आत्महत्या: एक सामाजिक समस्या

 

आपले निर्माण करण्यात आलेले खोटे प्रतिष्ठेचे प्रश्न बाजूला ठेवून, आत्महत्या या गंभीर समस्येवर  आपण एकदिलाने काम करायची गरज असल्याचे, नाशिकमध्ये गेल्या वर्षभर झालेल्या आत्महत्येच्य संख्येने दाखवून दिले आहे. नाशिकसारख्या मध्यम आकाराच्या शहरात गेल्या वर्षी तब्बल ४१९  आत्महत्या झाल्या आहेत. सध्या कोव्हिड १९ च्या उद्रेकामुळे ताणतणावात वाढ झाली आहे, येत्या वर्षभरात जीवन पुर्वपदावर आल्यावर, या वाढलेल्या आत्महत्या देखील कमी होतील, असे मानने भाबडेपणाचे ठरेल. .  एखाद्याला वरकरणी छोट्या वाटणाऱ्या गोष्टी दुसऱ्या साठी खुप मोठ्या वाटू शकतात. त्यामुळे आत्महत्या या वरकरणी शुल्लक कारणासाठी होत आहेत, असे वाटत असले तरी त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. किंबहुना क्षुल्लक कारण एखाद्याला मोठे वाटते , हे आपले मानसिक आरोग्य किती धोकादायक स्थितीत आले आहेत, याचा वस्तस्थितीदर्शक पुरावाच मानावा लागेल.ज्याला यातील गांभीर्य समजेल त्याला यातील दाहकता समजेल 
रस्त्यावर विचित्र पद्धतीने पुटपुटत, हातवारे करत फिरताना दिसणारे लोक म्हणजेच मानसिक रोगी, ही मानसिक
रोगाची संकल्पना आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात आढळते. तो एक मानसिक रोगाचा प्रकार आहे. त्याखेरीज देखील इतर मानसिक त्रास, व्याधी आहेत, ज्यावर उपचार करणे आवश्यक आहे. मानसिक व्याधी असणे, म्हणजे काहीही कमीपणा नाही. शाररीक व्याधी जस्या असतात, तश्याच मानसिक व्याधी आहेत, ज्या औषधोपचाराने बऱ्या देखील होवू शकतात..मानसिक आजार कोणत्याही वयात होवू शकतात. याबाबींचे समाजप्रबोधन अत्यंत आवश्यक आहे.  या मानसिक दौबल्याचे पर्यवसन आपणस आत्महत्येचा स्वरुपात दिसते.
          कवीवर्य कुसुमाग्रज यांनी त्यांच्या स्वातंत्र्य देवतेची विनवणी यात सांगितलेला,"उणे कुणाचे दिसता किंचींत , देत दवंडी फिरु नका", हा संदेश आपण आचरणात आणण्याची नितांत गरज आहे. सध्याचा ताणतणावाच्या काळात, माणसाला आपल्या भावना मोकळ्या करण्याची गरज पुर्वीपेक्षा वाढली असताना,  आपल्या या दुर्गुणामुळे लोक आपल्या समस्या , अडचणी व्यक्त करण्यास कचरतात.आपल्या भावना दाबून ठेवतात,त्यामुळे ज्या प्रमाणे स्वयंपाकघरातील कुकरला मोकळी वाट करुन न दिल्यास फुटतो, त्याप्रमाणे लोकांचा भावनिक बांध फुटतो , जो आपणास आत्महत्येच्या स्वरुपात दिसतो. आत्महत्या करणारी व्यक्ति त्याविषयीचे संकेत आधी देत असते.मात्र त्यास अनेकदा साहनभुती मिळवून कष्टातून सुटका मिळवण्याचा मार्ग म्हणून बघीतले जाते. जे अयोग्य आहे. काही व्यक्ती या मार्गाचा अवलंब करत काम झटकत असतीलही,मात्र सगळ्यांना या पट्टीने मोजणे अयोग्य आहे. अस्या वेळेस त्या व्यक्तीला मानसिक आधाराची गरज आहे, असे मानून मानसोपचार तज्ज्ञांची मदत देयला हवी. न की , त्या वेळेस हमखास केला जाणारा उपाय म्हणजे, त्या व्यक्तीला महत्व न देणे, महत्व न दिल्यास ती व्यक्ती ज्या 
सहानभुतीच्या नाटकासाठी हे करत आहे, ते अयशस्वी होत आहे हे बघून  तीचे नाटक सोडून देईल असा गैरसमज करुन घेणे.
आत्माहत्या ही एक सामाजिक समस्या आहे, जीचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी मानसिक आरोग्य याबाबत समाजप्रबोधन करणे अत्यावश्यक आहे.मी या आधी सांगितलेल्या बांबीबाबत विचार झाल्यास आत्महत्या थांबतील. आत्महत्येचा आलेख खाली येईल,  हे नक्की!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?