हवामानाचे संकट अजूनच धोकादायक

   

      हवामानाचे संकट अजूनच धोकादायक बनत चालल्याचे दिसून येत आहे नुकत्याच या बाबत दोन  अभ्यास जागतिक स्वरावर प्रसिद्ध करण्यात आले .एक अभ्यास तापमानवाढीविषयी होता तर दुसरा हवामान बदलामुळे दक्षिण अटलांटिक महासागरात आढळणाऱ्या अल्बर्ट रोस या पक्ष्याच्या वागणुकीत मोठ्या प्रमाणात विसंगती आढळून येत आहे . 
         प्रथमतः तापमानवाढीविषयी बघूया तर मित्रानो वर्ल्ड मेट्रोलॉजि ऑर्गनझेशन या संस्थेमार्फत १५ डिसेंबर  रोजी एक धक्कादायक माहिती प्रसिद्ध करण्यात आली . वर्ल्ड मेट्रोलॉजि ऑर्गनझेशन ही संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंतर्गत हवामन तसेच  वातावरण बदल या विषयी अभ्यास करणारी विविध प्रकारची नोंद ठेवणारी संघटना आहे जिचे मुख्यालय स्विझर्लंड येथील जिनिव्हा येथे आहे या संस्थेमार्फत अन्य वेळी जगातील थंड तापमानाचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सायबेरिया या प्रदेशात तापमान वाढीची आता पर्यंतची सर्वात मोठी नोंद घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले ज्या ठिकाणी अन्य वेळी उन्हाळ्यात दहा अंश ते जास्तीत जास्त १५ अंश तापमान  सॅलिसिसपेक्षा  तापमान आढळते त्या सायबेरिया प्रदेशातील वारखोनास या शहरात  २० जून २०२० रोजी तब्ब्ल ३८ अंश सेल्सियस इतके तापमान आढळले हे तापमान धक्कादायक असल्याने याविषयी पुरेसा अभ्यास करून त्या विषयी आता जाहीर करण्यात आले वारखोनास  हे शहर अर्टिक सर्कलपासून सुमारे ११५ किमी उत्तरेला आहे या शहरात १८८५ पासून हवामानाच्या नोंदी घेण्यात येतात त्यामधील हे सर्वाधिक तापमान आहे हे या शहरातीलच नव्हे तर संपूर्ण
अर्टिक सर्कलमधील ज्ञात इतिहासातील सर्वात अधिक तापमान आहे गेल्या वर्षी अर्थात २०२० साली जानेवारी ते जून दरम्यान लागलेल्या वणव्यामुळे इतके प्रचंड तापमान नोंदवले गेल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे वर्ल्ड मेट्रोलॉजि ऑर्गनझेशनतर्फे धोकादायक घटनांच्या नोंदी एका पुस्तकात ठेवल्या जातात त्या पुस्तकात पहिल्यांदाच या  घटनेच्या समावेश करण्याची वेळ आमच्यावर आली आहे असे या घटनेविषयी सांगताना वर्ल्ड मेट्रोलॉजि ऑर्गनझेशच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने सांगितले भूमध्य समुदाच्या प्रदेशात आम्ही असे हवमान बघतो असे त्यांनी सांगितले याच वेळी अंटार्टिका खंडात ७ फेब्रुवारी २०२० ला १८. ३ अंश सेल्सियस तापमान आढळले होते अन्य वेळी या भागाचे तापमान  मायनस अंश सेलियस असते हे आपण लक्षात घेयला हवे . 
      हे कमी की काय म्हणून  हवमान बदलामुळे दक्षिण अटलांटिक महासागरात आढळणाऱ्या अल्बर्ट रोस या पक्ष्याच्या वागणुकीत मोठ्या प्रमाणात विसंगती आढळून येत आहे . हा पक्षी ५० ते ६० वर्ष जगणारा आणि जोडीदाराशी एकनिष्ठ राहणारा पक्षी म्हणून ओळखला जातो या पक्ष्यामध्ये नर आणि मादी वेगवेगळे राहत असले तरी विणीच्या हंगामात हे पक्षी आपल्या जोडीदाराला शोधून काढून त्याच्याबरोबरच वंशवृद्धी करतात आधी झालेल्या अभ्यासानुसार या पक्ष्यामध्ये घटस्फोटाचे प्रमाण फक्त १ % होते  पुरेश्या प्रमाणत वंशवृद्धी ना झाल्याने होत आहे . जे आता ८ % पर्यंत वाढल्याचे नव्याने झालेल्या अभ्यासात दिसून आले आहे पक्ष्याच्या या बदलत्या वर्तणुकीच्या मुळाशी हवामान बदल हा घटक कारणीभूत ठरल्याचे रॉयल बी या संस्थेच्या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रबंधात सांगण्यात आले आहे , हवामान बदलामुळे त्यांच्या अन्न मिळण्याच्या जागा कमी होत असल्याने त्यांनाअन्न मिळवण्यासाठी  अधिक वेळ उडावे लागत आहे विणीच्या हंगामात आपल्या पाल्याना अन्न देण्यासाठी प्रचंड उडावे लागत असल्याने  त्याचा ताण येऊन त्यांच्यात हार्मोनियम बदल झाल्याने ते असे वागत आहे असे या प्रबंधात सांगण्यात आले आहे  
आणि या हवामान बदलला जर कोणता प्राणी जवाबदार असेल तर तो आपण मानव प्राणीच जावबद्र आहे हे सूर्य प्रकाशाइतकेस्वच्छ आहे  अल्बर्ट रोस या पक्ष्यातील बदल आपणास समजले तरी हिंदू धर्माच्या विचार करता ८४ लाख प्रकारचे प्राणी पृथ्वीवर आहेत त्यांच्यातली इतर प्राण्यात होणारे बदल लक्षात पण येत नाहीये हेच तर दुःख आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?