धोका अद्याप टळलेला नाही

     
          आपल्या महाराष्ट्रात कोणत्याही बाजारपेठेत फेरफटका मारल्यास कोव्हीड १९ नावाचा कोणता रोग कधीकाळी तरी अस्तित्वात होता का ? अशा प्रश्न उपस्थित व्हावा असे चित्र सहजतेने दिसते.  आपण कोव्हीड १९च्या प्रसार रोखण्यासाठी दिड वर्षांपूर्वी अंमलात आणणारे सुरक्षेचे उपाय पूर्णतः गुंडाळलेले दिसतआहे .करोना चा धोका पूर्णतः टळलेला आहे असेच बाजरपेठेतील बहुसंख्येने वर्तन असते . मात्र कोव्हीड १९चा धोका अद्याप टळलेला नसल्याचे,  जर्मन सरकारची अधिकृत वृत्तवाहिनी असलेली DW , फ्रांस सरकारची अधिकृत वृत्तवाहिनी असलेली  FRANCE 24,आणि भारतीय मालकीची परदेशी बातम्या सहज सोप्या भारतीय उच्चाराच्या इंगजीत देणाऱ्या WION आदींच्या बातम्या बघितल्या तर सहजतेने लक्षात येत आहे 
   युरोपीय युनियनच्या हेल्थ केअर युनिटने दिलेल्या एका इशाऱ्यानुसार युरोपातील १० देशात कोव्हिडचा धोका पुन्हा एकदा गंभीर स्वरूप धारण करत आहे . जर्मनीत नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यच्या पहिल्या पाच दिवसात दररोज केलेल्या एक हजार चाचणीत २६७ रुग्ण आजाराने गस्त असल्याचे समजत आहे , जर्मनीत , नेदरलँड आदी देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन करावा या मागणीने जोर धरला आहे ऑस्ट्रिया या देशात ज्यांनी लस
घेतलेली नाही त्यांच्यासाठी सक्तीचा लॉकडाऊन लावावा या मागणीने प्रचंड जोर धरला आहे . नेदरलँड या देशातील ६५ वर्षांवरील व्यक्तीना तिसरा बूस्टर डोस देण्यात येणार असल्याचे त्यांचा सरकारने जाहीर केले आहे अमेरिकेत ८५%नागरिकांचे लशीकरण झाले आहेत मात्र अमेरिकी प्रशासनाने युरोपातील वाढत्या कोव्हीड रुग्णसंख्येमुळे अमेरिकेत चिंताजनक स्थिती निर्माण होत आहे असे जाहीर केले आहे . युनाटेड किंग्डम (आपल्या बोली भाषेत इंग्लंड )देशाचे पंतप्रधान जॉरिस बोरिस यांनी युरोपात वाढणारी रुग्णसंख्या अत्यंत चिंता वाढवणारी असल्याचे वक्तव्य केले आहे आगामी हिवाळ्याच्या तसेच ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर यामध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे . ऑस्ट्रिया या देशात जीवनवश्यक नसणाऱ्या गोष्टी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता बंद करण्यात येत आहे तर हॉटेल मॉल आधी गोष्टी रात्री ८ वाजता बंद करण्यात येत आहे 
          आपण कोव्हीड लशीकरणबाबात संख्यने  चांगले असलो,  तरी भारताच्या एकूण लोकसंख्येचा विचार करता अद्याप मोठ्या संख्येचे लशीकरण झालेले नाही त्यामुळे आपणास मोठा धोका आहे मात्र या धोक्याची आपणस जाणीव नसल्याचेच दिसत आहे  . युरोपातील धोका फक्त त्यांना आहे आपणस नाही असे समजणे पूर्णपणे अयोग्य आहे आपल्याकडेगणपती नवरात्र आणि दिवाळीनंतर हा मजकूर लिहण्यापर्यंत फारशी संख्या वाढली नसली तरी कोव्हीड चा धोका अद्याप कायम आहे . युरोपातील वाढती संख्या आणि आपण विमान प्रवाश्यास दिलेली मोठ्या प्रमाणातील परवानगी तसेच विविध जागतिक परिषदेसाठी   मोठ्या संख्येने गेलेले भारतीय याचा विचार करता आपणाकडे हा धोका कधीही येऊ शकतो त्यासाठी आपण कोव्हिडचा सुरक्षा उपाययोजना अजून काही काळ सुरु ठेवणे आवश्यक आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?