एकाग्रता कशी वाढवायची ? (बुद्धिबळाचे मानसशास्त्र भाग ११ )

     

 बुद्धिबळाच्या यशस्वीतेसाठी एकाग्रता किती महत्वाची असते ? हे आपण गेल्या काही भागात बघितले या भागात आपण एकाग्रता कशी वाढवायची ? हे आपण बघूया एकाग्रता बुद्धिबळात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या दोन महत्त्वाच्या गुणांपैकी एक आहे दुसरा गुण शिस्त आहे या शिस्तीविषयी आपण पुढच्या भागात बघूया .   एकाग्रत्तेबाबाबत सुनील गावस्कर यांनी एका मुलाखतीत एकाग्रतेबाबत अत्यंत मार्मिक भाष्य केले आहे ते म्हणतात, " एकाग्रता हा जन्मजात गुण  आहे मात्र आपण त्यात परिश्रमांनी भर घालू शकतो . डॉक्टरने रोग्याच्या रोगनिदानवर . वकिलाने  लढायला घेतलेल्या खटल्याववर आणि खेळाडूने त्याच्या खेळावर एकाग्रचित्त केले तर तर खूप काही साधता येईल , किंबहुना यशाची गुरुकिल्ली एकाग्रचित्रात आहे असे म्हणटल्यास वावगे ठरणार नाही            क्रिकेटच्या खेळातील एकाग्रचित्रतेचा राजा म्हणून जेफ्री बॉयकॉट घेता येईल फलंदाजी करताना त्याची एकाग्रचित्रता मुळीच ढळत नसे समोरच्या संघाने शेरे मारून डिवचवावे . किंवा गर्दीने हुल्लतबाजी करावी , बॉयकॉटवर त्याचा अजिबात परिणाम होत नसे तो धावांचा पाऊस पाडत असे . रोहन कन्हाप आणि गॅरी सोबर्स या दोन प्रसिद्ध खेळाडूत तुलना केली असता , जुन्या जाणत्यांच्या मते कन्हाप हा सोबर्सपेक्षा फलंदाजीत अनेक बाबतीत सरस होता . परुंतु सोबर्सने एकाग्रचित्रामुळे कन्हापपेक्षा बऱ्याच अधिक धावा काढल्या. विरोधी संघाचा एखादा जळजळीत शेरा कन्हापचे लक्ष विचलित करून टाकायचा , आणि तो बॅड होत असे . सोबर्स मात्र अत्यंत थंड प्रवृत्तीने कोणत्याही शेऱ्यावर मुळीच प्रतिक्रिया देत नसे मग तो मैदानात असो का मैदानाबाहेर 
एकाग्रतेसाठी आपणस काय करता येईल ? एकाग्रता जन्मजात गुण असला तरी आपल्या प्रयत्नाद्वारे त्यात भर
घालता येते पुढील खेळ एकाग्रता वाढवण्यास मदत करू शकतो . तीन शब्द निवडा . जसे पेन्सिल,  रबर. पट्टी, सुरवातीला हे शब्द कोणत्याही क्रमाने सांगायचे दुसऱ्या वेळेस पहिला शब्द  तिसऱ्या क्रमांकावर सांगायचं जसे रबर पट्टी पेन्सिल त्यापुढे पट्टी पेन्सिल रबर त्यापुढे पेन्सिल रबर पट्टी या पप्रमाणे . काही चूक केल्याशिवाय वीस एक वेळा ते शब्द उच्चारा .यामुळे मनाच्या शिस्तीबरीबरोबर एकाग्रतेचेही सवय होईल तीन शब्दाऐवजी चार किंवा अधिक शब्दही आपण घेऊ शकतो . 
शब्द उलट्या अक्षरात बोलणे- या खेळात दोन खेळाडू एकमेकांच्या ग्रहणशक्ती आणि एकाग्रता वाढवू शकतात एक खेळाडू कोणताही चार अक्षरांचा शब्द बोलले उदा मेहनत तो बोलल्यानंतर लगेच दुसरा खेळाडू उलट्या अक्षरात तो शब्द बोलले जसे ' तनहमे ' पहिला खेळाडू रेखाटन शब्द बोलला तर दुसरा खेळाडू लगेच 'नटखारे म्हणेल या खेळणे सुद्धा एकाग्रता वाढण्यास मदत होते 
बेरीज वजाबाकी - हा खेळ सोपा तसे अवघड पण आहे ,. या खेळाने एकाग्रता खूपच वाढते एका मागून एक संथपणे आणि स्पष्टपणे असे आकडे बोलावेत जसे ७. ४., ३ , ६, ५, २, ४, ६, ३   . खेळणाऱ्याने लक्षपूर्वक ऐकायचे आणि मनातल्या मानत पहिला अंक दुसऱ्या अंकात मिवायचा त्या बेरजेतून तिसरा अंक वजा करायचा वजा करून आलेल्या उत्तरात चौथा अंक मिळवायचा याप्रमाणे प्रथम बेरीज नंतर वजाबाकी त्यानंतर पुन्हा बेरीज असे करायचे योग्यवेळी आकडे बोलणे बंद करायचे खेळणाऱ्याने आपले उत्तर कागदावर लिहायचे जसे  ७+४ =११ -३=८ +६=    १४-५ = ९ +२ =११-४=७+६=१३-३=१० 
एकाग्रतेबरोबर बुद्धिबळात यशस्वी होण्यासाठी शास्त्र देखील आशयाला हवी त्याविषयी पुढच्या भागात बोलूया तो पर्यंत सर्वांना नमस्कार 
सुनील शर्मा  (लेखक नाशिमधील सर्वात जुने बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत गेल्या ४५ वर्षांपासून ते बुद्धिबळ खेळाडू घडवत आहे  त्यांनी आजपर्यंत .ग्रँडमास्टर विदित गुजराथी सह अनेकांना त्यांनी घडवले आहे आज ते  बोटवानीक चेस स्कुलच्या माध्यमातून बुद्धिबळ प्रशिक्षण देत आहेत ) 
शब्दांकन अजिंक्य तरटे  



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?