सर पे लाल टोपी रुसी

     


     सन १९५५ साली राज कपूर , नर्गिस  यांनी अभिनय केलेला एक उत्तम चित्रपट येऊन गेला श्री ४२० नावाचा , त्यात राज कपूर यांच्यावर चित्रित झालेले एक गाणे आहे मेरा जुता है जपानी ....  सर पै लाल टोपी रुसी फिर भी दिल है हिंदुस्थानी .!  भारत आणि विविध देशांशी असणाऱ्या त्यावेळेच्या संबंधावर कटाक्ष टाकणारे गाणे .  ज्यामध्ये रशिया आणि भारताच्या संबंधाचा  उल्लेख करताना सर पे लाल टोपी रुसी फिर भी दिल है हिंदुस्थानी . असा उल्लेख करण्यात आला आहे 

           रशिया जगातील क्षेत्रफळाचा विचार करता सर्वात मोठा देश . भारतात उगम पावलेला बुद्धिबळ हा खेळ ज्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे असा देश . बॉलिवूड ज्या देशात अत्यंत लोकप्रिय आहे असा भारतीय उपखंडाबाहेरचा देश . एकेकाळचा बॉलिवूडचा सुपरस्टार  ,राज कपूर यांची कोणतीही धार्मिक वांशिक साम्यता नसताना  चाहते असणारा देश , संयुक्त राष्ट्र सांगता वेळोवेळी भारताची पाठराखण करणारा देश , भारताला वेळोवेळी शस्त्रात्रे देणारा देश,  जो आजमितीस देखील भारताच्या शस्त्रास्त्रे आयातीत तब्बल ६४ %  ( संदर्भ wion news) हिस्सा ठेवतो . ज्याने आजपासून ५० वर्षापूर्वी  बांगलादेश मुक्ती युद्धात अमेरिकेविरोधात भारतासाला मदत करण्यासाठी आपले आरमार उतरवले तो देश म्हणजे रशिया . ज्याला मदतीने भारताने त्याचा पहिला उपग्रह 

अवकाश्यात सोडला , पहिल्या अंतरळावीरला अवकाश्यात जाण्यासाठी मदत केली तो देश म्हणजे रशिया . ज्या देशाच्या विकास योजनांचा प्रभाव देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंवर होता तो देश म्हणजे रशिया .भारताच्या  स्वातंत्र्यानंतर ६ वर्षापर्यंत  ज्या देशाचे राज्यकर्ते भारत हा भांडवलशाली देश आहे असे मानून  भारताबरोबर मैत्री वाढवण्यास तयार नव्हते अशा देश म्हणजे रशिया ( स्टालिनच्या मृत्यपर्यंत म्हणजेच १९५३ पर्यंत भारत रशिया घनिष्ट मैत्री नव्हती ) सन १९६२ च्या भारत चीन युद्धात भारत आमचा मित्र असला तरी चीन आमच्या भाऊ आहे  भूमिका घेऊन तटस्थ राहणार देश म्हणजे रशिया . १९६५ साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाला बहादूर शास्त्रीयांच्या पाकिस्तानबरोबर करार करण्यासाठी गेला असता दुर्दैवी झाला तो करार ज्या देशाच्या शासनाकर्तेच्या मध्यस्थीने होत होता तो देश म्हणजे रशिया शांघाय को ऑपरेशन या चीनचा प्रभाव असणाऱ्या संघटनेत भारताच्या समावेश ज्या देशाच्या पुढाकाराने झाला तो देश म्हणजे रशिया . भारताबरोबर BRICS  या संघटनेमध्ये असणारा प्रमुख देश म्हणजे रशिया भारताच्या हवाई दलाच्या कणा म्हणून ज्या विमानाचा उल्लेख करता येईल त्या मिग विमानाचे तंत्रज्ञान भारताला देणारा देश म्हणजे रशिया 

   भारत रशिया विषयी हे सांगण्याचे कारण म्हणजे ६डिसेंबरपासून  रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पुतीन हे भारत दोऱ्यावर येत आहेत ब्लादीमीर पुतीन यांच्या २०२१ मधील दुसराच परदेशी दौरा आहे या आधी त्यांनी फक्त अमेरिकेचा दौरा केला आहे तर करोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन कॉन्फरन्स ऑफ पार्टीज (COP ) च्या ग्लस्को येथील अधिवेशन आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक अधिवेशनामध्ये सहभाग नोंदवला नव्हता . भारताचा दौरा करता यावा म्हणून त्यांनी चीनचा दौरा पुढे ढकलला आहे या दौऱ्यात  भारत रशिया यांच्यात होणाऱ्या व्यपारामध्ये सध्याच्या तुलनेत चार ते पाचपट वाढ करण्यासाठी विविध करार होणार आहेत सरंक्षण उपकरणाबाबत नवीन करार तर आहेच  तसेच सांस्कृतिक संबंध वाढवण्यावर देखील या दौऱ्यात भर असणार आहे त्यामुळे हा दौरा दोन्ही देशांसाठी महत्त्वाच्या आहे हे नक्की !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?