औपचारिकता बाकी (ब बुद्धिबळाचा भाग १८ वा )

   

   बुद्धिबळाचा २०२१ चा विश्वविजेता हा विद्यमान विश्वविजेता मँग्नस कार्लसन हाच होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे ८ डिसेंबर रोजी झालेल्या १० व्या डावानंतर मँग्नस कार्लसन याचे साडेसहा गुण झाले आहेत . तर विश्वविजेत्याचा आव्हानवीर असलेल्या रशियाच्या इमाँन नोपाव्हची यांचे साडेपाच गुण झाले आहेत या स्पर्धेतील ४ सामने अद्याप बाकी आहेत . विश्वविजेत्यापदाला गवसणी घालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साडेसात गुणांची कमाई करण्यासाठी मँग्नस कार्लसन यांना एक डाव जिंकणे किंवा दोन डावात बरोबरी साधणे आवश्यक आहे तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या इमाँन नोपाव्हची यांना पुढील सर्व डाव जिंकणे अत्यावश्यक आहे त्यांनी यातली कोणताही डाव  गमावला तर  गेल्या चार वर्षांपासून विश्वविजेते असणारे मँग्नस कार्लसन हेच पाचव्यांदा बुद्धिबळाचे विश्वविजेते होतील  जर पुढील एखादा डाव बरोबरीत सुटला आणि बाकीचे  तीन डाव  इमाँन नोपाव्हची यांनी जिकंले तर दोघांचे सात गुण होतील अश्या वेळेस दोघांत रॅपिड सामने खेळवण्यात येऊन त्यातील विजेता विश्वविजेता बनेल मात्र असे होण्याची खूपच कमी शक्यता आहे ऐतिहासिक म्हणून बुद्धिबळाच्या इतिहासात नोंद झालेल्या सहाव्या  डावानंतर इमाँन नोपाव्हची यांचा खेळ दुर्दैवाने खालवत चालला आहे .त्यांच्याकडून घोडचूका होत आहेत . परिणामी ते आणि  मँग्नस कार्लसन यांच्यामध्ये भरून येण्यास अशक्य वाटेल अस्से तीन गुणाचे अंतर
विश्वविजेत्याचा आव्हानवीर  इमाँन नोपाव्हची  
झाले आहे परिणामी द्धिबळाचा २०२१ चा विश्वविजेता हा विद्यमान विश्वविजेता मँग्नस कार्लसन हाच होणार हे आता जवळपास निश्चित झाल्यासारखीच स्थिती आहे आ
पल्या भारताचे सुपर ग्रँडमास्टर विश्वनाथन आंनद यांना हरवून मँग्नस कार्लसन हे विश्वविजेते झाले होते 
    बुद्धिबळाच्या इतिहासात बरच मोठा काळ हा रशियन खेळाडूंनी गाजवला.  तो रशियाचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा येईल का ? अशी आशा बुद्धिबळ विश्वविजेत्याच्या आव्हानवीर म्हणून 
माँन नोपाव्हची यांची २०२० साली विश्वविजेत्याचा आव्हानवीर असलेल्या रशियाच्या इमाँन नोपाव्हची कॅन्डीडेट स्पर्धा जिकल्यावर झाली होती जी आता संपल्यात जमा आहे.  मात्र खेळात कोण्ही कधीही बाजू दुसऱ्यावर उलटू शकते त्यामुळे  राहिलेल्या चार डावात रशियन नागरिकत्व असणारे इमाँन नोपाव्हची  बाजू उलटवू शकतात . खेळताना प्रतिस्पर्ध्याला मानसिक रित्या दबावात ठेवून डाव जिंकायचा तसेच डावातील स्थिती कशीही असो त्याचा स्वतःच्या मनस्थितीवर दुसऱ्याला दिसेल असा परिणाम न होऊ देण्याची काळजी नार्वे देशाचे नागरिक असलेले विद्यमान विश्वविजेते मँग्नस कार्लसन घेतात . परिणामी ते आज विजयाचा उंबरठ्यावर आहेत . 
       ८ डिसेंबरपर्यंत झालेल्या १० डावांमध्ये पाहिले पाच डाव अत्यंत चुरशीचे झाले होते ज्यामध्ये सर्वांच्या सर्व डावात बरोबरी झाली होती सहावा डाव ऐतिहासिक ठरला बुद्धिबळ विश्वविजेता ठरवण्याचा स्पर्धेतील हा सर्वात जास्त चाली झालेला आणि सर्वात जास्त चाललेला डाव म्हणून त्याची इतिहासात नोंद झाली तब्बल  ७ तास ४८ मिनिटे हा खेळ चालला ज्यामध्ये १३६ चाली झाल्या . ज्यामध्ये मँग्नस कार्लसन जिंकले त्यानंतर सातवा डाव पुन्हा बरोबरीत सुटला .त्यानंतरचे दोन्ही डावामध्ये  इमाँन नोपाव्हची याना पराभवाचा बघावा लागला त्यानंतर ८ डिसेंबर रोजी झालेल्या १० व्या  डावात त्यांनी बरोबरी साधली . आतापर्यंत दहा डाव झाले आहेत . चार डाव शिल्लक आहेत भारताचे सुपर ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद आणि विद्यमान विश्वविजेता मँग्नस कार्लसन  यांच्यातील
विद्यमान विश्वविजेता मँग्नस कार्लसन
विश्वविजेते ठरवण्याच्या स्पर्धेत १२ डाव खेळवण्यात येणार होते मात्र दहाव्या फेरीतच 
मँग्नस कार्लसन यांनी विश्वनाथन आनंद  यांच्याविरुद्ध साडेसहा विरुद्ध साडेतीन अशी विजयी आघाडी घेतल्याने त्यांना दहाव्या फेरी अखेरीसच विजयी घोषित करण्यात आले होते आतापर्यन्त बुद्धिबळ विश्वविजेते ठरवण्यासाठी सुरवातीचा काही काळ वगळता  १२ डाव होत असत या वर्षी १४ डाव  होणार आहेत जर या वर्षी सुद्धा १२ डावाच झाले असते तर विद्यमान विश्वविजेताच पुढील विश्वविजेता ठरला असता असो पुढील चार डाव होणार की त्याआधीच विश्वविजेता मिळतो हे बघणे इछुकतेचे ठरेल कारण तास इतिहास सुद्धा आहेच ना ? तसे झाले नाही तर १६ डिसेंबरला पुढच्या बुद्धिबळाचा विजेता जगावर राज्य करायला सज्ज होईल 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?