४५१ वर्षानंतरची ६० वर्षे

   


   गोवा,  ४५१ वर्षे युरोपीय देशाच्या अमलाखाली असणारा प्रदेश , भारत  ब्रिटिशांकडून १९४७ ऑगस्ट रोजी स्वतंत्र झाल्यावर  १४ वर्ष १२६ दिवसांनी स्वतत्र झालेला भारतातील भूभाग म्हणजे गोवा  युरोपीय सत्ताधाधिशानी समुद्रमार्गे भारतातच्या ज्या भूभागावर पहिल्यांदा पाऊल ठेवले तो भूभाग म्हणजे गोवा . पोर्तुगाल या युरोपीय देशाने ज्या भारतीय भूभागाला ओव्हरसिस पोर्तुगाल म्हणून मान्यता देण्याची गोष्ट केली डिसेंबर १९६२ नंतर  काही काळ सातत्याने  आणि आज  देखील कधी कधी पोर्तुगाल ज्या भारतातच्या भूभागाबाबत  भारताने  तो भाग अनधिकृतपणे ताब्यात ठेवला असा आरोप  करण्यात येतो तो भाग म्हणजे गोवा.  पंडित नेहरूंच्या मुत्सद्दीपणाची खंबीरपणाची साक्ष देणारी धाडसी कृती म्हणून ज्या ऑपरेशन विजय चा उल्लेख करण्यात येतो.  ते ऑपरेशन विजय ज्या भूभागासाठी होते तो भूभाग म्हणजे गोवा 

 येत्या रविवारी अर्थात १९  डिसेंबर २०२१ रोजी गोव्याच्या ६०वा स्वातंत्र्यदिन  आहे .त्या निमित्याने समस्त हा लेख वाचणाऱ्या समस्त गोववासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा .  मधू लिमये सारख्या समाजवादी नेत्यांची गोव्याचा स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका होती गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याची धार १९२८ पासून अधिकाधिक तीव्र होता गेला ज्याला पोर्तुगीज सरकारने क्रूरपणे गोळीबार करत दाबून टाकण्याचा प्रयत्न केला.  ब्रिटिशांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी इंडियन काँग्रेस ज्या त्वेषाने लढत होती त्या  तुलनेत त्यांचा गोव्याचा लढा खूपच सौम्य होता इंडियन काँग्रेसच्या  मते ब्रिटिशांचा प्रश्न अत्यंत जटिल आहे तो सुटला की गोव्याच्या  प्रश्न सोडवणे हे चुटकीसरशी होणारे काम आहे मात्र या सहजतेने होणाऱ्या कामासाठी पुढे सव्वा चौदा वर्षे लागली पोर्तुगीज अमलाखाली असणाऱ्या दमण दीव दादरा नगर

हवेली आणि गोवा या भारतीय प्रदेशांवर असणारे नियंत्रण मोडीत काढण्यासाठी केलेल्या कारवाईचा राग पोर्तुगालल मानत आल्याने पुढे जवळपास  १४ वर्षे भारत पोर्तुगाल राजनैतिक संबंध नव्हते ब्रिटिशांबाबत हे झाले नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी . पोर्तुगाल सरकारच्या मते ज्या भागाची  ४०% संख्या कॅथलिक आहे ज्यामुळे हिंदी बहुसंख्य असणाऱ्या भारतात शांततेत राहू शकणार नाही मात्र आज ते पूर्णतः खोटे ठरल्याचे ठरत आहे पौर्तुगालने गोव्याचा प्रश्न संयुक्त राष्ट संघात देखील नेला त्यावेळी युएसएसआर आपला नकाराधिकार वापरत तो प्रस्ताव अमान्य करण्यास भाग पडले आणि गोवाय भारताचा भाग  कायम राहिले 

गोव्याचा स्वातंत्र्य लढ्याचे विविध टप्पे पडतातत . १८२०मध्ये पोर्तुगाल लोकशाही प्रधान देश बनवल्यावर मर्यादीत स्वरुपात का होईना त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला, कर देणारे तसेच पोर्तुगीज भाषा बोलू शकणाऱ्या कँथलिक खिस्तीबांधवच मतदान करु शकतील ही बंधने १९१० च्या नंतर उठवण्यात येवून हिंदू लोकांना देखील मतदानाचा अधिकार मिळाला ते आपली वर्तमानपत्रे संस्था सुरु करु शकत होती. मात्र १९२६साली लष्करी हुकुमशहाच्या हातात सत्ता गेल्यावर हे चित्र बदलले गोवेकरांवर प्रचंड बंधने आली ज्यांचे आईवडील पैकी एक पोर्तुगीज आहे,अस्या लोकांना सवलती इतरांना नाही असा निर्णय झाला ज्याचा फटाक सधन भारतीय वंशाच्या गोवेकरांना देखील बसला.गरीबांची गोष्टच सोडा. या बाबत अनेकांनी जनजागृती केली. काही गोवेकरांनी

त्याविरोधात सत्याग्रह देखील केला भारत स्वतंत्र झाल्यावर यात वाढ झाली.त्यावेळी गोव्यातील बऱ्यांच वस्तू यूरोपातून येत बाकीच्या श्रीलंका आणि पाकिस्तानातून येत त्यांची भारतीय हद्दीत तस्करी करणे सहजसोपे होते. भारताने पोर्तुगीज सरकावर दबाव टाकण्यासाठी गोव्याची नाकेबंदी केली परीणामी गोव्यात महागाई प्रचंड प्रमाणात वाढली. दमण दिव दादरा नगरहवेली स्वतंत्र झाल्यावर नाकेबंदीत  वाढच झाली त्यातच 1961 नोव्हेंबर मध्ये पोर्तुगीज सरकारने गोव्याचा जवळील समुद्रातील प्रवाशी जहाजावर भारतीय नौदलाची समजून हल्ला केला.तोच सुचक इशारा समजून भारताने तिन्ही दलांमार्फत गोव्यावर चढाई केली.आणि 36तासात गोवा भारतात आला.गोवा स्वतंत्र झाला सोळाव्या शतकांतच्या पहिल्या काही दशकांत त्यावेळच्या गोव्याच्या आदिलशाहीच्या सरदाराने आदीलशाहीपासून स्वतंत्र होत स्वतःचे  स्थापन करण्यासाठी मदत मागितलेला पोर्तुगीजांनी बळकावलेला गोव्यातून ते बाहेर पडले  

१९६१ डिसेंबर १९ रोजी गोवा स्वतंत्र झाल्यावर २६ वर्षे गोवा दिव दमण,  दादरा  नगर हवेलीसह केंद्रशासीत प्रदेश होता १९८७ मध्ये गोवा स्वतंत्र  म्हणून अस्तित्वात आले आणि  दिव दमण हा एक केंद्रशासित प्रदेश तर दादरा  नगर हवेली दुसरा केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आला  गेल्या वर्षभरापूर्वी  दिव दमण दादरा  नगर हवेली हा एकच केंद्रशासीत प्रदेश करण्यात आला आहे  गोव्याला महाराष्ट्राचा भाग बनवावा अशीही मागणी करण्यात आली होती जी गोव्यातील नागररिकानी विरोध करत अमान्य केली आणि गोवा स्वतंत्रच राहिला आज गोवा भारतातील क्षेत्रफळाच्या विचार करता सर्वात छोटे राज्य आहे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?