मेमू म्हणजे काय रे भाउ!

   

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात 10 तारखेला भुसावळ इगतपूरी दरम्यान रेल्वेची मेमू सेवा सुरु झाली. आणि नाशिकमध्ये सर्वत्र मेमू म्हणजे काय रे भाउ असी चर्चा सुरु झाली. आपली सर्वसाधरण रेल्वे आणि मेमूमध्ये काय फरक आहे? याबाबत विविध चर्चांना नाशिकमध्ये उधाण आले.त्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन.
अनेकांना हा निर्णय केंद्र  सरकारने आताच घेतला आहे असे  वाटू शकते त्यांना मी सांगू इच्छितो की देशातील पँसेजरचे मेमूमध्ये रुपांतरण करण्याचा निर्णय मोदी सरकारने सन2018मध्येच घेतला होता . सुरवातीला पुरेसे मेमू नसल्याने आणि नंतर कोव्हीड 19चा उद्रेक झाल्याने हा निर्णय लांबणीवर पडला ,इतकेच.मोदी सरकारने  त्यासाठी देशातील चार प्रमुख शहरे दिल्ली , मुंबई, कोलकत्ता ,चेन्नई या शहरांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गावर सर्वप्रथम हा बदल अमंलात आणण्याचे ठरवले आहे. पँसेजरच्या ऐवजी मेमू चालवल्यास यामार्गावरील इतर रेल्वे गाड्यांचा वेग वाढवता येईल असा रेल्वेचा कयास आहे. भुसावळ इगतपुरी हा रेल्वेमार्ग मुंबई दिल्ली आणि मुंबई कोलकत्ता या मार्गावरचा रेल्वे मार्ग आहे. त्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. हा रेल्वेमार्ग जिथे रस्त्याला छेदतो तिथे जस पिंपळगाव बसवंत निफाड रस्ता आदी ठिकाणी रेल्वे वेगाने येत्या यावात म्हणून अंडरपास आणि ओव्हरब्रीजसुद्धा बांधले जात आहेत. ते यासाठीच
      अनेकांना मेमू आणि मुंबई , पुणे आदी भागात चालवण्यात येणाऱ्या लोकल्स या एकच असल्याचे वाटते. त्यांना
मी सांगू इच्छितो की त्यांची बाह्य रचना एक सारखीच असली तरी यांत्रीकी रचनेत अनेक फरक आहे. हा यांत्रिकी फरक त्यांच्यात असणाऱ्या इंजिनाच्या ट्रँक्शन मोटारमध्ये प्रामुख्याने आहे. तसेच त्यांचा अधिकत्तम मान्यतेचा वेगाबाबत फरक आहे. लोकलच्या अधिकत्तम वेगाला कोणतेही बंधन नाही. तर मेमूला अधिकत्तम वेग ताशी 90किमी असावा . या दोघोंचा इंजिनाच्या ट्रँक्शन मोटरमध्ये फरक असल्याने लोकलचे इंजिन 120 किमीपेक्षा जास्त अंतर चालवले जात  नाही. मात्र मेमूचे इंजीन सहजेने विनाथांबा 200 किमीचे अंतर चालवले जावू शकते. थोड्या वेगळ्या शद्बात सांगायचे झाल्यास लोकलचे इंजिन म्हणजे चित्ता आहे जो अत्यंत वेगाने पळू  शकतो मात्र तो धावगती   खूप काळ टिकावू शकत  नाही तर मेमूचे इंजिन इंजिन  म्हणजे छोटा घोडा आहे जो  इतरांपेक्षा वेगाने मात्र पृथ्वीवरील सर्वात वेगवान प्राणी  असलेल्या चित्त्यापेक्षा कमी वेगाने मात्र  त्याच्यापेक्षा जास्त अंतर  धावू  शकतो.  असे आपण म्हणू शकतो लोकलमध्ये तर दोन  डब्यानंतर ट्रँक्शन मोटर असते .मात्र त्याचा आकार छोटा असतो परीणामी त्या सातत्याने चालू शकत नाहीत. भारत हेवी इलेक्ट्रिक लिमीटेड (भेल) या भोपाळस्थित कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या ट्रँक्शन मोटरची रेटेड आउटपुट पाँवर 2600  हाँर्स पाँवर असते. तर  सिमेंस या कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या ट्रँक्शन मोटरची रेटेड आउटपुट पाँवर पाँवर 3 हजार हाँस पाँवर असते.तसेच दर दोन डब्यानंतर पाँवर केबिन असते. मेमु ट्रेनच्या ट्रँक्शन मोटारचा आकार आणि रेटेड आउटपुट पाँवर  जास्त असते.त्यामुळे त्या सलगतेने 200
किमी जाउ शकतात. आपल्या नेहमीच्या एक्सप्रेस ट्रेनच्या इंजिनाची रेटेड आउटपुट किमान 7हजार असते. त्यामुळे ते घाट विभाग चढून जाउ शकतात. मात्र मेमू आणि लोकल ट्रेंन्सला ते शक्य नसते काही जण भुसावळ वरून इगतपूरी ला.का  थांबवली ती कसाऱ्याला का नेली नाही? म्हणून त्रागा करत आहेत. त्यांचासाठी ही माहिती असणे आवश्यक आहे की त्या इंजिनाची ताकदच घाट चढण्याची नाही. ते पळण्यासाठी तयार केलेले इंजिन आहे.
मेमू ट्रेन पहिल्यांदा पश्चिम बंगालमधील असनसोल ते अद्रा दरम्यान सन १९९५ मध्ये धावली .त्यानंतर टाटानगर ते खरगपुर या दरम्यान धावली त्यानंतर त्याचा वापर काढत गेला.त्यांची ट्रॅक्शन मोटार २५००० व्होल्टवर  चालत असते. इमयु ट्रेनमध्ये(लोकल ट्रेन) शौचालयाची सोय नसते. तर मेमूमध्ये ही सोय असते.इमयूध्ये(लोकल ट्रेन) साधरणतः चार टँक्शन मोटार असतात.तर मेमुमध्ये तीन टँक्शन मोटार असतात.लोकल मध्ये एक जास्तीची टँक्शन मोटार असल्याने मेमुपेक्षा ती कमी वेळात वेग पकडणे किंवा कमी करु शकते.जरी हे तंत्रज्ञान १९९५ साली भारतीय रेल्वेत वापरण्यात आले असले तरी ही क्षमता भारतीय रेल्वेने १९९० मध्येच आत्मसात केले होते.
भारतीय रेल्वे वेगाने बदलत आहे. हेच यातून दिसत आहे. नव्या भारताची नवी रेल्वे म्हणून ती दिसत आहे हे दिसत आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?