भारत चीन संबंध कोणत्या दिशेकडे ? (बातमीतील चीन भाग १७)

           


      भारताचे आणि चीनचे संबंध नक्की कोणत्या दिशेकडे जात आहेत ? असा प्रश्न पडावा अश्या अनेक परस्परविरोधी घडामोडी सध्या या दोन देशांच्या बाबतीत घडत आहेत. एकीकडे सीमेबाबत परस्पर संमती  करण्याच्या बाबतीत होणाऱ्या चर्चेच्या फेऱ्या एकामागून एक अपयशी ठरत असताना, २०२० पेक्षा २०२१ मध्ये सुमारे ४३. ३% अधिक  रकमेच्या परस्पर व्यापार झाल्याचे General Administration of Customs तर्फे प्रकाशित अहवालातून स्पष्ट होत आहे. शनिवार १४ जानेवारी हा अहवाल प्रकशित करण्यात आला आहे. या अहवालामध्ये भारत चीन मधील व्यापारात  भारत चीनकडून अधिक प्रमाणात आयात करतो, मात्र भारताची चीनला निर्यात कमी असल्याचे देखील सांगण्यात आले आहे भारताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास भारताने चीनकडून ९७अब्ज ५२ कोटी अमेरिकी डॉलरची आयात केली तर भारताची चीनला निर्यात २८ अब्ज १४ कोटी अमेरिकी डॉलरची निर्यात केली २०२०मधील व्यापाराच्या विचार करता भारताची निर्यात  ३४. २% वाढली तर आयात ४६. २ % वाढली. राजनैतिक स्तरावरचा विचार करता लडाख मधील घुसखोरीमुळे भारत चीन मधील संबंध गेल्या काही वर्षातील सर्वात न्यूनतम पातळीवर आहेत. चीनच्या उत्पादनावर बहिस्कार टाकण्याचे आंदोलन या वर्षी सर्वात मोठ्या प्रमाणात झाले.त्या पार्श्वभूमीवर ही वाढ आपण बघायला हवी.

           चीनकडून विविध प्रकारच्या तयार माल जसे इलेट्रीक माळा , विविध प्रकारची गृहपयोगी वस्तू यांची आयात कमी झालेली असली तर कोव्हीड १९ च्या उद्रेकामुळे भारतीय औषधनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांना औषध निर्माण करण्यासाठी यंत्रसामुग्री आणि औषधाचा निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या  मालाच्या पुरवठ्यामुळे चीनची भारताला निर्यात वाढली आहे गेल्या काही वर्षाच्या विचार करता चीन भारत यातील व्यापार सातत्याने चीनला अनुकूल राहिलेला आहे तोच कित्ता याही वर्षी गिरवला गेला असे या अहवालातून स्पष्ट होता आहे  भारताची सगळ्यात जास्त निर्यात ज्या गोष्टींची होते किंबहुना जी भारताची एक ओळख आहे  त्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची बाजरपेठेचे दरवाजे अजून चीनने भारतासाठी बंद ठेवले आहेत , हे आपण या प्रसंगी लक्षात घेयला हवे 

     भारत चीन संबंध सीमेवर तणावपूर्ण राहिल्याने आणि चिनी सामग्री म्हणजे इलेट्रीक माळा , विविध प्रकारची गृहपयोगी वस्तू हेच समजण्यात येत असल्याने भारत चीन बाबतच्या या व्यापारी संबंधांकडे भारतीयांचे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले भारतीय माध्यमे चीन च्या भारतीय सीमेवरील कुरापती आणि त्याविषयी विविध तज्ञांची मते यातच गुंतून गेली 

भारतीयांना औषध निर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे हेच याबाबतचा तोटा भरुण काढण्यासाठी आवश्यक आहे 

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?