भारताच्या आसपासचे आर्थिक अरिष्ट

         

    सध्या भारताच्या पश्चिमेला असणारऱ्या पाकिस्तान आणि दक्षिणेला असणाऱ्या श्रीलंका या देशात एका वाईट गोष्टीवरून तीव्र स्पर्धा सुरु आहे.  ज्या वाईट गोष्टीवरून ही स्पर्धा सुरु आहे ती म्हणजे कोणता देश पहिल्यांदा दिवाळखोर होतो . दोन्ही देशांच्या आर्थिक स्थैर्याबाबत येणाऱ्या बातम्या दिवसोंदिवस अधिकाधिक वाईट होत चालल्या आहेत दोन्ही देशात महागाईने या आधीचे सर्वांच्या सर्व विक्रम केव्हाच मोडीत काढले आहेत दोन्ही देशात दोन आकडी  महागाई आहे . जेव्हा वस्तूची  किंमत  अत्यंत कमी वेळात   किमान १०% ने वाढते तेव्हा महागाई दोन आकडी झाली असे म्हणतात . आज हा मजकूर लिहीत असताना दोन्ही देशातील महागाई १३ ते १५ % टक्याच्या आसपास आहे ही महागाई रोखणे त्या देशातील केंद्रीय सरकारच्या आवाक्यातील गोष्ट राहिलेली नाही दोन्ही देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मदतीकडे डोळे लावून बसलेले आहेत 
         आजमितीस जानेवारीच्या पहिल्याआठवड्यात या मध्ये श्रीलंका हा देश दुर्दैवाने पुढे आहे . अपुऱ्या परकीय चलनाच्या साठ्यामुळे खर्च कमी करण्यासाठी श्रीलंकेने त्याच्या देशाच्या काही वकिलाती बंद करायचा निर्णय घेतला आहे नोव्हेंबर २०२१ मध्ये सुमारे २५ ५श्रीलंकन नागरिकांनी  दुसऱ्या देशात स्थलांतरित होण्याच्या प्रयत्न केल्याचे वृत्त wion news ने दिले  आहे . श्रीलंकेतील अन्नधान्याच्या टंचाईने कधीच धोक्याची पातळी गाठली आहे आजमितीस श्रीलंकेकडे जेमतेम दीड अब्ज डॉलर परकीय चालनसाठा आहे मात्र जानेवारी अखेरीस श्रीलंकन सरकारला परदेशी वित्तीय संस्थांकडून देशांकडून स्थानिक बाजरपेठेतून तसेच कर्जरोख्याच्या माध्यमातून पूर्वी उभारलेल्या आणि आता देय असणाऱ्या रक्कमेचा विचार करता तब्बल ७ अब्ज डॉलर इतरांना देयचे आहे या आर्थिक संकटातून बाहेर पाडण्यासाठी तेथील सरकार शब्दशः पाण्यासारखा पैसे छापत आहे परिणामी महागाई
अजून वाढत आहे  समजा एखाद्या रुग्णाला अनेक आजार झाल्याने किडनीवर उपचार करताना घेतलेल्या उपचारांमुळे हृदयावर परिणाम होत आहे हृदयावर उपचार करताना घेतलेल्या औषधांमुळे मेंदूवर परिणाम होत आहे अश्या स्थितीतील रुग्णावर उपचार करताना डॉक्टरची जी अवस्था होईल तशी अवस्था आज श्रीलंकेतील अर्थतज्ञाची झाली आहे . स्थानिक बाजरपेठेतून उचललेल्या कर्जाचे हप्ते पुढे ढकलता येऊ शकतात मात्र इतर कर्जाच्या बाबतीत देखील ते करण्याची वेळ आज श्रीलंकेवर आली आहे आपल्याकडे गरिबीची परिस्थिती सांगताना लंकेची पार्वती अशी संज्ञा वापरतात आज श्रीलंका हा देश खरोखरीच लंकेची पार्वती झाला आहे 
            पर्यटन या एकाच व्यवसायावर अवलुबुन राहिल्याने  तसेच आयातीवर खूपच जास्त भिस्त असल्याने कधी काळी :रम्य हि स्वर्गाहून लंका असे म्हणणाऱ्या या बेटावर भीक मागायची वेळ आली आहे . जगाचा विचार करता अर्जेंटीना  ग्रीस आदी अनेक देशांवर ही वेळ आधी आलेली आहे मात्र त्या स्थितीतून हे देश सुटले आहेत श्रीलंका देशावर आज जी वेळ आली आहे त्यावरून आपण कोणत्याही एकाच आर्थिक स्रोतांवर अवलुबुन न राहणे ,सेवा क्षेत्राबरोबर औद्योगिकीकरणाबाबत योग्य ती पाऊले उचलणे कोणत्याही देशासाठी आवश्यक  का आहे ? हे समजून घेऊ शकतो कोव्हीड १९ मुले जागतिक पर्यंटन रोडवल्याने पर्यटनावर सर्व काही असणारा हा देश आजमितीस परकीय चालनाबाबत प्रचंड अडचणीत आला आहे त्या देशावर चहाच्या बदल्यात युनाटेड अरब 
अमिरात या देशाकडून नैसर्गिक इंधने मागायची वेळ आली आहे  आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडून अतिशय कठोर बंधने स्वीकारून हा देश यातून बाहेर पडू शकतो . जसा प्रयत्न आज पाकिस्तान करत आहे 
       पाकिस्तानच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तेथील सरकारकडे सुद्धा परकीय चलनाचा अत्यंत मर्यादित साठा आहे देशाचा पंतप्रधान इम्रान खान याने जाहीररीत्या त्याची कबुलीच दिली आहे जागतिक दशवादाचा शिक्का बसल्याने फारच कमी देश त्यांच्याबरोबर व्यापार करतात पाकिस्तानच्या आधीच्या सरकारांनी देशाच्या भौगोलिक स्थानच्या फायदा घेत अमेरिका आणि पश्चिम युरोपीय देशांकडून प्रचंड आर्थिक मदत घेतली मात्र त्याचा वापर स्वतःच्या देशातील औद्योगिकीकरणासाठी ना वापरता भारताविरुद्ध वापरल्याने पाकिस्तानची निर्यात मुळात कमी आहे जी निर्यात आहे त्यामध्ये कच्या मालाची निर्यात मोठ्या प्रमाणावर आहे परिणामी पाकिस्तानात मुळातच पकीय चलन कमी येते बदलत्या जागतिक राजकारणामुळे पाकिस्तानचे भौगोलिक स्थान कमी महत्त्वाचे झाले परिणामी तो आर्थिक स्रोत घटला दुसऱ्याच्या घरात साप सोडताना तो आपल्याही घरात मागे येऊ शकतो याचे भान न राखल्याने देशातील सामाजिक स्थेर्य बिघडल्याने त्याच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होऊन आज पाकिस्तान भिकेचा कटोरा घेऊन जगात उभा आहे 
भारताच्या दोन बाजूला असणारे हे दोन आर्थिक गर्तेत असणाऱ्या देशाच्या परिणाम कितीही काळजी घेतली तरी भारतावर होणारच तो पूर्णतः टाळता येणे अशक्य आहे फक्त त्याच्या परिणाम आपल्यावर कमीत कमी होऊ देणे हेच आपल्या हातात आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?