आणि नाशिककरांची मान ताठ होते.

         

       दिनांक 28जानेवारी 2022ही तारीख नाशिककरांसाठी सुर्वणाक्षरात लिहीली जाईल, असी होती. नाशिकचे सुपुत्र जगातील 19वे आणि भारतातील क्रमांक दोनचे ग्रँडमास्टर विदीत गुजराथी यांनी बुद्धीबळातील विद्यमान विश्वविजेते कार्लस मँग्नस यांच्या बरोबर टाटा स्टील चेस चँम्पियनमध्ये कठीण स्थितीतील डाव बरोबरीत सोडून आपण भविष्यातील मोठे दावेदार असल्याचे स्पष्ट केले आहे.
               या डावात विदीत गुजराथी यांनी काळ्या मोहऱ्या घेवून खेळताना कठीण स्थितीत त्यांनी डाव बरोबरीत सोडवला आहे, हे विशेष . बुद्धिबळात चढाई करण्याचा विचार करता पांढऱ्या मोहऱ्या घेवून खेळणाऱ्या खेळाडूला, तो पहिला खेळत असल्याने अधिक संधी असते.काळ्याला पांढऱ्याचे आक्रमण परतवून लावत, पांढऱ्यावर आक्रमण करावे  लागते. हे आव्हान विदीत गुजराथी यांनी यशस्वी पेलल्याचे त्यांचा या डावातून दिसते.दोन्ही खेळाडूंनी राजा समोरील प्यादे दोन घरे चालवून डावाची सुरवात केली. त्यानंतर काही प्यादाच्या चाली खेळल्यानंतर दोन्ही खेळाडुंनी स्वतःच्या रंगातील उंट स्वतः च्या चौथ्या घरात (पांढऱ्यासाठी चौथी  तर काळ्यासाठी पाचव्या रांगेत)
आणून   दोन्ही खेळाडूंनी    त्यांचे दोन्ही घोडे पटावर  आणत डाव  इटालियन फोर नाईट ओपनिंग मध्ये मध्ये परिवर्तित  . केला .( विशिष्ट प्रकारच्या खेळी या सर्वात आधी कोणत्या ठिकाणी खेळल्या गेल्या, कोणी खेळल्या, त्यानंतर पटावर काय स्थिती आली यावरून विशिष्ट अस्या चालींना नावे देण्यात आली आहेत.जसे फोर नाईट ओपनिंग, क्निन गँबेट ओपनिंग, सिसिलीयन ओपनिंग वगैरे)  या पद्धतीच्या  खेळातील सुरवातीच्या सर्वांना माहिती  असंणाऱ्या  चालीनंतर आतापर्यंत कधीच स्पर्धेत खेळले गेल्याचे नोंदवले गेले नसलेल्या चाली रचत डाव रंगतदार होणार याची चूणक दाखवली.(खेळाडूने कोणत्या चाली लिहल्या याची नोंद स्पर्धेत घेतली जाते. त्यामुळे या डावासारखा डाव या आधी कधी झाला होता का ? हे समजते)  सुरवातीच्या चालींचा अखेरीस दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचे वजीर गारद करत खेळात अत्यंत चूरस आणली.बुद्धीबळातील सर्वात ताकदवान मोहरा वजीर असतो, हे आपण लक्षात घेयला पाहिजे. डावाच्या आंतीम पर्वात मँग्नस कार्लसन यांचे वजीराच्या रांगेतील प्यादे खुपच पुढे गेल्याने त्याचा वजीर पुन्हा जिवंत होतो का ?याबाबत प्रचंड उत्सुकता होती. विदीत गुजराथी यांनी मँग्नस कार्लसन यांना याबाबत बराच काळ रोखले डावाच्या आंतीम पर्वाचा अखेरीस दोन्ही खेळाडूंचे वजीर पुन्हा  जिवंत  झाले त्यानंतर काही खेळ्या होवून डाव बरोबरीत सोडवण्यावर दोन्ही खेळाडुंचे एकमत झाले. डावाच्या मध्य भागात एका वेळी विदीत गुजराथी यांच्या कडे प्रतिस्पर्ध्यापेक्षा एक प्यादे कमी होते, मात्र त्यामुळे निराश न होता धिरोदत्त खेळ करत प्रतिस्पर्ध्याचे दोन प्यादी मिळवली तिही आपले एकही प्यादे न गमवता. म्हणजेच प्यादांच्या बाबतीत मागे 
पडल्यावर विदीत पुढे गेले हे आपण लक्षात घेयला हवे. डावाच्या अखेरीस विदित यांनी  केलेल्या प्याद्याचा खेळ्या त्यांचे बुद्धीचातूर्य दाखवून देणाऱ्या होत्या.
             मँग्नस कार्लसन यांची खेळण्याची पद्धत आक्रमक आहे.आपल्या आक्रमक खेळाद्वारे प्रतिस्पर्ध्याला चूक करायला भाग पाडून प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवण्याची त्यांची पद्धत आहे. कोणत्याही स्थितीत विजय खेचून आणायचाच. डावामध्ये एकच स्थिती पुन्हा येवून प्रतिस्पपर्ध्याध्याला बरोबरीचा प्रस्ताव आणता येईल, असी स्थितीच निर्माण न होण्याकडे त्यांचा कल असतो.नुकत्याच झालेल्या बुद्धिबळ विश्वविजेता ठरवण्याचा स्पर्धेतील नोपा यांच्या विरुद्धचे मँग्नस यांचे डाव बघीतला तर ही गोष्ट आपणास सहजतेने लक्षात येईल. त्यामुळे माझ्या मते हा डाव जरी बरोबरीत सुटला असला तरी याचे महत्व विजयाइतकेच आहे. एक नाशिककर म्हणून मला त्यांचा अभिमान आहे.आपण भविष्यात मोठे यश संपादन करण्यास सज्ज असल्याचे त्यांनी या डावातून दाखवून दिले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?