सन २०२२ मध्ये पुढील खगोलीय चमत्कार आपली वाट बघत आहेत

       


   शुक्रवारी रात्री आपण नववर्ष स्वागत केले  कॊव्हिड १९ चे विविध नियम पाळत.  मागच्या वर्षातील कटू त्रासदायक आठवणी प्रसंगाला विसरत आपण नव्या वर्षाचे जोरदार स्वागत केले नव्या वर्षाबाबत आपल्या सर्वांना खूप उत्सुकता आहे पुढे येणारे वर्ष  कसे  असेल ? बाबत अनेकांना खूप उत्सुकता आहे त्यांना मी सांगू इच्छितो की , येणाऱ्या सन २०२२ मध्ये अनेक अनेक खगोलीय चमत्कार आपली वाट बघत आहे  

खगोलीय चमत्काराची सुरवात वर्षातील तिसऱ्या  दिवशी अर्थात ३ जानेवारीपासून सुरु होत आहे या दिवशी आणि याच्या पुढच्या दिवशी म्हणजे ४ जानेवारी रोजी वर्षातील सर्वात मोठा उल्कावर्षाव आपली वाट बघत आहे या दिवशी तासाला सुमारे १२० उल्का या प्रमाणात उल्कावर्षाव होणार आहे ४ फेब्रुवारी रोजी पृथ्वी  आणि शनी यांच्यामध्ये सूर्य येणार आहे ज्यामुळे शनी ग्रह सूर्याच्या प्रकाश्यात लुप्त झाल्याने  आकाश्यात पुढील काही दिवस शनी हा ग्रह दिसणारा नाही {जोतिषीय भाषेत शनीचा अस्त होणार आहे ] ९ फेब्रुवारी रोजी शुक्र वर्षातील सर्वाधिक प्रखर दिसणार आहे मात्र त्यासाठी आपणस पहाटे उठावे लागणार आहे पाहते पूवेकडे मंगळ आणि बुधाच्यामध्ये शुक्राची चांदणी डोळ्याचे पारणे फेडणार आहे २७ फेब्रुवारी रोजी भल्या पहाटे चंद्रशुक्र आणि मंगळ हे तीन ग्रह

जवळ जवळ येणार आहेत  २०२० या वर्षी डिसेंबर महिन्यात आपण गुरु आणि शनीची युती बघितली होतीच त्याचेच प्रत्यंतर यावेळी दिसणार आहे ५ मार्च रोजी पृथ्वी आणि गुरु यांच्यामध्ये सूर्य येणार आहे ज्यामुळे गुरु ग्रह सूर्याच्या प्रकाश्यात लुप्त झाल्याने आकाश्यात पुढील काही दिवस दिसणारा नाही { ज्योतिषीय भाषेत गुरूचा अस्त होणार आहे } १४ मार्च रोजी मार्च महिनातील एकमेव अशा उल्कावर्षाव होणार आहेताशी ६ या वेगाने उल्कावर्षाव होईल ४ एप्रिल रोजी आग्नेय आकाश्यात शनी आणि मंगळ एकमेकांच्या खूपच जवळ म्हणजे ० अंश १९ मिनिटे जवळ येतील मंगळाच्या उत्तरेला शनी ग्रह असेल दुर्बिणीतून हे दृश्य खूप छान दिसेल १२ एप्रिलला याहून कमी म्हणजे ० अंश ६ मिनटे या अंतरावर गुरु आणि नेपच्युन ही युती होईल ही युती साध्य डोळ्याने दिसणार नाही मुळात नेपच्यून हा ग्रहच कधी साध्य डोळ्याने दिसत नाही या युतीतील अंतर खूपच कमी असल्याने चांगल्या दुर्बिणीतूनच हीयुती दिसेल २२ एप्रिलला आपल्याला उल्कावर्षावाची मज्जा लुटता येणार आहे ताशी १८ पर्यंत उल्का यावेळी आपणास दिसतील ३० एप्रिल रोजी दक्षिण अमेरिका आणि अंटार्टिका खंडातून आंशिक खंडग्रास सूर्यग्रहांचा आस्वाद घेता येईल १ मे रोजी गुरु आणि शुक्र यांची ० अंश १४ मिनिटांवर युती होईल ज्यामुळे आकाश्यात एकच मोठा चमकदर ग्रह दिसेल सूर्योदयापूर्वी ९० मिनटे हा अनोखा खगोलीय चमत्कार बघण्यासाठी उत्तम वेळ आहे ६ मे र्जी सुप्रसिद्ध हॅलेचा धूमकेतूमुळे होणारा उल्कावर्षाव आपली वाट बघत आहे पहाटे सुमारे ४० उल्का प्रति तास या वेगाने हा उल्कावर्षाव होईल १६ मे रोजी २०२२ वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण होईल जे दुर्दैवाने आपल्या भारतातून दिसणार नाही २६ आणि २७ मे रोजी शुक्र ग्रहाच्या बिंबवरून चंद्र जाताना दिसेल आपल्या भारताच्या तामिळनाडू आणि अंदमान आणि निकोबार भागतून हा नजारा उत्तम दिसेल २८ मे रोजी गुरु आणि मंगळ यांची० अंश ३८ मिनिटे इतक्या जवळून युती होईल आग्नेय दिशेला पहाटेपूर्वीची वेळ हे बघण्यासाठी
उत्तम वेळ असेल ४ जून रोजी शनीची कडी पृथ्वीच्या समकक्ष येतील ज्यामुळे पृथ्वीवरून बघताना शनीचे  एक आडवी रेघ दोन भाग करत आहे अशा भास होईल /१४ जूनच्या पौर्णिमेला चंद्रबिंब नेहमीच्यापेक्षा  १४ टक्के मोठा दिसेल 

