महारष्ट्रातील रेल्वे बदलतीये .....

     


    सध्या भारतातील रेल्वे झपाट्याने कात टाकत आहे . त्याचाच परिणामस्वरूप महारष्ट्रातील रेल्वेसुद्धा विद्युतवेगाने बदलत आहे रेल्वे संदर्भात विविध प्रलंबित प्रकल्प झपाट्याने पूर्णत्वाकडे जात आहे यासाठी रेल्वेत प्रशासनिक बदल तसेच पायाभूत सोयीसुविधा उभारणे याचा समावेश होत आहे गेल्या पंधरवड्यात अहमदनगर - परळी रेल्वेमार्ग , कुर्डुवाडी लातुर रेल्वेमार्ग या मार्गाबाबत अनेक चाचण्या घेण्यात आल्या तसेच अंकाई औरंगाबाबाद , मनमाड औरंगाबाद आणि औरंगाबाद परभणी या रेल्वेमार्गाबाबत विविध प्रस्तावास मंजुरी तसेच मध्य रेल्वेचा सोलापूर विभागातील सुमारे २५० किमीचा मार्ग मध्य रेल्वेचा पुणे विभागांतर्गत वर्ग करण्याबाबतचा हालचालीस वेग देणे आदी घडामोडी महाराष्ट्राचा रेल्वेबाबत घडल्या . 

    आजपासून सुमारे  २५ वर्षांपूर्वी अर्थात १९९५-९६सालच्या रेल्वेअर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेल्या मात्र निधीची अपुरी  तरतूद आणि इतर काही  बाबींमुळे फारसे काम न झालेल्या या सुमारे २८५ किमीच्या मार्गाचे काम सध्या वेगाने सुरु आहे या मार्गावरील अहमदनगर ते आष्टी या ६४ किमी मार्गावरील  सर्व रेल्वेपूल ओव्हरब्रीज अंडरपास यांची निर्मिती पूर्ण झाली आहे  पुढील मार्गवरील ८०% पुलांची कामे पूर्ण झाली आहेत पुढे  अधिग्रहणाचे काम प्रलंबित असल्याने कामास अडचणी येत आहे     या मार्गावरील एकूण ७२ किमीचे रेल्वेमार्ग पूर्ण झाला आहे तर अहमगनगर ते परळी या दरम्यानचा रेल्वेमार्ग ६०%काम कम पूर्ण झाल्याचे रेल्वेमार्फत जाहीर करण्यात आले आहे नुकतीच अहमदनगर ते आष्टी  या ६० किमीवर मार्गावर रेल्वेची चाचणी देखील पूर्ण झाली आहे या आधी

अहमदनगर ते नारायणडोह या १२ किमीचा अंतराची  तसेच अहमदनगर ते सोलापूरवाडी या मार्गाची  या आधीच चाचणी पूर्ण करण्यात आली होती या मार्गाचा विकासात हा मार्ग मोठी भूमिका बाजवेल अशी खात्री या प्रदेशातील नागरिकांना वाटते त्या  पार्श्वभूमीवर रेल्वेकडून देण्यात येणारी हि माहिती नक्कीच सुखावणारी आहे 

     रेल्वे सध्या वेगाने आपल्या मार्गाचे विद्युतीकरण करत आहे त्याचाच साखळीतील एक भाग म्हणून कुर्डुवाडी ते लातूर या १८० किमीच्या मार्गचे  विद्युतीकरणाचे काम अत्यंत वेगाने सुरु आहे त्याचाच एक भाग म्हणून कुर्डुवाडी ते पांगरी या ६० किमी अंतराच्या मार्गासाठी ईलेट्रिक इंजिनाची चाचणी घेण्यात आली या ठिकाणी ताशी १२० किमीवेगाच्या इंजिनाची चाचणी घेण्यात आली जी पूर्णतः यशस्वी झाल्याचे रेल्वेकडून जाहीर करण्यात आली  सिकंदराबादयेतही रेल्वेच्या एका कंपनीकडून या मार्गाचे विद्युतीकरण करण्यात येत आहे मराठवाड्यातील महत्त्वाचा मार्ग म्हणून हा रेल्वेमार्ग ओळखला जातो 

पुणे येथून औरंगाबाद येथे जाणे सोईचे व्हावे यासाठी मनमाडच्या जवळ असणाऱ्या अंकाई स्टेशनपासून मनमाड रेल्वेस्टेशनला बायपास करत मनमाड औरंगाबाद रेल्वेमार्गावर जाणरा नवा रेल्वेमार्ग उभारण्यास रेल्वेने मंजुरी दिली आहे या मुळे ३२ किमीचा फेरा वाचणार आहे अंकाई या ठिकाणी पुणे मनमाड आणि औरंगाबाद मनमाड रेल्वे लाईन एकत्र येत असल्या तरी एका मार्गवरुन दुसऱ्या रेल्वेमार्गवर जात येत नव्हते त्यासाठी मनमाडलाच जावे लागत असे नव्या मार्गामुळे हा अंकाई मनमाड परत अंकाई हा फेरा वाचणार आहे 

मराठवाड्याची जीवनवाहनी म्हणून ओळखल्या जाणणाऱ्या मनमाड ते नांदेड या रेल्वेमार्गवरील अंकाई ते 

औरंगाबाद या ९८ किमीच्या मार्गाचे दुपदरीकरण करण्यास रेल्वेने मान्यता दिली आहे मात्र सुरवातीला औरंगाबाद ते परभणी या रेल्वेमार्गालचे दुपदरीकरण करण्यास रेल्वेने मान्यता दिली नव्हती मात्र रेल्वेच्या मते  मार्गाचे  दुपदरीकरण करणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही रेल्वेच्या मते  ठिकाणी पुरेशी वाहतूक नाही मात्र  परिसरातील खासदारांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना यारेल्वेमार्गाचे महत्व समजून सांगितल्याने रेल्वेने दोन टप्यात काम करण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे तत्वतः मान्यता दिली आहे 

या खेरीज आता मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागांतर्गत असणाऱ्या दौड ते अंकाई या रेल्वेमार्गाचे व्यवस्थापन सोलापूर विभागाच्या ऐवजी पुणे विभांर्गत करण्याचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे  जर हे झाल्यास पुणे ते दौड या दरम्यान लोकल सेवा सुधारण्यासह पुण्याहून शिरूर रांजणगाव मार्गे अहमदनगर आणि अहमदनगर ते नेवासा शेवगाव मार्गे औरंगाबाद या दोन रेल्वेमार्गाबाबत मोठी प्रगती होऊ शकते या हस्तांतरामुळे सोलापूर विभागाचे आर्थिक उत्पन्न घटू शकते . तसेच सध्याचे सोलापूर विभागाकडे असणाऱ्या९८१ किमीचे क्षेत्र २२३ किमीने कमी होऊन ७५८  होईन तसेच त्यांच्या नियंत्रणातून २४ स्थानके कमी होतील तर पुणे विभागाचे सध्याचे असणारे ५३१  किमी क्षेत्र ७४९   इतके होईल 

महाराष्ट्रातील रेल्वे वेगाने कात टाकत आहे हेच या घडामोडीतून दिसत आहे यामध्ये मराठवाड्याचे संसदेचे प्रतिनिधित्व करणारे रेल्वेचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या सिहांचा वाटा आहे हे नाकारून चालणार नाही 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?