स्पर्धा परीक्षेत होरपळणारी तरुणाई

     

  महाराष्ट्राच्या गृहनिर्माण खात्याच्या   कॅबिनेट स्तरावरील मंत्र्यांनी ११ डिसेंबरच्या रात्री आणि १२ डिसेंबरच्या पहाटे एक व्हिडिओद्वारे म्हाडा या  महानगरांमध्ये घरे तयार करणाऱ्या प्राधिकरणातील परीक्षा रद्द करत असल्याचे आणि त्या जानेवारी २०२२ मध्ये घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले . परीक्षेचे पेपर फुटले असल्याची शक्यता आहे म्हणून या परीक्षा रद्द करत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले . परीक्षेच्या आदल्या रात्री जाहीर  केलेल्या या निर्णयामुळे या या परीक्षेच्या परीक्षार्थींमध्ये अत्यंत संतापाची लाट उमटली या आधी आरोग्य खात्यातील परीक्षांमध्ये  प्रकार झाल्याच्या संशयावरून त्या परीक्षा रद्द झाल्या होत्या . या सरकारला परीक्षा योग्य पद्धतीने का घेता येत नाहीत ? अशा रास्त सवाल त्यांचा होता सध्या एसटीचा संप सुरु आहे परिणामी ग्रामीण जनतेचे प्रचंड हाल होत आहे . खासगी वाहतूकदार मनाला वाटेल त्या दारात प्रवाश्यांकडून भाडे घेत  त्यामुळे खेड्यातील परीक्षार्थी या संकटाला सामोरे जात  या परीक्षेसाठी शहारत आले होते .  ही परीक्षा रद्द झाल्याने त्यांना या परीक्षेसाठी पुन्हा यावे लागेल . त्यांना  पुन्हा यावे लागावे येणार असल्याने त्यांचा आताच खर्च पूर्णतः वाया गेला आहे 
   मी स्वतः स्पर्धा परीक्षेच्या चक्रातून गेलो आहे त्यामुळे या परीक्षार्थींचे दुःख मला माहिती आहे या परीक्षा मोठ्या शहारत होत असल्याने जेव्हा मुळात आरामाची गरज असते अश्या परीक्षेच्या आधीच्या रात्री प्रवास करत परीक्षेचे
केंद्र असणाऱ्या शहारत जाणे जर त्यावेळेस पोहोचणारी बस नसेल तर आधी जाऊन रात्र  परीक्षा केंद्राच्या  परिसरात मुख्यतः उघडयावर काढणे या ठिकाणी प्रातर्विधीची सोडा खाण्याची सोय असली तरी बेहत्तर कसेबसे मिळेल ते अन्न खाऊन परीक्षा देण्याची ज्यांना या त्रासातून सुटायचे असेल ते मित्राच्या खोलीवर किंवा नातेवाईकाकडे जाऊन त्रास कमी करण्याचा प्रयत्न करतात परीक्षा केंद्राच्या शहारत लॉज वर राहणारे अत्यंत कमी असतात . मी २०१४  च्या आसपासची  गोष्ट सांगत  आहे . सध्या अनेक पूर्वपरीक्षा जिल्ह्याच्या ठिकाणी होत असल्याने या चित्रात त्या तुलनेत काहीसा सकारात्मक बदल झाला असेल मात्र एमपीएसी युपीईसी च्या कडून घेण्यात येणाऱ्या अनेक परीक्षा नाशिक औरंगाबाद नागपूर पुणे मुंबई अश्या शहरातच होत असल्याने त्यांच्या परीक्षेच्या बाबतीत  चित्र बरेचसे तसेच असेल  या गोंधळाविषयी विविध माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमध्ये या परीक्षार्थीना एक दिवस आधीच परीक्षा केंद्रावर जाण्याचा सूचना दिल्याचे सांगत आहे ते बघता या परीक्षा रद्द झाल्याने त्यांनी भोगलेल्या त्रासाची आपणा केवळ कल्पनाच करू शकतो
             सध्या खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी मर्यादित होत असल्याने आणि तिथे असुरक्षितता असल्याने त्या तुलनेत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सरकारी नोकऱ्यांकडे  पूर्वीपेक्षा कल वाढल्याचे दिसत आहे एमपीएससी यूपीएससी यांच्या संकेतस्थळावर आपण याबाबतची आकडेवारी सहज बघू शकतात या वाढत्या कलामुळे अनेक लोक या परीक्षेच्या काळात यातना बघतात . राजकीय पक्षांकडूनही याबाबत समाधानकारक तोडगा करण्याऐवजी सत्ताधिकारी पक्षावर टीका करण्यासाठीच या मुद्याचा वापर होतो   तंत्रज्ञानाचा वापरामुळे जागा दिवसोंदिवस कमी होत आहे याबबाबत देखील आपण एमपीएससी युपीएसी यांच्या संकेतस्थळावर आकडेवारी बघू शकतो . या वाढत्या संख्येमुळे परीक्षा घेणे  कोणत्याही सरकारी यंत्रणेचे काम सध्या अशक्य आहे यूपीएससीने देखील फक्त अर्ज भरून परीक्षा ना देणाऱ्या संख्येमुळे परीक्षा केंद्रावर असणाऱ्या हजेरीपत्रकावर सही केल्यावर संबंधिताने 
परीक्षेची संधी घेतली हि पूर्वापार युपीएससीत वापरली जाणारी पद्धत सोडून अर्ज केला म्हणजे संधी घेतली असे मानण्यास सुरवात केली . अनेक युवक युवती या स्पर्धेसाठी येत असल्याने परिणामी या  परीक्षेतील  स्पर्धाच वाढते  स्पर्धेमुळे यशाची खात्री नसल्याने मात्र यश  मिळाल्यास आयुष्याची घडी बसत असल्याने परीक्षार्थी गैरमार्गाकडे वळतो ज्याचे प्रत्यंतर रविवारी दिसले काही परीक्षार्थीनी या परीक्षा एमपीएससी मार्फत घेण्याची मागणी केली आहे माझ्यामते सध्या एमपीएससीतर्फे घेण्यात येणाऱ्या  परीक्षांची सध्या स्थिती बघता एमपीएससी कडे अधिकचा भर देणे चुकीचे आहे असे मला वाटते 
माझ्यामते या बाबाबतची प्रक्रिया अधिक पारदर्शी करणे जुन्या चुका टाळण्यासाठी प्रयत्नशील राहणे परीक्षार्थीना राहण्याच्या खाण्याच्या सोइ करणे अधिकाधिक गावात परीक्षा केंद्रे उभारणे आदी उपाय केले तरच या स्थितीत बदल होऊ शकतो 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?