आभाळच फाटलंय !

       


   आपल्या मराठीत एखाद्यावर प्रचंड प्रमाणात संख्येने अनेक संकटे आल्यावर त्याच्यावर आभाळ फाटलंय असे म्हणतात . आभाळ फाटलंय हा वाक्यप्रचार खरा असल्यासारखी स्थिती सध्या भारताच्या दक्षिणेच्या राज्यातील आहे तामिळनाडू पाँडिचेरी आणिआंध्र प्रदेशात प्रचंड प्रमाणात पाऊस पडत आहे . आंध्र प्रदेशाच्या तिरुपती या धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या शहरात कधीही नव्हती अशी स्थिती निर्माण झाली आहे अत्यंत मुसळधार पाऊस आणि त्यात भरीस भर म्हणून होणारे लँडसाईड यामुळे तेथील प्रशासन आभाळ फाटलंय ही स्थिती अनुभवत आहे शनिवार २० नोव्हेंबर पर्यंत या पावसामुळे विविध घटनांमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे तर एक बस वाहून गेल्याने ५०जण बेपत्ता आहेत हवाई दल आणि राज्य आपत्ती मदत दलाच्या (state disaster relief force) तुकड्यांमार्फत मोठ्याप्रमाणात बचाव कार्य सुरु आहे हवाई दल मिग १७ या हेलिकॅप्टर चा मदतीने पुरात अडकलेल्या व्यक्तींची मदत करत आहे आंध्रप्रदेशच्या रायलसीमा या भागातील ३ आणि किनारी प्रदेशातील एका जिल्ह्याला या पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे यामुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या सेवांवर देखील अत्यंत वाईट परिणाम झाला आहे तामिळनाडूच्या किनाऱ्यापासून जवळच कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने हा त्यांत मुसळधार पाऊस तिथे पडत आहे . 

तसे आंध्र  प्रदेशाच्या किनारी भागातील दक्षिणेच्या आणि तामिळनाडूच्या   उत्तर भागात ऑक्टोबर ते  डिसेंबर महिन्यात पाऊस पडणे यात नवल नाही भारताच्या जमिनीच्या विशीष्ट रचनेमुळे(भारताच्या नकाश्यात

बघितल्यास जमीन काहीशी आता गेल्याचे दिसते त्यामुळे एक विशिष्ट प्रकारची रचना तयार होते ) विजशाखापट्टणम  मासूम परतत असताना समुद्रावरून बाष्पयुक्त वारे आल्याने या भागात ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यात पाऊस पडतो . प्रश्न निर्माण झाला आहे त्या पावसाचे प्रमाण अति प्रचंड झाल्यामुळे . . काही दिवसापूर्वी चेन्नईमध्ये या पावसाने तेथील प्रशासनाच्या नाकात दम आणला होता .आता तो आंध्र प्रदेशाच्या सरकारला आपला प्रताप दाखवत आहे 

कोरोनामुळे आपल्या जीवनात एका नव्या शब्दाची भर पडली "न्यू नॉर्मल" न्यू नॉर्मल ही संकल्पना कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अमलात आणायच्या बाबतीत असली तरी हवामान बदलाच्या घटना बघता हवामान बदलाच्या बाबतीतही ही संकल्पना अमलात आणावी लागेल का ? अशी स्थिती जगभरात सध्या हवामान बदलाविषयीची आहे .दुर्दैवाने आपल्या भारतातील बहुसंख्य राज्यकर्ते या बाबत चाकर शब्द काढत नाही काही दिवसापूर्वी भारताच्या शेतकऱ्यांचे उत्पादन बदलत्या हवामानामुळे निम्यावर येऊ शकते असा एक अहवाल प्रसिद्ध झाला होता असो माध्यमे सुद्धा पंतप्रधान नरेंद मोदी यांचे cop परिषदेतील भाषणावर समाधान व्यक्त करतात इतर

राष्ट्रप्रमुख काय बोलतात याविषयी फारसे बोलत नाही त्यामुळे या विषयी जेव्हढे विचारमंथन होणे गरजेचे आहे तितके होत नाही  आंध्र प्रदेश मध्ये आलेल्या आपत्ती सारखी घटना घडल्यावर काही दिवस चर्चा होते नंतर सर्व शांत होते त्यामुळे ठोस काही लागत नाही स्वामी समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेल्या प्रमाणे उपासनेला दृढ चावलण्याची गरज आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?