पूर्वांचल वेगाने रेल्वे विकासाच्या वाटेवर !

     


  आपल्या भारताचा विचार करता ईशान्य भारत हा दळणवळणाच्या बाबतीतआतापर्यंत बराच मागे होता मात्र आता विविध प्रकल्पांद्वारे हे मागासलेपण दूर करण्याचा प्रयन्त केला जात आहे ज्यादारे  ईशान्य भारतातील  प्रत्येक राज्याच्या राजधानीपर्यंत रेल्वेसेवा पोहोचवणे तसेच या आधी असलेल्या आणि डिझेलवर चालणाऱ्या रेल्वेमार्गाचे वेगाने विद्युतीकरण करणे  ही कामे करणे होत आहे या  विकास कामांच्या यादीत नुकतेच दोन कामे झाल्याचे बातम्यातून स्पष्ट झाले समर्थ रामदास स्वामी यांच्या जे जे आपणाशी ठाव ते ते सकळांसी सांगावे शहाणे करून सोडावे सकल जन या उक्तीनुसार त्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन 


       तर मित्रानो मणिपूर या राज्याची राजधानी असलेले इंफाळ शहर  रेल्वेचा नकाश्यावर आणण्यासाठी वेगात कामे सुरु आहेत रेल्वेचा एका अंदाजनुसार डिसेंबर २०२३ पर्यंत ही कामे पूर्ण होऊन सन २०२४पासून या मार्गावर रेल्वे धावायला लागेल आजमितीस हा मजकूर लिहीत असताना इंफाळ या शहरापासून १११ किमी दूर असणाऱ्या जिरीबाम पर्यंत रेल्वे धावत आहे आणि सध्या जिरीबाम ते इंफाळ या मार्गाचे काम सुरु आहे या १११ किमी अंतरात ११ स्थानके प्रस्तावित आहेत या १११ किमी पैकी ५०%किमीहून थोडेसे अधिक म्हणजे ६२ किमी लांबीचे बोगदे असणार आहेत हे बोगदे मातीचा डोंगरावर आहेत जे आपल्या सह्याद्रीपेक्षा खूपच वेगळे आहेत आपले सह्याद्रीचे डोंगर कठीण दगडाचे आहेत तर हे मातीचेआहेत   ज्याठिकाणी खणून बोगदे करणारे यंत्र किंवा सुरुंग लावून बोगदे करताना खूप काळजीपूर्वक काम करावे लागते यात झालेली छोटीशी चूक देखील पूर्ण डोगर कोसळून मोठी  दुर्घटना घडण्यास साह्यभूत ठरू शकते हा मजकूर लिहीत असताना या १११ किमी पैकी ७२ किमीचे काम पूर्ण झाले आहे या मार्गामध्ये मातीचा डोंगरातील रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा देखील आहे मी मातीच्या डोंगरातील म्हणत आहे हे लक्षात घ्या जर मातीचे डोंगर आणि कठीण दगडाचे डोंगर असा फरक ना करता सरसकट रेल्वेचा मोठा बोगदा विचारत घेतल्यास आपणास जम्मू काश्मीर मधील पीर पंजाल हाच बोगदा विचारत घ्यावा लागेल अनेक ठिकाणी आपण रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा असे शोधल्यास आपणास पीर पंजाल हेच उत्तर मिळेल त्यामुळे आपला गोंधळ होऊ शकतो म्हणून हा खुलासा करत आहे या ठिकाणी असणाऱ्या भौगोलिक परिस्थिमुळे वंदे भारत, राजधानी एक्स्प्रेस  सारख्या पॅकबंद गाड्याच चालवाव्या लागणार आहेत 

ईशान्य भारतातील रेल्वेचा विकासचा रथ अन ठिकाणी सुद्धा वेगाने सुरु आहे ईशान्य भारत या रेल्वेच्या विभागात सुमारे ६ हजार किमीचे रेल्वेमार्ग आहेत त्यातील खूपच कमी रेल्वेमार्ग इलेट्रीक आहेत रेल्वेच्या सर्व विभागात सर्वात कमी इलेट्रीफिकेशन झालेला विभाग म्हणून या विभागाची ओळख आहे ती पुसून टाकण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरु आहेत नुकतीच ईशान्य भारतातील अत्यंत महत्त्वाचे शहर असलेल्या गुवाहाटी पर्यंत रेल्वेचे  इलेट्रीफिकेशन पूर्ण झाले आहे ज्यामुळे या ठिकाणी  उर्वरित भागातुन पोहोचण्यासाठी लागणाऱ्या वेळेत सुमारे दोन तासाची बचत होणार आहे ज्यामुळे या भागातील दळणवळणाचा वेग वाढून त्या भागात सध्या आहेत त्यापेक्षा अधिक रेल्वे सुरु करता येतील ज्यामुळे हा भाग भारताच्या अधिक जवळयेईल तसेच  इलेट्रीफिकेशन असणाऱ्या  भागातून   इलेट्रीफिकेशन नसलेल्या भागात जाताना करावयाच्या इंजिन बदलीमुळे होणारे विविध प्रकारचे नियोजन ते नसलास होणार गाड्याना होणारा उशीर यातून सुटका होणार आहे तसेच डिझेल आयातीवर होणार परकीय चलनाचा खर्च देखील कमी होईल तसेच यामुळे होणारे प्रदूषण देखील कमी होईल ते वेगळेच 

बराच काळ विकासापासून दूर असलेला ईशान्य भारत आता विकासाच्या बाबतीत इतर भागाबरोबर येत आहे हेच खरे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?