पाकिस्तान अस्थिरतेच्या विळख्यात !

 

   पाकिस्तान सध्या अस्थिरतेचा विळख्यात सापडला असल्याचे सध्या तेथील घडामोडी बघता दिसून येत आहे. तेथील बलूचिस्तानमधील  फुटीरतावाद्यांनी काही दिवसापूर्वीच लाहोरचा अनारकली बाजारात स्फोट केला होता. पुण्याचा तूळशीबाग समकक्ष असणाऱ्या या  बाजारात झालेल्या स्फोटामुळे फारशी जिवित हानी झाली नव्हती. मात्र या स्फोटातून स्फुर्ती घेत, बलूचिस्तान लिबरेशन आर्मीतर्फे 2 फेब्रुवारी रोजी रात्री  बलूचीस्थानमधील पांजगुर आणि नुशकी   या दोन शहरामध्ये पाकिस्तानी लष्करावर मोठा हल्ला करण्यात आला .या हल्यानंतर बलूचीस्थान लिबरेशन आर्मीच्या टेलीग्राम अकाउंटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार या मध्ये 100 पाकिस्तानी लष्करी जवान प्राणास मुकले आहेत. तर बलूचिस्तान लिबरेशन आर्मीचे 4 जवान मृत्युमुखी पडले आहेत. त्यानंतर पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान यांनी तातडीने ट्टिट करत, पाकिस्तानी लष्कराने फार मोठा दहशतवादी हल्ला झाल्या परतवून लावल्याबद्दल त्याचे  अभिनंदन केले आहे. आजमितीस या क्षेत्रात  पाकिस्तानी  माध्यमांसह सर्व माध्यमांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तेथून अधिकृतपणे माहिती मिळत नाही. मात्र या विषयी  अनधिकृत स्त्रोताद्वारे येणाऱ्या माहितीनुसार पाकिस्तानी लष्कराची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.  पाकिस्तानची जगात नाच्चकी होवू नये, तसेच पाकिस्तानी नागरीकांचे मनोधौर्य खच्चू नये, म्हणून  त्या ठिकाणी माध्यमांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
        पाकिस्तानात आज 4  प्रांत आहेत.(प्रांत आणि आपल्याकडील राज्ये ही राजशास्त्राचा विचार करता वेगवेगळी शासनव्यवस्था आहे.प्रांतापेक्षा राज्याला अधिक राजकीय अधिकार असतात आपल्या कडील केंद्रशासित प्रदेश आणि राज्य यातील राजकीय प्रशासन व्यवस्था म्हणजे प्रांत ), बलूचीस्थान, पंजाब आणि खैबर ए पख्तूनवा . वायव्य सरहद्द प्रांत या नावाने हा खैबर ए पख्तूनवा हा प्रांत आताआतापर्यत ओळखला जात असे सुमारे 4 ते 5 वर्षापुर्वी पाकिस्तानने त्याचे नाव बदलले असो.तर या 4 प्रांतांपैकी बलुचिस्तान आणि सिंध या प्रांतात पाकिस्तानातून वेगळी होण्याची चळवळ फार पुर्वीपासून सुरु आहे. त्यापैकी बलूचीस्तानची फुटीरता चळवळ सध्या मोठ्या प्रमाणात वेग पकडत आहे. पाकिस्तानमध्ये पंजाब प्रांतातील नागरीकांची पाकिस्तानच्या प्रशासन आणि लष्करावर मोठ्या प्रमाणात पकड आहे. या पकडीमुळे पाकिस्तानी पंजाबी नागरीक अन्य प्रांतातील नागरीकांवर प्रचंड अत्याचार करतो असी त्यांची भावना आहे या अत्याचाराबत पाकिस्तानमध्ये वारंवार आवाज उठवला जातो . आम्हाला चुकीची माहिती देऊन पाकिस्तानात सामील करून घेतले अशी या भागातील नागरिकांची भावना असते 
          बलुचिस्तानचा विचार करता बलुचिस्तानला लागून असणारे काही भाग सिंध पंजाब  आणि खैबर  ए पख्तूनवा
या प्रांतात विलीन केल्यावर देखील पाकिस्तानच्या एकूण भूभागापैकी सुमारे ५०% भूभाग हा बलुचिस्तान या प्रांतात आहे मात्र पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपैकी जजेमते १० ते १५% लोकसंख्या या भागात राहते परिणामी पाकिस्तानच्या इतर भागांपेक्षा हा भाग बराच अविकसित आहे मात्र हा भाग नैसर्गिक इंधनाच्या आणि अनेक महत्त्वाच्या खनिज्यांबाबत समुद प्रांत आहे आपल्या या भांडाराचा आपल्यास काहीही फायदा मिळत नाही अशी भावना बलुचिस्तानमधील नागरिकांची आहे  त्यामुळे आपल्या नैसर्गिक संसाधनाचा योग्य मोबदला मिळण्यासाठी स्वतंत्र होणे आवश्यक असल्याची तेथील बहुसंख्यांची भावना आहे काही वर्षांपूर्वी एका ब्रिटिश संस्थेने 
पाकिस्तानमधील समाजसेवी संस्थेच्या मदतीने केलेल्या जनमत  सुमारे ३७ % लोकांनी स्वतंत्र बलुचिस्तानच्या बाजूने कल दिला होता 
       पाकिस्तान दुबळा होण्यात आपला फायदा पण आहे आणि तोटाही दोन्ही आहे पाकिस्तान दुबळा झाल्यास तो अंतर्गत प्रश्नात गुंतून राहिल्यामुळे त्याचा आंतराष्ट्रीय स्तरावरचा काश्मीरबाबतचा आकांडतांडव कमी होऊ शकतो त्याच वेळी पाकिस्तान दुबळा झाल्यास त्यातील असंतुष्ट लोकांमुळे भारतातील दहशतवादी कारवाया वाढू शकतात सबब भारतासाठी या घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या आहेत 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?