बुद्धीबळाचे मानसशास्त्र (भाग4)

     

 आतापर्यत एखाद्या बुद्धीबळपटुला यशस्वी होण्यासाठी आणि प्रशिक्षकाला यशस्वी खेळाडू घडवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मुलभुत गुणांची प्राथमिक माहिती तसेच बुद्धीबळपटूस जिद्द चिकाटी आणि  स्मरणशक्ती हे गुण का आवश्यक आहे ?  यावेळी आपण एखाद्या खेळाडूंच्या यशस्वीतेसाठी पालकांची भूमिका किती महत्वाची असते ? हे बघूया   यशस्वी खेळाडूंच्या इतिहास बघितला तर,  खेळाडूंच्या पालकांच्या सहभाग महत्त्वपूर्ण असतो. मुळात महत्त्वाचे ,मोठे निर्णय घेण्याची क्षमता नसते . आर्थिक नियोजन,वेळेचे नियोजन या सारख्या बाबीबाबतचे निर्णय पालकालाच घ्यावे लागतात . आज अनेक पालक खेळाविषयी जागृत झालेले आहेत /त्यातही बुद्धिबळाकडे बौद्धिक विकासाच्या दृष्टीनेच पहिले जात आहे . त्यामुळे खेळाडूंची संख्या वाढत आहे . मात्र ज्या प्रमाणात खेळाडू घडले पाहिजे त्या प्रमाणाच्या तुलनेत आजही संख्या कमी आहे 
           पालकांची मनोभूमिका काय असते ?ते बघू . ज्यांना बुद्धिबळ येते असे पालक आपल्या पाल्यावर जिंकण्यासाठी दबाव आणतात ,  प्रसंगी एखादा सामना गमावला तर पाल्याला मारण्यासह ही कमी करत नाहीत . डाव हरणे अथवा जिंकणे , खेळाचा एक भाग आहे , हे ते पालक विसरून जातात . पालकाचे काम आहे मुलाला प्रोत्साहन देण्याचे . याबाबत यासर सेईरवान यांच्या पालकांचे उदाहरण खूपच बोलके आहे  यासर सेईरवान लहान असताना प्रतिस्पर्ध्यावर  मात कशी करायची?या बाबत एक चाल शिकले . त्यावेळेस त्यांना अपूर्व आंनद वाटला
  हे आपण  घरी जाऊन आईला सांगू अशी , त्यांना उत्सुकता लागली . क्लास संपतातच हे घाईघाईने घरी जाऊन त्यांनी आईला हाक मारली . त्यावेळेस त्यांची आई स्वयंपाक करत होती. त्यांनी आईला सांगितले स्वयंपाक सोडून लवकर ये .आई स्वयंपाक सोडून आली .त्यांनी आईला आपण नुकतीच शिकलेली मात दाखवली. आईने त्यांना शाबासकी दिली . तसेच असेच नाव नवीन शिकत रहा असे बोलून त्यांचा उच्छाह वाढवणारे वक्तव्य केले . यासर सेईरवान याच्या आईसारखेच मुलांच्या उत्साह वाढवणारी कृती करणे वर्तनमानपत्रात आलेल्या खेळाविषयीच्या घडामोडी वाचून दाखवणे . बुद्धिबळातील नवनवीन माहिती करून देणे . अश्या कृती कराव्या / यामुळे खेळाडूंचा उत्साह वाढतो, ज्याची परिणीती खेळाडूचा विकास होण्यास प्रचंड मदत होते . 
         सुपर ग्रँडमास्टर विदित यांची आई नियमित त्यांच्या पाठीशी उभी राहिली मला नियमित अनेक प्रश्न विचारून माहिती मिळवणे आदी त्यांच्या कृतींमुळे विदित घडण्यास मदत झाली जगज्जेता विश्वनाथन आंनद यांची आई प्रत्येक स्पर्धेदरम्यान त्यांच्या बरोबर असायची या सारख्या कृतींमुळे खेळाडूला प्रचंड मानसिक पाठबळ मिळते. आंतराष्ट्रीय स्तरावर सुद्धा पालकांचीवर्तणूक बघा चेन्नईमध्ये झालेल्या कॅन्डीडेट निवड सामन्यात गाटा कफन्सी  हरल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांच्या कानशिलात लगावली यामुळे ते टीकेचे धनी झाले अश्या प्रतिकूल घटनांमुळे खेळाडूंची मानसिकता कमकुवत होते हे आपणास विसरता कामा नये 
          बुद्धिबळ हा तसा  मानसिक खेळ आहे तसाच तो शारीरिक तंदरुस्तीची सुद्धा आवश्यकता असते . आपली शाररिक तंदरुस्ती नसेल तर आपण चांगल्या रीतीने खेळू शकणार नाही. याबाबत मिखाईल ताल यांच्याकडे बघता येऊ शकते . ताल नेहमी आजारी असल्याचे बोटवानीक विरुद्ध जिंकून ते जगजेत्ते झाले आणि आजारी झाले आणि दवाखाण्यात भरती झाले बोटवानीक यांनी त्यांना आव्हान दिले . हा सामना ताल यांनी सध्या खेळू नये असे त्यांना 
चाहत्यांनी आणि डॉक्टरांनी सुद्धा  सांगितले त्यांनी डॉक्टरांना प्रत्युत्तर दिले खेळाचे मला आहे आपणास नाही त्यांनी आव्हान स्वीकारले . ते बोटवानीक यांच्या विरोधात खेळले आणि पराभूत झाले . सर्वात कमी काळ ते जगजेत्ते म्हणून त्यांची इतिहासात नोंद आहे खेळाडूला आपली तब्येत चांगली ठेवावी लागते / बुद्धिबळात सातत्याने विचार करावा लागत असल्याने त्यांचे वजन कमी होते .निरोगी शरीरातच निरोगी मन कार्यरत राहते हे बुद्धिबळपटूने कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे 

सुनील शर्मा  (लेखक नाशिमधील सर्वात जुने बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत गेल्या ४५ वर्षांपासून ते बुद्धिबळ खेळाडू घडवत आहे  त्यांनी आजपर्यंत .ग्रँडमास्टर विदित गुजराथी सह अनेकांना त्यांनी घडवले आहे आज ते  बोटवानीक चेस स्कुलच्या माध्यमातून बुद्धिबळ प्रशिक्षण देत आहेत )  

शब्दांकन अजिंक्य तरटे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?