२३ जुलै रोजी चंद्र मंगळ आणि युरेनस यांची युती होईल युरेनस वगळता इतर दोन्ही ग्रह डोळ्याने दिसतील २९ आणि ३० जुलै रोजी ताशी २५या वेगाने उल्कावर्षाव होईल मध्यरात्र हि उलवर्षाव बघण्याची उत्तम वेळ असेल १२ आणि १३ ऑगस्ट रोजी ताशी १५० पर्यंत होणारा उल्कावर्षाव पाले डोळ्याचे पारणे फेडून टाकेल १४ ऑगस्ट रोजी शनी ग्रह पृथ्वीचा अगदी जवळ येणार आहे ज्यामुळे सूर्यास्तनंतर तो उत्तम दिसेल शनीचे फोटो काढण्यासाठी उत्तम वेळ आहे ही १ सप्टेबर रोजी एक छोटासा उल्कावर्षाव होणार आहे २६ सप्टेंबर रोजी गुरु ग्रह पृथ्वीच्या अगदी जवळ येणार आहे गुरुचे फोटो काढण्यासाठी उत्तम वेळ आहे ३ ऑक्टोबर रोजी आपल्या आकाशगंगेच्या जवळची दीर्घिका असणारी देवयानी आकाशगंगा उघड्या डोळ्याने दिसणार आहे ७ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर आणि २१ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर रोजी छोटसे उल्कावर्षाव होणार आहे . २५ ऑक्टोबर रोजी भारतातून दिसणारे खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे ८ नोव्हेंबर रोजी भारतातून होणारे खग्रास चंद्रग्रहण होणार आहे १२ आणि १८ नोव्हेंबर रोजी छोटेसे उल्कावर्षाव आहेत तर सात डिसेंबर रोजी मंगळावरून जाताना दिसणार आहे याच दिवशी पृथ्वी नई मंगळ आतील अंतर सगळ्यात कमी असणार आहे तर वर्षाअखेरीस ताशी १५० पर्यटन दिसू शकतील अशा उल्कावर्षाव होणार आहे मध्यरात्रीची वेळ हा उल्कावर्षाव बघण्यासाठी उत्तम वेळ आहे वर्षाच्या शेवटी २१ डिसेंबर रोजी एक छोटासा उल्कावर्षाव होऊन वर्षाची अखेर होणार आहे 

मित्रानो खगोलीय चमत्कार बघण्यात काहीही अशुभ नाही सूर्यग्रहणासारखे काही खगोलीय चमत्कार बघताना डोळ्याची काळजी घ्यावी लागते पूर्वी तंत्रज्ञान पुरेशे प्रगत नसल्याने अज्ञानामुळे ते गैरसमज होते मी अनेकदा माझ्या राशीला ग्रहण अपायकारक आहे असे सांगून देखील बघितले आहे माझे काहीही वाकडे झालेले नाही मग बघताय हे खगोलीय चमत्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?