श्रीलंका कोणाचा मार्ग अनुसरणार ? भारताचा की कंबोडियाचा

         

सध्या श्रीलंकेची आर्थिक स्थिती धोकादायक अवस्थेत आहे . श्रीलंकेकडील परकीय गंजाजळी अत्यंत धोकादायक स्थितीवर आलेली आहे त्यामुळे खर्चात कपात करण्यासाठी आपले काही दूतावास बंद करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी श्रीलंकेकडे दोन मार्ग आहेत एक मार्ग म्हणजे भारताचा मार्ग आणि दुसरा म्हणजे कंबोडियाचा मार्ग.  श्रीलंकेतील सरकार यातली कोणता मार्ग निवडते?  हे बघणे अत्यंत उत्सुकतेचे ठरणार आहे 
        श्रीलंकेवर आता आहे तसा  कर्जाचा डोंगर नसला तरी परकीय गंजाजळी अत्यंत तळाला जाण्याचा अनुभव आपल्या भारतीयांनी घेतला आहे १९९१ जुलै महिन्यात आपली परकीय  गंजाजळी जेमेतेम काहीच दिवस पुरेल इतकीच होती त्यावेळी आपणास आवश्यक असणाऱ्या  नैसर्गिक इंधने आदींची आयात कशी करायची ? याबाबत मोठा प्रश्न होता त्याच्या आधी सुमारे १५ /१६ वर्षांपासून सुरु असणाऱ्या राजकीय कोलांट्या उड्या , सामाजिक सुरक्षितेचा प्रश्न यामुळे आपल्या परकीय गंजाजळीला प्रचंड आहोटी लागली परिणामी आपल्या रिझर्व बँकेकडून भारतातील सोने युनाटेड किंग्डम (इंग्लड ) कडे सोने तारण ठेवत आंतराष्ट्रीय नाणेनिधी (आय एम एफ )आणि जागतिक बँक यांच्याकडून विविध बंधने स्विकारत यातून सुटका केली .या बंधनांमुळे आपणास आपली
अर्थव्यवस्था खुली करुन खासगी क्षेत्राला परकीय कंपन्यांना अर्थव्यवस्थेत आपल्या अर्थव्यवस्थेत समाविष्ठ करुन घ्यावे लागले.कालांतराने आपण आपले सोने सोडवले .आज जानेवारी 2022 मध्ये आपण परकीय गंजाजळीबाबत पहिल्या दहात आहोत आपण अनुसरलेल्या मार्गाला अर्थव्यवस्थेचा भारतीय मार्ग म्हणूया .
              कंबोडिया या आग्रेय आशियातील देशावर देखील परकीय गंजाजळी आटण्याचे संकट उद्भवले होते. त्यावेळेस त्यांनी भारताने अनुसरलेल्या मार्गापेक्षा वेगळा मार्ग अनुसरला .त्यांनी जागतिक वित्तीय संस्थांकडून बंधने लादण्यापेक्षा जागतिक अर्थकारणात पठाणी सावकराची भुमिका बजावणाऱ्या चीनकडून कर्ज घेतले. त्यांना सहजतेने कर्ज मिळाले मात्र त्यासाठी पठाणी व्याजदरच आकरण्यात आला.परीणामी ते कर्ज फेडण्यात कंबोडिया अयशस्वी ठरला. जागतिक अर्थव्यवस्थेत पठाणी सावकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीनने कर्ज न फेडल्यामुळे कंबोडियाची उर्जा वितरण प्रणालीच ताब्यात घेतली.आजमितीस कंबोडिया स्वतंत्र देश असून देखील त्याची उर्जा प्रणाली चीन नियंत्रीत करतो.परकीय गंजाजळीच्या समस्येवर मात करण्यासाठी कंबोडियाने अनुसरलेल्या मार्गाला कंबोडियन मार्ग म्हणूया .सध्या बिबिसी, wion news इंडियन एक्सप्रेस आदी माध्यमातील या विषयीचा बातम्या बघीतल्या तर श्रीलंका कंबोडिया मार्ग अनुसरायाचा विचारात दिसत आहे. जे भारतासाठी धोक्याचे आहे. चीनने  सध्याच  श्रीलंका आधीचे चीनचे कर्ज फेडू न शकल्याने श्रीलंकेचे हंबनपोट्टा हे बंदर 99वर्षासाठी पुर्णतः ताब्यात घेतले आहे.जर अजून मालमत्ता ताब्यात आल्यास चीनचा या क्षेत्रातील प्रभाव प्रचंड वाढू शकतो जे भारताला कदापी परवडनारे नाही त्यामुळे भारतासाठी श्रीलंका कोणता उपाय योजते हे अत्यंत महत्तवाचे आहे. श्रीलंका जरी बेट असले तरी भारतीय भुमीच्या अत्यंंत जवळ आहे. दोन्ही देशांचे आंतरराष्ट्रीय मान्यतेनुसार
देण्यात येणारे समुद्रातील मालकी क्षेत्र परस्परांचा  मालकी क्षेत्रात जाते.यावरुन त्यांचा नजिकतेचा अंदाज बांधता येतो. 
            जर श्रीलंकेने आंतरराष्ट्रीय बंधने मान्य करायचे ठरवले तर श्रीलंकेच्या यादवी युद्धात तामिळी भाषिकांवर झालेल्या अत्याचाराबाबत योग्य ती पाउले उचलण्याचे बंधन त्यांच्यावर येवू शकते भारतात आणि श्रीलंकेत तामिळी भाषिक राहतात. तामिळनाडू राज्यातील राजकारण यावर फिरते  श्रीलंकन नागरीकांच्या भावना याबाबत तीव्र आहेत त्यामुळे श्रीलंका ते बंधन.घेईल का याबाबत  शंका आहे.एकंदरीत श्रीलंका आपल्यासाठी येत्या काळात महत्तवाची आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?