळे या जिएसटी संकलनाची गोष्ट कितपत आनंदाची मानायची याचा विचार करण्याची गरज आहे
माझ्यामते मागच्या दोन वर्षातल्या वेगवेगळ्या वस्तूंच्या वाढलेल्या किमतीचा विचारकेला असता वाढलेला जीएसटी फक्त उलाढाल किंवा विक्री वाढल्याने वाढलेला आहे आणि देशात सगळ आलबेल आहे हे सांगण पूर्णतः खोटे आहे हा जीएसटी वाढलेल्या किमतीमुळे वाढलेला आहे हेच खरे आहे या वाढत्या महागाईमुळे आपल्या देशातील गरीब हातावर पोट
असणारा वर्गच नव्हे तर मध्यमवर्ग सुद्धा मेटाकुटीस आला आहे नाशिकसारख्या महराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाच्या शहरातील बाजरपेठांमध्ये फेरफटका मारल्यास आपणास मध्यमवर्ग ज्या ठिकाणाहून खरेदी करतो ती ग्राहकांविना सुनी सुनी दिसतात . तर स्वस्तात माल विकणाऱ्या फुटपाथवरील विक्रेत्यांकडे गर्दी होत आहे फुटपाथवरील स्वस्तात वस्तू घेण्याचा कल बाजरपेठेत चैतन्य नसल्याचे स्पष्टपणे दाखवत आहे पिंडी ते ब्रह्मांडी , पळसाला पाने तीनच या न्यायाने नाशिकची स्थितीच सर्व देशात कमी अधिक स्वरूपात असल्याचे मानल्यास चुकीचे समजू नये
जर वस्तुंची विकी वाढल्यामुळे जीएसटी संकलनात वाढ झाली तर अर्थव्यवस्था उत्तम असल्याचे लक्षण मानता येऊ शकते . मात्र महागाईमुळे ज्याच्यावर कर आकारणी करतो त्याची किंमत वाढल्याने कर संकलन वाढले तर ते कसे काय चांगले समजता येईल ? मात्र आपल्याकडे अर्थ साक्षरता यथातथाच असल्याने (मी शेअर मार्केटमधील गुंतवणूक वाढणे यास अर्थसाक्षरता मानत नाही ) लोकांना सरकारी आकड्यामुळे अर्थव्यवस्था उत्तम असल्याचे वाटते , जे बदलणे सुजाण नागरिकांसाठी महत्त्वाचे आहे माझे आजचे लेखन त्यासाठीचा एक प्रयत्न होता जोआपणास आवडला असेल असे मानून सध्यापुरते थांबतो नमस्कार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?