चीनचे शेपुट वाकडेच

 

 भारताचा शत्रू असणारा चीन गेल्या आठवड्यात दोनदा चर्चेत आला होता. दोन्ही वेळेस त्याचा सबंध भारताशी होता.चीन आपला शत्रू असल्याने त्याविषयी आपणास माहिती असणे आवश्यक आहे, तरी समर्थ रामदास स्वामी यांच्या "जे जे आपणास ठाव ते सकलांशी सांगावे, शहाणे करुन सोडावे सकल जन" या उक्तीनुसार सांगण्यासाठी आजचे लेखन.
      तर मित्रांनो चीन पाकिस्तानला अत्यंत अत्याधुनिक अस्या आवाजाच्या वेगापेक्षा कितीतरी जास्त वेगाने खुप जास्त अंतर जावू शकेल ,असे क्षेपणास्त्र देवू शकण्याची अमेरीकन थिंक टँंक असणाऱ्या "इंटरनँशनल असायमेंट अँड स्ट्रेटेजी सेंटर कडून व्यक्त करण्यात आली आहे. या संस्थेकडून व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार हे क्षेपणास्त्र भारत रशियाकडून विकत घेत असलेल्या एस 400 या क्षेपणास्त्राला तोंड देवू शकतो .या संस्थेत रिचर्ड डि फिशर हे चीनविषयक मोठे तज्ज्ञ कार्यरत आहेत. त्यांचा मते या आधीच चीनने हे क्षेपणास्त्र उत्तर कोरीयाला दिले आहे. पाकिस्तानबाबत चीन तीच गोष्ट करु शकतो.जर पाकिस्तानला अधिकृतपणे देता आले नाही तर उत्तर कोरीयाच्या मार्फत चीन पाकिस्तानला हे तंत्रज्ञान देवू शकतो. त्याचप्रमाणे चीन हायपर सोनिक ग्लाईड व्हेइकल ही क्षेपणास्त्रापेक्षाही धोकादायक शस्त्र तयार करण्याची शक्यता आहे. हे पहिल्यांदा अवकाशात जाते.मग ते लक्ष्यावर आदळते.त्यामुळे ते ओळखणे अवघड आहे. चीनचा इतिहास बघता भारत जी शस्त्रात्रे वापरतो, त्याचा प्रतिकार करणारी शस्त्रात्रे चीन पाकिस्तानला देतो.सध्याची स्थिती बघता या घडामोडीस किमान दोन ते अडीच वर्ष सहज लागू शकतात, असे अनेक आंतरराष्ट्रीय विषयक तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे भारताच्या हातून पुर्णतः गोष्ट हातातून गेली आहे, असे नाहीये.भारत या काळात त्याची तोड असणारे क्षेपणास्त्र शोधू शकतो.
    भारताचा शत्रू असणारा चीन भारताच्या दुसऱ्या शत्रुला अर्थात पाकिस्तानला मदत करत असताना चीन त्यावरच न थांबता भारताचे मित्र असणाऱ्या मध्य आशियातील देशांशीही आपले सबंध अधिक दृढ करत आहे. भारत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत 27जानेवारीला पाचही मध्य आशियातील देशांशी आँनलाइन संवाद साधत असताना चीन देखील 25जानेवारीला त्यांच्याशी संवाद साधणार आहे. भारत या देशांशी संवाद साधणार असल्याचे
खुप पुर्वीच जाहिर करण्यात आले होते. त्यावेळेस चीनने काही घोषणा केली नव्हती.तर 24 जानेवारीला या देशांशी राजनैतिक सबंध स्थापण होण्यास 30वर्षे झाल्याचा प्रित्यर्थ या देशांशी आँनलाइन संवाद साधत असल्याचे चीनकडून जाहिर करण्यात आले.एकप्रकारे भारताला न्युनत्व देण्याचाच हा प्रकार आहे, असे म्हणता येवू शकते, असे अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मत आहे. भारत या पाचही देशांशी मिळून सुमारे 4 अब्ज अमेरीकी डाँलर इतका व्यापार करतो तर चीन या देशांशी मिळून सुमारे 25अब्ज अमेरीकी डाँलर  इतका व्यापार करतो. चीन या देशांना लष्करीष निमलष्करी आणि पोलीस दलांना उपयोगी पडतील असी सामुग्री खुप वर्षापासून देत आहे. भारत रशियाचा मदतीने यावर मात करु शकतो, असे बिबिसीच्या बातमीत सांगितले आहे. भारताच्या मध्य आशिया याभागातील देशांबरोबर मैत्रता वाढवण्याबाबत बातमी देताना  चीनचे सरकारी वर्तमानपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समध्ये आलेल्या लेखानुसार भारताचे मध्य आशियाबबतचे आराखडे चूकले आहेत.  भारत मध्य आशिया भागातील देशांबरोबर करत असलेल्या हालचालीवरुन जगाचे लक्ष दूर करण्यासाठी चीनचे हे प्रयत्न असल्याचे wion news च्या बातमीत सांगण्यात आले आहे 
एकंदरीत चीन आपल्या भारताचा एक प्रमुख शत्रू आहे हेच खरे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?