अस्थिरतेच्या कड्यावर पाकिस्तान ?

   

सध्या आपल्या महाराष्ट्रात राजकीय लाथाळ्यांच्या बातम्या तसेच दिवाळीविषयक बातम्यां देण्यात माध्यमे व्यस्त असताना आपल्या शेजारील पाकिस्तान अस्थिरतेच्या कड्यावर तर नाही ना ? असे वाटावे अश्या बातम्या आंतरराष्ट्रीय माध्यमांतून वाचायला मिळत आहे .
    पाकिस्तानने त्यांच्या देशातील राजकीय अस्थिरता लक्षात घेवून तैहरीके ए लब्बेक या संघटनेवरील बंदी हटवणे, त्यांना निवडणूका लढवण्याची परवानगी देणे, तसेच पाकिस्तानच्या तूरुंगातुन 2300 तैहरीके ए लब्बेक च्या कार्यकर्त्यांची मुक्तता करण्याची बातमी ताजी असताना पाकिस्तानमधील दूसरी दहशतवादी संघटना तैहरीके तालीबान पाकिस्तान (संक्षीप्त नाव TTP) या संघटनेबरोबर शांततेविषयक चर्चा सुरु केल्याची बातमी wionने दिली आहे. टी टी पी या दहशतवादी संघटनेची स्थापना 2007 साली झाली. स्थापनेनंतर काही वर्षातच आपल्या हल्यातून सर्वाधिक बळी घेणारी दहशतवादी संघटना म्हणून तैहरीके तालिबान पाकिस्तान (टी टी पी) ओळखली जावू लागली. एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जर दहशतवादाचा मार्ग सोडून लोकशाही मार्ग स्विकारत असल्याचे दिसून आल्यास आम्ही त्याचाशी चर्चा करायला तयार आहोत, असे वक्तव्य नूकतेच 
पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी केले होते. काही आंतरराष्ट्रीय माध्यमांचा मते इम्रान खान यांचा हा प्रयत्न ट्रोजन हाँस असू शकतो. टीटीपीला अफगाण पाकिस्तान सिमेवर मोठा जनाधार आहे.याप्रदेशातील आदिवासी भागात शरीया लागू करावा असी टीटीपीची प्रमुख मागणी आहे.
याबरोबरच पाकिस्तानात पुन्हा एकदा लष्करी उठाव करुन पाकिस्तानी लष्कराचा बाहुला असलेल्या पंतप्रधान इम्रान खान याची सत्ता उलथून लष्कराने ताब्यात घेण्याची तयारी सुरु असल्याची बातमी wionने दिली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संघटना आय एस आय च्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करायची ? यावरुन लोकानियुक्त सरकार आणि लष्कराचे सबंध कमालीचे ताणले गेल्याची त्यास पार्श्वभूमीवर आहे, असे सदर बातमीत सांगितले आहे. या आधी1975, 1998साली असेच सबंध ताणले गेले असताना लष्कराने उठाव करुन सत्ता घेतली होती. पाकिस्तानच्या संविधानात 2010साली झालेल्या घटनादुरुस्तीनुसार लष्कराच्या उठावाला सर्वोच्च न्यायालय कधीही मान्यता देवू शकत नाही. तसेच असे करणाऱ्याला जन्मठेपेपर्यतची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र या तरतूदी लष्कर पाळेल का? याबाबत साशंकता असल्याचेही या बातमीत म्हटले आहे. आतापर्यंत चा इतिहास बघता जेव्हा पाकिस्तानात लष्करी सत्ता येते, त्यावेळेस भारत पाकिस्तान शांतता संपुष्टात येते. भारतात दहशतवादी कारवाया वाढतात.त्या पार्श्वभूमीवर आपण या घडामोडींकडे बघावे लागेल.
    पाकिस्तानी केंद्र सरकारला धार्मिक आंदोलनानंतर आता विरोधी पक्षाच्या महागाईविरोधातील आंदोलनांला तोंड द्यावे लागत आहे. तेथील इंधनाच्या किमती ,आणि जिवनावश्यक वस्तूंच्या किमतीने आतापर्यतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहे. तेथील सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त आहे. जागतिक इतिहासानुसार जेव्हा एखाद्या देशात महागाई प्रचंड वेगाने वाढते तेव्हा तेथील जनमानस वेगाने गैर कृत्याकडे वळते. गैर कृत्यामध्ये दहशतवादी कारवाया देखील येतात, हे आपण लक्षात घेयला पाहिजे. अजमल कसाब याचे उदाहरण आपण याबाबबत घेवू शकतो.
पाकिस्तान फक्त आपले शत्रू राष्ट्र आहे,नाही तर आपणाबरोबर मोठी भूसीमा देखील शेअर करते. पाकिस्तानची सियालकोट,लाहोर, गुजरानवाला आदि अनेक शहरे भारत पाकसिमेपासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे तेथील घडामोडीचा आपल्यावर मोठा परीणाम होतो, त्यामुळे तेथील लहानात लहान घडामोड आपल्यासाठी महत्तवाची आहे. माझे सध्याचे लेखन त्याबाबतच माहिती देण्यासाठी होते. जे तूम्हाला आवडले असेल असे मानून सध्यापुरते थांबतो, नमस्कार .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?