वन्यजीव मानव संघर्ष अटळ

       


    वन्यजीव मानव संघर्ष अटळ  आहे ,याची साक्ष देणारी घटनासोमवार ३१ जानेवारी रोजी नाशिककरांनी अनुभवली .नाशिकच्या  नाशिकरोड या उपनगरातील जयभवानी रोड परिसरातील नागरिकांना तब्ब्ल ७ तास बिबटयांनी अक्षरशः दशतीतीत ठेवले  . सोमवारी घडलेला प्रसंग काही नवीन नाही  तसे नाशिकच्या नाशिकरोड परिसर मखमलाबाद परिसर गंगापूर रोड परिसरात बिबट्याने दर्शन दिल्याचे अनेक प्रसंग यापूर्वी देखील घडले आहेत  मात्र गेल्या काही दिवसाचा विचार करता त्याची वारंवारता प्रचंड वाढलेली आहे आणि त्याचेच दुःख आहे . गेल्या काही दिवसात या प्रकारच्या घटनांमध्ये आणि जंगली श्वापद पकडण्यासाठी लागणारा वेळ आणि त्यासाठी वन खात्याला करावे लागणारे परीक्षम बघता येत्या काळात मानव आणि जंगली प्राणी यांच्यात संघर्ष पेटला तर आश्चर्य वाटायला नको, अशी स्थिती आहे 
      मानवाचे जंगलावर होणारे आक्रमण , मानवाच्याच  कृतीमुळे वाढलेली भटक्या कुत्र्यांची संख्या , असणाऱ्या वन क्षेत्रात कमी झालेली तृणभक्षक प्प्राण्याची संख्या यामुळे गेल्या काही वर्षात वन्यजीव मानवी परिसरात घुसण्याचा  संख्येत प्रचंड वाढ होत आहे .कोणत्याही वन्य प्राण्याचे एक ठराविक क्षेत्र असते त्या 
प्राण्याला जगण्यासाठी किमान तेव्हढी जागा अत्यावश्यक असते ,त्या प्रदेशाच्या लगतच्या मानवी वस्तीचा विस्तार होऊन वन्य प्राण्याच्या हद्दीत लोक राहायला लागले की अश्या घटना घडतात या वन्य प्राण्यांना मानवी वस्तीची सवय नसते परिणामी मानवी वस्तीत आल्यावर हे प्राणी बिथरतात हे प्राणी बिथरल्यामुळे अधिक हिंसक होतात आणि समोर असलेल्या व्यक्तीवर भीतीपोटी हल्ला करतात ,बिबटयाने हल्ला केल्यावर मानव घाबरतो आणि तो तेथून पळायला सुरवात करतो मनुष्य पळायला लागल्यावर हे प्राणी अजूनच बिथरतात आणि हिंसक होऊन जोरदार हल्ला करतात त्यामुळे अजून माणसे घाबरतात आणि एका वाईट गोष्टीच्या चक्रास सुरवात होते असो पुण्यात मागच्या वर्षी या दुष्ट चक्रामुळे एका गव्याला आपले प्राण गमवावे लागण्याची घटना घडली होती हे आपणास आठवत असेलच 
         या प्राण्याच्या भक्ष्याची वेळ सकाळची असते त्यामुळे ते भक्ष्यासाठी बाहेर पडल्यावरच या घटना घडतात ज्या प्रामुख्याने सकाळीच घडतात  किंवा एकतर रात्रीच्य सुमारासच घडतात हे आपण लक्षात घेयला हवेअनेक व्यक्ती मानवी वस्तीत वन्यप्राणी आल्यावर काहीतरी फार मोठे घडले असल्याचे समजून विनाकारण गर्दी करतात त्यांच्या हुल्लडबाजीमुळे वन्यजीव गोंधळून जातो त्यास अश्या वातावरणाची सवय नसते त्याने मनुष्यप्राणी बघितलंच नसतो परिणामी तो घाबरतो आणि हिंसक बनतो अश्या हिंसक प्राण्याला नियंत्रणात आणून त्यास सुरक्षितपणे त्याचा अधिवासात सोडणे हे काम करणे वन खात्याला कठीण होत आहे आता समाज प्रबोधनामुळे लोक सजग होत गर्दी कमी करत आहेत मात्र अद्याप अश्या लोकांचा टक्का वाढण्याची गरज आहे त्याच बरोबर  वन्य क्षेत्र जवळ असणाऱ्या क्षेत्रात गाई  भटके कुत्रे अश्या प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे जर ही संख्या नियंत्रणात ठेवली तर भक्ष्य म्हणून याचा वापर करण्यासाठी वन्यजीव  मानवी वस्ती कडे येत नाहीत तसेच त्यांच्या भक्ष्याच्या वेळी मानवी वस्ती आणि जंगल या दरम्यान गस्त घालणे आदी उपाय योजावे लागतील तसेच मानवी वस्तीला वन्य क्षेत्राजवळ वाढूच ना देणे अधिक क्षेयस्कर आहे मात्र त्यातही खूप प्रयत्न करावे लागतील मी या आधी सांगितलेले उपाय योजने तुलनेने काहीसे सोपे आहे 
वन्य प्राणी समोर दिसले तर कसे वागायचे ?याबाबतही लोकांनाशिक्षण देणे आवश्यक आहे मुळात ते पाळ्या क्षेत्रात अतिआक्रमण करत आहोत त्यांनी त्यांचे क्षेत्र सोडलेले नाही हे लक्षात घेऊन आचरण केल्यास हा प्रश्नच उदभवणार आंही मात्र मानवाच्या वाढत्या संख्येमुळं ते अश्यकच आहे त्यामुळे त्यांच्याशी जुळवनु घेण्यातच मानवाचे हित आहे हेच खरे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?