ब बुद्धिबळाचा (भाग १६ वा )


   सध्या आपल्या भारतासह जगभरातील आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या नव्या म्युटनला यशस्वीपणे तोंड कसे देयचे? याचे नियोजन केले जात असताना,  दुबई मध्ये एक वेगळेच युद्ध रंगले आहे. दोन एकतीस वर्षीय तरुण योद्धे यात आपले सर्वस्व झोकुन जिंकण्यासाठी जिवाचे रान कत आहे. या दोनमधील एक जण आपले सिंहासन वाचवण्यासाठी तर दुसरा त्या सिंहासनावर आरुढ होण्यासाठी आपले बुद्धीचातूर्य दाखवत त्याच्याशी लढाई करत आहे. हे योद्धे आहेत बुद्धिबळाचा आजमितीस असणारा विश्वविजेता नेदरलँडचा नागरीक  मँग्नस कार्लसन. जो गेल्या 4 वर्षापासून बुद्धिबळाचा अनभिषिक्त सम्राट आहे. आणि रशियाचा बुद्धिबळपटू असणारा अँन नोपोमनिची जो युरोपिय स्पर्धेचा दोन वेळेचा विजेता विजेता आहे. 
  26 नोव्हेंबर पासून ते एकमेकांना विश्वविजेतेपदासाठी आव्हान देत आहेत.  आतापर्यंत(30 नोव्हेंबर सायंकाळ) 4 खेळ झाले आहेत. या स्पर्धेआधी मँग्नस कार्लसन यांनाच संभाव्य विजेता मानण्यात येत होते,मात्र आव्हानवीर अँन नोपोमनिची यांनी विश्वविजेत्याला चांगली झुंज दिली आहे. हा लेख लिहण्यापर्यत झालेल्या 4 डावामध्ये चारही डाव बरोबरीत सुटल्याने यातील रंगत प्रचंड वाढली आहे. या दोघांमधील कोण पहिल्यांदा 7.5 गुणाची कमाई करतो, याकडे समस्त बुद्धीबळ विश्वाचे लक्ष लागले आहे. दोघांमधील जो खेळाडू 7.5 या जादूई  गुणाची कमाई करेल तो ठरेल 2021चा बुद्धिबळचा विश्वविजेता.
     26,27,28 या दिवशी झालेले डाव बरोबरीत सुटल्याने आणि 30 नोव्हेंबर 2021 हा मँग्नस कार्लस यांचा 31वा वाढदिवस असल्याने या डावात ते बाजी मारणार, अशी बुद्धिबळप्रेमींना आशा होती. मात्र आव्हानवीर अँन नोपोमनिची या खुप उत्तम खेळ करत मँग्नस यांना बरोबरी मान्य करण्यास भाग पाडले. चौथ्या डावामध्ये अँन नोपोमनिची यांनी दाखवलेल्या बुद्धीचातूर्यामुळे यापुढील लढती अत्यंत काट्याचा,अटीतटीचा बुद्धीबळपटुंचे बौद्धिक मनोरंजन करणाऱ्या होणार आहेत,हे स्पष्ट झाले आहे. चौथ्या डावाचा विचार करता अँन नोपोमनिची यांनी सुरवातीला संथ खेळ केला. मात्र नंतर मार्ग्नस कँलसन यांनी अधिक वेळ घेतला ,एका चालीसाठी तर त्यांनी अर्धा तास घेतला. आंतीम वेळेचा विचार करता मँग्नस कार्लसन यांच्या कडे जेमतेम अर्धा तास शिल्लक होता तर त्यांचे
प्रतिस्पर्धी यांच्याकडे एक तास आणि दहा मिनीटे वेळ शिल्लक होता. अँन नोपोमनिची यांच्या वजीराकडच्या हत्तीसमोरील प्याद्याने (Aफाईल) मँग्नस कार्लसन यांना बरेच जेरीस आणले या प्यादाला अँन नोपोमनिची यांच्या दोन्ही हत्तीची जोड असल्याने आणि हे प्यादे पाचव्या ओळीच्या पुढे आल्याने यास कसे रोखायचे? हा प्रश्न त्यांना पडल्याचे त्यांचा देहबोलीतून दिसत होते. अखेर डावात एकच स्थिती तीनदा आल्यावर सामना बरोबरीत सोडवायचा का? याबाबत प्रतिस्पर्ध्याला विचारणा करता येते, या नियमांचा फायदा घेत मँग्नस कार्लसन यांनी विश्वविजेता आव्हानवीर अँन नोपोमनिची याचा समोर ठेवला जो प्रतिस्पर्ध्याने मान्य केल्याने डाव बरोबरीत सुटला.
      मँगन्स यांचा हा पांढरे मोहरे घेवून खेळण्याचा दुसरा डाव होता. डावाची सुरवात दोन्ही खेळाडूंनी राजा समोरील प्यादे दोन घरे चालवून केली डावाचा सुरवातीलाच कालन्स यांनी विश्वविजेत्याचा आव्हानवीर अँन नोपोमनिची याचे राजा समोरील प्यादे मारुन डाव रंगतदार होणार याची खात्री करुन दिली. डाव त्या प्रमाणे रंगला सुद्धा. डावात कोणी एक विजेता निघेल असे सामालोचन चेस 24 या युट्यूब चँनेलवरील निवेदक करत असताना हा डाव देखील बरोबरीत सुटला , असो
आतापर्यतचे चारही डाव बरोबरीत सुटल्याने पुढील दहा डावांची रंगत प्रचंड वाढली आहे. जी वेळोवेळी मी पुढे आणेलच. तूर्तास इतकेच,नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?